(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture Sector Budget 2022 : 'ड्रोन शक्ती' म्हणजे काय? अर्थशंकल्पात विशेष तरतूद
Agriculture Sector Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प 2022 सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी ड्रोन शक्तीचा उल्लेख केला आहे.
Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज म्हणजेच, 1 फेब्रुवारी 2022 (Budget 2022) रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प 2022 सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी ड्रोनच्या वापराबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. विविध अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून ड्रोन पॉवरसाठी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. या माध्यमातून ड्रोनचा सेवा म्हणून वापर करण्यावर काम केले जाणार आहे.
कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर
त्यांनी सांगितले की, सर्व राज्यांतील निवडक आयटीआयमध्ये आवश्यक कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले जातील. या अर्थसंकल्पात ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे सांगण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरावर भर देण्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, 'पिकांचं मूल्यांकन करण्यासाठी, जमीन व्यवहारांची खरेदी-विक्रीचं डिजिटलायझेशन, किटकनाशकं आणि पोषक तत्वांच्या फवारणीसाठी शेतकरी ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याशिवाय, निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सह-गुंतवणूक मॉडेल अंतर्गत निधी गोळा केला जाईला. ज्याचा वापर कृषी आणि ग्रामीण उद्योगांमध्ये करण्यात येईल.
दरम्यान, केंद्र सरकार एकीकडे सेंद्रीय शेतीला प्राधान्य देण्याचं आवाहन करतंय. तर दुसरीकडे शेतीसाठी किटकनाशकं आणि इतर औषधांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर करण्यास सांगतंय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच केंद्र सरकारचा नेमका हेतू काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यंदा येणार 5G, अर्थमंत्री निर्मला सीतारमण
सध्या इंटरनेट हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आता आपण 4जी (4G) स्पीड इंटेरनेट सुविधा पावरत आहोत, त्याआधी 3जी (3G) सुविधा वापरात होती. इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यासाठी आता लवकरच भारतातही 5जी (5G) सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. 5जी सुविधा भारताला प्रगतीकडे एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहे.
सीतारमण यांनी सांगितले की, 2022 मध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या 5G मोबाइल सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव (Spectrum Auction) आयोजित केला जाईल. ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारे ब्रॉडबँड (Broadband) आणि मोबाईल कम्युनिकेशन (Mobile Communication) सक्षम करण्यासाठी PLI योजनेचा एक भाग म्हणून 5G इकोसिस्टमसाठी डिझाईन नेतृत्वाखालील उत्पादनाची योजना सुरू केली जाईल. परवडणारी ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी, निधी अंतर्गत वार्षिक संकलनाच्या 5 टक्के वाटप केले जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Agriculture sector Budget 2022 : 2021-22 मध्ये 1 कोटी 63 लाख शेतकऱ्यांकडून 1208 मेट्रिक टन गहू आणि धान खरेदी करणार
- No Change in Tax Slabs: महत्त्वाची बातमी! कर रचना 'जैसे थे', कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा
- Union Budget 2022: '60 लाख नवे रोजगार निर्माण करणार', अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha