एक्स्प्लोर

Bachchu Kadu protest in Mumbai: तर उलटं टांगू; 7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही; बच्चू कडूंचं आज मुंबईत आंदोलन

Bachchu Kadu protest in Mumbai: बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी जूनमध्ये आंदोलन केले होते. मोझरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी त्यांनी उपोषण केले होते.

 Bachchu Kadu protest in Mumbai: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आपल्या ठाम शैलीत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिल माफीसाठी आज मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे.  7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही, अन्यथा उलटं टांगू, असा इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी जूनमध्ये आंदोलन केले होते. मोझरीमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी त्यांनी उपोषण केले होते.

महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, अशी घोषणा केली होती. त्यानुसार ती द्यावी अशी त्यांची मागणी होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कडू यांची मनधरणी करण्यासाठी पोहोचले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा शिष्टाई केली होती. राज्य शासनाने यावर एक समिती स्थापन करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होती. त्यानंतर कडू यांनी उपोषण स्थगित केले. मात्र समिती स्थापनेस होत असलेली दिरंगाई लक्षात घेता त्यांनी 7 जुलैपासून पुन्हा पदयात्रा काढण्याचा इशारा दिला. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर तीन जुलैला मंत्रालयात बैठक लावण्यात आली आहे. महसूलमंत्री बावनकुळे बैठकीला उपस्थित राहतील.

महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली

दुसरीकडे, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं संकट पुन्हा एकदा गंभीर बनलं आहे. यंदा 1 मार्च ते 31 मे 2025 या कालावधीत राज्यात तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती राज्य शासनाने अधिकृतपणे जाहीर केली असून, मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा भागातील जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. आर्थिक अडचणी, नापिकी, कर्जाचा बोजा आणि विमा भरपाईचा अभाव यामुळे शेतकऱ्यांवर असह्य ताण निर्माण झाला आहे. लातूर, यवतमाळ, अकोला, बीड, नांदेड आणि अमरावती या जिल्ह्यांत आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, कृषी विभागाने सुसंगत मदत योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं असून, आत्महत्येची कारणमीमांसा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget