उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी, नड्डा यांनी केली घोषणा
Vice President Election: शनिवारी सायंकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली.
Vice President Election: शनिवारी सायंकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. दुपारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच धनकड यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपत आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट रोजी होणार मतदान
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. देशाचा पुढील उपराष्ट्रपती निवडण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीही होणार असून निवडणुकीचे निकालही लागणार आहेत. उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराच्या नावावर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांचे एकमत झाल्यास मतदानाची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत उपराष्ट्रपतीही सर्वसहमतीने बिनविरोध निवडला जाऊ शकतो. मात्र याची शक्यता कमीच दिसत आहे.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, कधी झाली, कोण जिंकले, कोण हरले?
क्रमांक |
वर्ष |
Date of Poll |
विजेता |
मते |
उपविजेता |
मते |
1 |
1952 |
12-05-1952 |
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (बिनविरोध) |
|||
2 |
1957 |
11-05-1957 |
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (बिनविरोध) |
|||
3 |
1962 |
07-05-1962 |
झाकिर हुसेन |
568 |
एन.सी सामंतसिंहर |
14 |
4 |
1967 |
06-05-1967 |
व्ही व्ही गिरी |
483 |
मोहम्मद हबीब |
193 |
5 |
1969 |
30-08-1969 |
गोपाल स्वरूप पाठक |
400 |
||
6 |
1974 |
27-08-1974 |
बी.डी. जत्ती |
521 |
एन ई होरो |
141 |
7 |
1979 |
27-08-1979 |
मोहम्मद हिदायत उल्लाह (बिनविरोध) |
|||
8 |
1984 |
22-08-1984 |
आर. वेंकटरामण |
508 |
बी.सी. कांबळे |
207 |
9 |
1987 |
07-09-1987 |
शंकर दयाल शर्मा (बिनविरोध) |
|||
10 |
1992 |
19-08-1992 |
के आर नारायणन |
700 |
काका जोगिंदर सिंह |
2 |
11 |
1997 |
16-08-1997 |
कृष्ण कांत |
441 |
सुरजित सिंह |
273 |
12 |
2002 |
12-08-2002 |
भैरोव सिंह शेखावत |
454 |
सुशिलकुमार शिंदे |
305 |
13 |
2007 |
10-08-2007 |
हमीद अन्सारी |
455 |
नजमा ए हेप्तुल्ला |
222 |
14 |
2012 |
07-08-2012 |
हमीद अन्सारी |
490 |
जसवंत सिंह |
238 |
15 |
2017 |
05-08-2017 |
व्यंकय्या नायडू |
516 |
गोपालक्रृष्ण |
244 |