Budget 2022 : सर्वसामान्यांना प्राप्तीकरामध्ये दिलासा का नाही? अर्थमंत्र्यांनी महाभारतामधील श्लोकचा दिला दाखला
Budget 2022 : श्लोकचा दाखल देण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर भरणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
Budget 2022 : प्राप्तीकर भरणाऱ्यांना यंदाच्या अर्थसंकल्पामधून दिलासा मिळालेला नाही. या वर्षीही कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी केली. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कर रचना समान असेल. कर रचनेमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. पण अर्थमंत्र्यांनी कर रचनामध्ये कोणताही बदल न करण्याचं कारण सांगितलेय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महाभारतामधील श्लोकचा दाखला देत कर का महत्वाचा आहे, ते सांगितलं आहे. महाभारतामधील श्लोकचा दाखला देत अर्थमंत्री म्हणाल्या की, 'राजाने कोणत्याही प्रकारची सूट न देता धर्माच्या अनुषंगाने कर आकारायला हवा. ' श्लोकचा दाखल देण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर भरणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
अर्थमंत्र्यांनी कोणत्या श्लोकचा दिला दाखला -
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महाभारतमधील शांती पर्वाच्या अध्याय 72 मधील श्लोक 11 वाचत प्राप्तीकर आकरण्याचा दाखला दिला.
दापयित्वाकरंधर्म्यंराष्ट्रंनित्यंयथाविधि। अशेषान्कल्पयेद्राजायोगक्षेमानतन्द्रितः॥११॥
श्लोकचा नेमका अर्थ काय?
'राजाने कोणत्याही प्रकारची सूट न देता धर्माच्या अनुषंगाने कर आकारायला हवा. त्यासोबतच राजधर्मानुसार शासन करून लोकांच्या योगक्षेम (कल्याणाची) व्यवस्था करायला हवी.'
टॅक्स स्लॅब उत्पन्न कर
2.5 लाख - कोणताही कर नाही
2.5 लाख ते 5 लाख - 5 टक्के कर
5 लाख ते 7.5 लाख - 10 टक्के
7.5 लाख ते 10 लाख - 15 टक्के
10 लाख ते 12.5 लाख - 20 टक्के कर
12.5 लाख ते 15 लाख - 25 टक्के
15 लाखांपेक्षा जास्त - 30 टक्के कर
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसदृष्य परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये आता काहीशी सुधारणा होत असून अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येताना दिसत आहे. पण गेल्या दोन वर्षांचा विचार करता केंद्र सरकारने या वर्षीच्या कर रचनेत बदल व्हावी आणि ती कमी करण्यात यावी अशी मागणी होत होती. पण या वर्षी त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.