धक्कादायक! नोकरी करणं कठीण, 57 टक्के नोकऱ्यांमध्ये 20 हजारांपेक्षा कमी पगार, मुलभूत गरजा पूर्ण करणही अवघड
भारतातील खासगी क्षेत्रात नोकरी (Private sector job) करणं कठीण झालं आहे. कारण खासगी क्षेत्रात नोकरी (job) करणाऱ्या बहुतेक लोकांची स्थिती दयनीय आहे.
Private Sector Job News: भारतातील खासगी क्षेत्रात नोकरी (Private sector job) करणं कठीण झालं आहे. कारण खासगी क्षेत्रात नोकरी (job) करणाऱ्या बहुतेक लोकांची स्थिती दयनीय आहे. मिळालेल्या पगारातून तो खाण्यापिण्याचा खर्च कसा तरी भागवू शकतो. घर, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही त्यांची धडपड सुरू आहे. यातील बहुतांश लोक बचतीचा विचारही करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. वर्क इंडियाच्या अहवालात (WorkIndia repor) याबबातची माहिती देण्यात आली आहे.
57.63 टक्के खासगी नोकऱ्यांमध्ये 20,000 रुपयांपेक्षा कमी पगार
अनेक ठिकाणी खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना 20 हजार रुपयांपेक्षाही कमी पगार मिळत आहे. त्यामुळं समाजातील मोठ्या वर्गाला आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. वर्क इंडियाच्या अहवालानुसार, 57.63 टक्के खासगी नोकऱ्यांना 20,000 रुपये किंवा त्याहून कमी पगार आहे. अशा परिस्थितीत या लोकांना किमान वेतनही दिले जात नाही. सुमारे 29.34 टक्के खासगी नोकऱ्या या मध्यम उत्पन्न गटातील आहेत. यातील वेतन 20,000 ते 40,000 रुपये प्रति महिना आहे. या वर्गात मोडणाऱ्यांच्या जीवनात थोडीफार सुधारणा होते. पण, त्यांना आरामदायी राहणीमान गाठता येत नाही. या श्रेणीत येणारे लोक आपला दैनंदिन खर्च भागवत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
कमी वेतनाच्या नोकऱ्यांमुळे असमानता
वर्क इंडियाचे सीईओ नीलेश डुंगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी वेतनाच्या नोकऱ्यांमुळे असमानता निर्माण होत आहे. यामुळं केवळ आर्थिक आव्हानेच नाहीत तर सामाजिक स्थिरतेवरही नकारात्मक परिणाम होत आहे. त्यासाठी कौशल्य विकास, वेतन सुधारणा आणि उच्च वेतनाच्या संधी निर्माण कराव्या लागतील. केवळ 10.71 टक्के लोक 40,000 ते 60,000 रुपये प्रति महिना पगार मिळवू शकतात अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये अशा पदांची संख्या खूपच कमी आहे. केवळ 2.31 टक्के खासगी नोकऱ्या लोकांना 60 हजार रुपयांपेक्षा जास्त कमावण्याची संधी देऊ शकतात.
डिलिव्हरी नोकऱ्यांना सर्वात वाईट पगार
वर्क इंडिया प्लॅटफॉर्मवरील 2 वर्षांच्या जॉब डेटाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील 24 लाखांहून अधिक नोकऱ्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये फील्ड सेल्स पोझिशन्स सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या आहेत. यानंतर बॅक ऑफिस जॉब आणि टेली कॉलिंग आहे. यामध्ये 40 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जात आहे. अकाउंटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट क्षेत्रातील नोकऱ्या देखील चांगला पगार देतात. याशिवाय शेफ आणि रिसेप्शनिस्टही चांगली कमाई करत आहेत. पण डिलिव्हरी नोकऱ्यांना सर्वात वाईट पगार असतो.
महत्वाच्या बातम्या:
10 वी ते पदवी उमेदवारांना मोठी संधी; 400 जागांसाठी भरती सुरु; फक्त वयाची अट लागू, झटपट अर्ज करा!