Highest Interest Rates : फिक्स डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका, पाहा लिस्ट
ज्येष्ठ नागरिक अशा पर्यायांचा शोध घेतात जिथे जास्तीत जास्त व्याज दिले जाते आणि त्यांचे पैसे सुरक्षित असतात. त्यामुळे अशा खासगी बँकांची माहिती घेऊयात जिथे फिक्स डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज मिळत आहे.
मुंबई : भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक महत्वाची आहे. मात्र गुंतवणूक कुठे करावी असा अनेकांना प्रश्न असतो. त्यामुळे जास्त धोका न पत्करता अनेक जण फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीस प्राधान्य देता. फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. मात्र यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, बहुतेक गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त व्याज मिळावे अशी अपेक्षा असते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक अशा पर्यायांचा शोध घेतात जिथे जास्तीत जास्त व्याज दिले जाते आणि त्यांचे पैसे सुरक्षित असतात. त्यामुळे अशा खासगी बँकांची माहिती घेऊयात जिथे फिक्स डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज मिळत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या एक वर्षात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तो आता 4 टक्क्यांच्या जवळपास आहे. यामुळे बहुतेक बँकांनी फिक्स डिपॉझिट दर कमी केले आहेत. एफडीवर मिळणारे व्याज करपात्र आहे, त्यामुळे एफडीवर मिळणाऱ्या रिर्टन्सचा फायदा कमी होतो.
जर तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर येथे काही खाजगी बँका आहेत ज्या सर्वाधिक व्याज देत आहेत. हे दर एक कोटी रुपयांपेक्षा कमी आणि पाच वर्षांच्या मुदतीच्या एफडीसाठी व्याजदर आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळते.
कोणती बँक किती व्याज देते?
- डीबीएस बँक (DBS Bank)- 5.70 ते 6.50 टक्के
- इंडसेंड बँक (IndusInd Bank)-5.50-6.50 टक्के
- RBL बँक-5.40-6.50 टक्के
- येस बँक (Yes Bank)-5.25-6.50 टक्के
- टीएनएससी बँक (TNSC Bank)-5.75-6.00 टक्के
- IDFS Fist बँक-5.25-6.00 टक्के
- Karur Vysya Bank - 4.25-6.00 टक्के
- अॅक्सिस बँक (Axis Bank) -4.40-5.75 टक्के
- दक्षिण भारतीय बँक- 4.50-5.65 टक्के
इतर बातम्या