एक्स्प्लोर

Economic Survey : आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाचा जीडीपी 6.5 ते 7 टक्के राहणार, आर्थिक पाहणी अहवालात सरकारचा अंदाज!

Economic Survey 2023-24 : 23 जुलै रोजी निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी सरकारच्या बजेटमध्ये नेमके काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालाच्या माध्यमातून 2023-24 या आर्थिक वर्षात देशाची कशी वाटचाल राहिली याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, याच पाहणी अहवालात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाचा वास्तविक जीडीपी (रियल जीडीपी) हा 6.5 ते 7 टक्के राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

2023-24 साली जीडीपीमध्ये 8.2 टक्क्यांनी वाढ

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या जीडीपीमध्ये 8.2 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तर 2023-24 या आर्थिक वर्षात महागाई दर 5.4 टक्क्यांवर होता. या आर्थिक वर्षात बँकिंग आणि आर्थिक सेवांची कामगिरीही उत्तम राहिल्याचं या आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आलंय.

 वर्षाला 78.51 लाख रोजगार निर्मिती करण्याची गरज

आर्थिक पाहणी अहवालात रोजगारनिर्मितीवर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. सध्या वाढती मागणी आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता देशात बिगरकृषी क्षेत्रात वर्षाला साधारण 78.51 लाख रोजगार निर्मिती करण्याची गरज आहे. सध्या देशात 56.5 मनुष्यबळ आहे. त्यापैकी साधारण 45 टक्के कामगार हे शेती क्षेत्रात काम करतात. 11.4 टक्के हे निर्मिती क्षेत्रात काम करतात. 28.9 टक्के वर्कफोर्स ही सेवा क्षेत्रात तर 13.0 टक्के कामगार हे बांधकाम क्षेत्रात काम करतात.

महिला श्रमशक्तीत वाढ

गेल्या सहा वर्षात महिला श्रमशक्तीमध्ये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे बेरोजगारीचा दरही कमी होताना दिसतोय. आर्थिक वर्ष 23 मध्ये बेरोजगारीचा दर 3.2 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय? 

सरत्या आर्थिक वर्षात देशाची प्रगती कशी राहिली, कोणत्या क्षेत्रात देशाची वाटचाल कशी होती, याबाबतची माहिती आर्थिक पाहणी अहवालात असते. आर्थिक पाहणी अहवालाच्या मदतीनेच आगामी वर्षात सरकारने नेमकं कोणत्या क्षेत्रावर लक्ष देण्याची गरज आहे, याचा अंदाज बांधला जातो. प्रमुख आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली हा आर्थिक पाहणी अहवाल तयार केला जातो.

हेही वाचा :

स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्थसंकल्प सादरीकरणात झालेत 'हे' महत्त्वाचे बदल, अनेक परंपरा बदलल्या; जाणून घ्या...

पैसे ठेवा तयार! 'ही' नवरत्न कंपनी घेऊन येणार आयपीओ; चांगले रिटर्न्स मिळवण्याची नामी संधी!

अर्थसंकल्पाच्या आधी गुंतवणूक केल्यास 'हे' पाच स्टॉक्स तुम्हाला करणार मालामाल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
Sadabhau Khot VIDEO : संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे मृत्यूप्रकरण; संपत्ती हडपण्याचा डाव, पाच जणांवर गुन्हा दाखल
शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे मृत्यूप्रकरण; संपत्ती हडपण्याचा डाव, पाच जणांवर गुन्हा दाखल
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde At Lalbaugcha Raja : एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनाला, बाप्पासाठी काय नेलं?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 03 PM : 22 September 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBalasaheb Thorat On Sanjay Gaikwad  : Rahul Gandhi यांच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
Sadabhau Khot VIDEO : संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे मृत्यूप्रकरण; संपत्ती हडपण्याचा डाव, पाच जणांवर गुन्हा दाखल
शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे मृत्यूप्रकरण; संपत्ती हडपण्याचा डाव, पाच जणांवर गुन्हा दाखल
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, संजयकाका पाटील यांची विशाल पाटलांवर टीका
Eknath Shinde महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा
महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा
धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
Congress On Adani Group: गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
Embed widget