एक्स्प्लोर

Union Budget 2023 Railway : रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद, अर्थमंत्र्यांची घोषणा

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी जाहीर केलं.

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी भारताला वंदे भारत 2.0, हायड्रोजन ट्रेनची भेट दिली आहे. यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही त्यांनी जाहीर केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. 2013 सालचा विचार करता नऊ पटीने बजेट वाढवल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

रेल्वेमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. तसंच रेल्वेमध्ये 100 नवीन महत्त्वाच्या योजनांची लागू करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

दरम्यान अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. जगात भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. त्या म्हणाले की, कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली."

2013-14 च्या तुलनेत यंदा रेल्वेसाठी नऊ पट अधिक वाटप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. रेल्वेवर आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या आर्थिक वर्षात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपये खर्च होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आतापर्यंतची ही सर्वाधिक तरतूद आहे. 2013-14 च्या तुलनेत हे नऊ पटीने जास्त वाटप असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वे बजेटबाबत बोलताना अर्थमंत्री काय म्हणाल्या?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार संपूर्ण रेल्वे प्रणालीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी रेल्वे बजेटमध्ये 20-25 टक्क्यांनी वाढ करण्यावर काम करत आहे, असं निर्मला सीतारमण यांनी  सांगितलं. मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनवर लक्ष केंद्रित केलं होतं. यंदाच्या अर्थसंकल्पातही यालाच सरकारचे प्राधान्य राहणार आहे असल्याचं त्या म्हणाल्या.

या वर्षी, रेल्वेला देण्यात येणारा निधी नवीन ट्रॅक टाकण्यासाठी, अर्ध-हाय-स्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी, हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तसेच अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जाईल, असं अर्थमंत्री यांनी जाहीर केलं.

यंदा 2,35,000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा

2022-23 मध्ये, वृद्धांना भरघोस अनुदानासह प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या बहुतांश सवलती बंद केल्यानंतर रेल्वेने मोठ्या प्रमाणात बचत केली होती. तसंच मार्गांच्या विद्युतीकरणामुळेही बचत झाली होती. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 2022-23 मध्ये आतापर्यंत 41,000 कोटी रुपयांचा अधिक महसूल कमावल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. भारतीय रेल्वेला या आर्थिक वर्षात एकूण रु. 2,35,000 कोटी महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget