Ashish Kumar Chauhan : आशिष कुमार चौहान NSE चे नुतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
आशिष कुमार चौहान (Ashish Kumar Chauhan) हे देशातील प्रमुख एक्सचेंज (NSE) चे पुढील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. सेबीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
Ashish Kumar Chauhan : आशिष कुमार चौहान (Ashish Kumar Chauhan) हे देशातील प्रमुख एक्सचेंज (National Stock Exchange- NSE) चे पुढील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. भांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI) त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. आशिष कुमार चौहान सध्या BSE चे MD आणि CEO आहेत. NSE चे नवीन MD म्हणून त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल. ते विक्रम लिमये यांच्याकडून पदभार स्वीकारतील, त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ शनिवारी संपला. पात्र असूनही लिमये यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये मुदतवाढ मागितली नाही.
आशिष कुमार चौहान हे NSE च्या संस्थापकांपैकी एक आहेत. NSE आजवरच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात असताना ते पदभार स्वीकारणार आहेत. सद्यस्थितीत प्रशासनातील त्रुटी तसेच को-लोकेशन घोटाळ्याचे आरोप होत आहेत. माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांची को-लोकेशन प्रकरणामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे.त्यांना ईडीने अटक केली आहे.
कोण आहेत आशिष कुमार चौहान?
आयआयटी आणि आयआयएममधून शिक्षण घेतलेले, आशिष कुमार चौहान यांना भारतातील आधुनिक आर्थिक डेरिव्हेटिव्ह्जचे जनक मानले जाते. ते निफ्टी इंडेक्सचा निर्माताही आहेत. ते पहिला स्क्रीन-आधारित ट्रेडिंग प्रोजेक्ट तयार करण्यामध्येही प्रभारी होते. आयडीबीआयमध्ये बँकर म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. ते 2009 पासून बीएसईमध्ये कार्यरत आहेत. 6 मायक्रोसेकंदांच्या प्रतिक्रिया वेळेसह ते जगातील सर्वात वेगवान एक्सचेंज बनण्यास मदत करतात. त्यांनी भारतात मोबाईल स्टॉक ट्रेडिंग सुरू केले. त्यांनी चलन, कमोडिटीज आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, एसएमई, स्टार्ट-अप आणि म्युच्युअल फंड इत्यादी क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Vice President Candidate : पश्चिम बंगलमधील कामगिरीचं फळ? कोण आहेत जगदीप धनकड?
- उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी, नड्डा यांनी केली घोषणा
- Vice President Election 2022: जगदीप धनकड उपराष्ट्रपती होणार का? जाणून घ्या काय आहेत राजकीय समीकरणे
आशिष कुमार चौहान चौहान यांना BSE IPO यशस्वीपणे हाताळण्याचा अनुभव आहे. दुसरीकडे, एनएसई बराच काळ आपला आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तथापि, एनएसई घोटाळ्यात अडकल्यावर त्याची योजना रुळावरून घसरली आहे.