घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गृहकर्जावरील व्याजदरात कपात, 'या' बँकेनं घेतला मोठा निर्णय
तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे.

Home Loan Rates News : जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ बडोदाने आज शुक्रवारी (4 जुलै) गृहकर्जावरील व्याजदर 5 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) म्हणजेच 0.05 टक्के कमी केला आहे. यासह, आता गृहकर्जावरील वार्षिक व्याजदर 7.45 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय, बँकेने नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे.
जूनमध्ये व्याजदरही कमी करण्यात आला होता
यापूर्वी 6 जून रोजी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर, बँकेने गृहकर्जावरील व्याजदर 8 टक्क्यांवरून 7.50 टक्के कमी केला होता. आता तो आणखी 5 बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आला आहे. सीएनबीसीच्या अहवालानुसार, बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार म्हणाले, "गृहकर्ज दरातील या नवीन कपातीचे उद्दिष्ट घर खरेदी करण्याच्या लोकांच्या इच्छेला पाठिंबा देणे आणि क्रेडिट ग्रोथ वाढवणे आहे." तुम्ही गृहकर्जासाठी डिजिटल किंवा शाखेत अर्ज करू शकता.
या बँकांनीही गृहकर्जाच्या व्याजदरात केली कपात
बँक ऑफ बडोदा व्यतिरिक्त, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडिया (बीओआय) यांनीही त्यांचे गृहकर्ज स्वस्त केले आहे. या सर्व बँकांनी जुलैमध्ये त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआरमध्ये 5 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. या दर कपातीमुळे, पीएनबीचा ओव्हरनाइट एमसीएलआर 8.25 टक्क्यांवरून 8.20 टक्क्यांवर आला आहे. त्याच वेळी, 1 महिन्याचा एमसीएलआर 8.35 टक्के, 3 महिन्यांचा 8.55 टक्के आणि 3 वर्षांचा एमसीएलआर 9.20 टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, इंडियन बँकेच्या 8.20 टक्के ओव्हरनाइट एमसीएलआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1 महिन्याचा एमसीएलआर 8.40 टक्के, 3 महिन्यांचा एमसीएलआर 8.60 टक्के, 6 महिन्यांचा एमसीएलआर 8.85 टक्के, 1 वर्षाचा एमसीएलआर 9.00 टक्के करण्यात आला आहे.
बँक ऑफ इंडियाचा ओव्हरनाईट एमसीएलआर 8.10 टक्के, 1 महिन्याचा एमसीएलआर 8.40 टक्के, 3 महिन्यांचा एमसीएलआर 8.55 टक्के, 6 महिन्यांचा एमसीएलआर 8.80 टक्के, 1 वर्षाचा एमसीएलआर 9.00 टक्के आणि 3 वर्षाचा एमसीएलआर 9.15 टक्के करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदा व्यतिरिक्त, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडिया (बीओआय) यांनीही त्यांचे गृहकर्ज स्वस्त केले आहे. या सर्व बँकांनी जुलैमध्ये त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआरमध्ये 5 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे.
महत्वाच्या बातम्या:



















