Vice President Candidate : पश्चिम बंगलमधील कामगिरीचं फळ? कोण आहेत जगदीप धनकड?
NDA Vice President Candidate : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली आहे.
NDA Vice President Candidate : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. जगदीप धनकड सध्या पश्चिम बंगालचे (governor of West Bengal ) राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांचं पश्चिम बंगालमध्ये संघर्ष पाहायला मिळतो, यामध्ये जगदीप धनकड यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या याच कामगिरीचं त्यांना बक्षीस मिळाल्याची चर्चा आहे.
जगदीप धनकड (Jagdeep Dhankhar) यांनी 16 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना उप राष्ट्रपती पदाची जबाबदी दिली जाईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण, भाजप प्रत्येकवेळा आपल्या निर्णयाने सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का देत असते, तसाच धक्का आताही दिला. मुख्तार अब्बास नकवी, कॅप्टन अमरिंदर सिंह आणि केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ उप राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत नावं होतं. पण अखेरच्या क्षणी भाजपने जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
जगदीप धनकड यांनी जनता दलमधून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. सुप्रीम कोर्टात ते वकील म्हणूनही कार्यरत होते. आता पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी त्यांच्यावर उप राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सोपवली आहे. 71 वर्षीय जगदीप धनकड हे राजस्थानमधील झुंझनुं जिल्ह्यातील किठाना येथील आहेत. राजस्थानमध्ये जाट समुदायाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांचा मोठा हात आहे.
जगदीप धनकड यांनी राज्यस्थान विद्यापीठातून वकिलीचं शिक्षण घेतले आहे. सुरुवातीला त्यांनी राज्यस्थानमधील हायकोर्टात वकिली केली. ते राजस्थानच्या बार काऊंसिलचे चेअरमनही राहिले आहेत. 1989 मध्ये जगदीप धनकड झुंझनुंमधून खासदार म्हणून निवडून आले होते. चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. 1991 मध्ये जगदीप धनकड यांनी जनता दलाचा राजीनामा देत काँग्रेसवाशी झाले होते. 1993 मध्ये काँग्रेसने त्यांना अजमेरमधील किशनगढमधून आमदारकीचं तिकिट दिले होते. त्यांनी भाजपच्या जगजीत सिंह यांचा दीड हजार मतांनी पराभव केला होती. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांनी खासदारकीची निवडणूकही लढवली, पण त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2003 मध्ये जगदीप धनकड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.