मोठी बातमी! फॉक्सकॉन कंपनीची मोठी घोषणा, 1200 कोटींचा खर्च करणार, 40 हजार लोकांना रोजगार मिळणार
फॉक्सकॉन कंपनीने (foxconn) मोठी घोषणा केली आहे. फॉक्सकॉन कंपनी भारतात (India) 1200 कोटी रुपये खर्च करून 40 हजार रोजगार निर्माण करण्याच्या तयारीत आहे.
Business News : आयफोन बनवणारी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने (foxconn) मोठी घोषणा केली आहे. फॉक्सकॉन कंपनी भारतात (India) 1200 कोटी रुपये खर्च करून 40 हजार रोजगार निर्माण करण्याच्या तयारीत आहे. फॉक्सकॉनचा भारतातील व्यवसाय 2024 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाणार आहे. त्यामुळं रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत.
Foxconn ने त्याच्या कर्नाटक स्थित कंपनी Hon High Technology India Mega Development Private Limited मध्ये सुमारे 1,200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. Foxconn Singapore Pvt. या कंत्राटी आयफोन उत्पादन कंपनीच्या सिंगापूर युनिटने अलीकडेच 10 रुपये प्रति शेअर दराने Foxconn Hon Hi Technology India Mega Development Pvt Ltd चे 120.35 कोटी पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले आहेत. कर्नाटक सरकारने गेल्या आठवड्यात एका निवेदनात म्हटले होते की फॉक्सकॉन डोड्डा बल्लापूरजवळ एक प्रचंड उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 25000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळं 40000 रोजगार निर्माण होतील.
चीन नंतर भारतातील दुसरा सर्वात मोठा प्लांट
कर्नाटकमध्ये असलेले हे युनिट लवकरच फॉक्सकॉनचा चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा प्लांट असेल. यातून 40000 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. फॉक्सकॉनचा भारतातील व्यवसाय 2024 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाणार आहे. अलीकडील गुंतवणुकीसह, फॉक्सकॉन सिंगापूरने कर्नाटक युनिटमध्ये एकूण 13,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. कर्नाटक सरकारने फॉक्सकॉनला राज्यातील आगामी मोबाइल उत्पादन युनिटसाठी 300 एकर जमीन दिली आहे.
भारतात आतापर्यंत 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक
फॉक्सकॉनने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आतापर्यंत भारतात 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. आम्ही येत्या वर्षात बरेच काही करु अशी माहिती सीईओ यंग लिऊ यांनी दिली.