एक्स्प्लोर

धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Mumbai Crime News : मुंबईतील एका अभिनेत्रीला खोट्या प्रकरणात गोवणं, तिला अटक करणं आणि तिचा छळ करणं, याप्रकरणी 3 आयपीएस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

मुंबई : आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या एका अभिनेत्रीला खोट्या प्रकरणात गोवून, तिला अटक करुन तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेशातल्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुंबईतील एका अभिनेत्रीला खोट्या प्रकरणात गोवणं, तिला अटक करणं आणि तिचा छळ करण्याचे आरोप या तिघांवर सिद्ध झाले आहेत. सरकारनं यासंबंधी खात्यांतर्गत चौकशी केली होती.

अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक करुन छळ

मुंबईतील एका मॉडेल आणि अभिनेत्रीने (Mumbai Based Actress) एका व्यासायिकाविरोधात लैंगिक छळाची तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव होता. पण, तिने तक्रार मागे घेतली नाही, म्हणून तिला आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलं आणि तिचा सुमारे दीड महिना शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणात तीन आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला.

लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी दबाब

उद्योगपती आणि वायएसआर काँग्रेसचे नेते कुक्काला विद्यासागर यांच्याविरुद्ध या अभिनेत्रीनं मुंबईत लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. ती मागं घेण्यासाठी पोलीस अधिकारी दबाव टाकत होते. पण त्या अभिनेत्रीनं त्याला भीक घातली नाही. त्यामुळं तिच्याविरुद्ध खोटं प्रकरण उभं करुन या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री आणि तिच्या आईवडिलांना 2 फेब्रुवारी रोजी अटक झाली होती. तब्बल 42 दिवसांनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

तीन वरिष्ठ आयपीएस अधिकारी निलंबित

आंध्र प्रदेश सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्याच्यावर मुंबईतील एका अभिनेत्रीला सापळ्यात अडकवणे, अटक करणे आणि त्रास दिल्याचा आरोप आहे. पीएसआर अंजा नेयुलू, कांथी राणा टाटा आणि विशाल गुन्नी अशी निलंबित करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावे आहेत. तपास अहवालात तिघांकडून पदाचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले आहे.

अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार अटकेत असताना पोलिसांनी तिला आणि तिच्या पालकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांपासून वंचित ठेवले, वकील आणि नातेवाईकांनाही भेटू दिले नाही. तसेच शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच, मुंबईतील तक्रार मागे न घेतल्यास इतर राज्यातही खोटे गुन्हे दाखल केले जातील, असे धमकावल्याचाही आरोप अधिकाऱ्यांवर केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aapka Apna Zakir : बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे फ्लॉप झाला झाकिर खानचा पहिला टीव्ही शो, महिन्याभरातच गाठोडं गुंडाळलं

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pakistani citizens In India : कोणी 35 वर्षांनी भारत सोडला, कोणाची आई भारतात अन् छोटी लेकरं आता पाकिस्तानात जाणार; अटारी बाॅर्डर हळहळली
कोणी 35 वर्षांनी भारत सोडला, कोणाची आई भारतात अन् छोटी लेकरं आता पाकिस्तानात जाणार; अटारी बाॅर्डर हळहळली
Sachin Kurmi : दादांच्या कार्यकर्त्याची भायखळ्यात हत्या, सचिन कुर्मींच्या हत्येमागचा आका कोण? दक्षिण मुंबईत पोस्टर्स
दादांच्या कार्यकर्त्याची भायखळ्यात हत्या, सचिन कुर्मींच्या हत्येमागचा आका कोण? दक्षिण मुंबईत पोस्टर्स
India Banned 16 Pakistani YouTube channels : डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज ते शोएब अख्तर सुद्धा! केंद्र सरकारकडून 16 पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या युट्यूब चॅनेलवर बंदी
डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज ते शोएब अख्तर सुद्धा! केंद्र सरकारकडून 16 पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या युट्यूब चॅनेलवर बंदी
Solapur APMC Election Result: सोलापूर APMC निवडणुकीच्या 4 जागांचा निकाल जाहीर, भाजप विरुद्ध भाजप आमदारांमध्येच चुरस, कोण विजयी?
सोलापूर APMC निवडणुकीच्या 4 जागांचा निकाल जाहीर, भाजप विरुद्ध भाजप आमदारांमध्येच चुरस, कोण विजयी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Madhya Pradesh Accident |  मंदसौरमध्ये अपघात, व्हॅननं दुचाकीला धडक दिल्यानं व्हॅन कोसळली विहिरीतPahalgam Terror Attack | पहलगाम हल्ल्याच्या दिवशी बैसरन खोऱ्यात सॅटेलाइट फोन होते सक्रीयGilgit Protest Against Pakistan | पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने, गिलगिटमध्ये पाकविरोधात घोषणाMumbai Best Bus News | बेस्ट बसची भाडेवाढ दुप्पट होण्याची दाट शक्यता, 'बेस्ट' प्रवास महागणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistani citizens In India : कोणी 35 वर्षांनी भारत सोडला, कोणाची आई भारतात अन् छोटी लेकरं आता पाकिस्तानात जाणार; अटारी बाॅर्डर हळहळली
कोणी 35 वर्षांनी भारत सोडला, कोणाची आई भारतात अन् छोटी लेकरं आता पाकिस्तानात जाणार; अटारी बाॅर्डर हळहळली
Sachin Kurmi : दादांच्या कार्यकर्त्याची भायखळ्यात हत्या, सचिन कुर्मींच्या हत्येमागचा आका कोण? दक्षिण मुंबईत पोस्टर्स
दादांच्या कार्यकर्त्याची भायखळ्यात हत्या, सचिन कुर्मींच्या हत्येमागचा आका कोण? दक्षिण मुंबईत पोस्टर्स
India Banned 16 Pakistani YouTube channels : डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज ते शोएब अख्तर सुद्धा! केंद्र सरकारकडून 16 पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या युट्यूब चॅनेलवर बंदी
डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज ते शोएब अख्तर सुद्धा! केंद्र सरकारकडून 16 पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या युट्यूब चॅनेलवर बंदी
Solapur APMC Election Result: सोलापूर APMC निवडणुकीच्या 4 जागांचा निकाल जाहीर, भाजप विरुद्ध भाजप आमदारांमध्येच चुरस, कोण विजयी?
सोलापूर APMC निवडणुकीच्या 4 जागांचा निकाल जाहीर, भाजप विरुद्ध भाजप आमदारांमध्येच चुरस, कोण विजयी?
Bhandara Accident News: भरधाव बोलेरो ट्रकवर आदळली, कारचा चेंदामेंदा, चौघांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू
भरधाव बोलेरो ट्रकवर आदळली, कारचा चेंदामेंदा; चौघांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू, भंडाऱ्यातील घटना
Beed News : बीडमध्ये किती पाकिस्तानी नागरिक? पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून आकडेवारी जाहीर!
बीडमध्ये किती पाकिस्तानी नागरिक? पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून आकडेवारी जाहीर!
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तामध्ये असंतोषाचा भडका उडाला, मुंगी शिरायलाही जागा नाही इतकी गर्दी, POKच्या गिलगिटमध्ये आंदोलन
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तामध्ये असंतोषाचा भडका उडाला, मुंगी शिरायलाही जागा नाही इतकी गर्दी, POKच्या गिलगिटमध्ये आंदोलन
India Vs Pakistan army: कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता अन् पाकिस्तानी लष्करात धडाधड राजीनामे, नेमकं काय घडलं?
कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता अन् पाकिस्तानी लष्करात धडाधड राजीनामे, नेमकं काय घडलं?
Embed widget