अनंत-राधिका घडवणार इतिहास, लग्नात किती कोटी रुपये होणार खर्च?
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या आलिशान लग्नाला मोठा खर्च येणार आहे. त्यामुळं या दोघांचं लग्न हे देशातील सर्वात महागडं लग्न ठरणार आहे.
Anant Ambani Radhika Merchant Wedding : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchants)लग्न करणार आहे. 1 ते 3 मार्च या कालावधीत गुजरातमधील जामनगर येथे दोघांचा विवाहपूर्व सोहळा पार पडत आहे. प्री-वेडिंग फंक्शनमध्ये बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि बॉलीवूड सेलिब्रिटींसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी येणार आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अनंत-राधिकाच्या आलिशान लग्नाला मोठा खर्च येणार आहे. त्यामुळं या दोघांचं लग्न हे देशातील सर्वात महागडं लग्न ठरणार आहे.
मुकेश अंबानी आपला लहान मुलगा अनंतच्या लग्नावर मोठा पैसा खर्च करणार आहेत. यामध्ये सुमारे 1000 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती मिळतेय. अहवालांवर विश्वास ठेवला तर अनंत अंबानींचे लग्न हे देशातील सर्वात महागडे लग्न ठरेल. देशातील सर्वात महागड्या लग्नांबद्दल बोलायचे झाले तर ईशा अंबानीचे लग्न अव्वल स्थानावर आहे. मुकेश अंबानी यांनी ईशा अंबानीच्या लग्नात 700 कोटी रुपये खर्च केले होते. यानंतर सुब्रत रॉय यांचे लग्न हे दुसरे सर्वात महागडे लग्न ठरले होते. ईशा अंबानीने लग्नात 90 कोटी रुपयांचा लेहेंगा परिधान करून विश्वविक्रम केला होता. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे एकूण बजेट 90-95 कोटी रुपये होते. Siasat.com च्या रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या आलिशान लग्नावर 1000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
अनंत-राधिका करणार विक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अंदाजे 1,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे लग्न सर्वात महागडे लग्न असेल. त्याचबरोबर हे देशातील सर्वात महागडे लग्न ठरणार आहे. बहुतांश खर्च डेकोरेशन आणि लाईव्ह शोवर केला जाणार आहे. मिका सिंगने ईशाच्या लग्नात 10 मिनिटांच्या शोसाठी 1.5 कोटी रुपये घेतले होते. रिहाना अनंतच्या लग्नात लाइव्ह शो करणार आहे. अर्जित सिंग देखील लाईव्ह परफॉर्म करणार आहे.
प्री - वेडिंगची सुरुवात अन्नदानाने
जामनगरमध्ये प्री-वेडिंगला सुरुवात झाली आहे. अनंत-राधिका यांचे लग्न मुंबईत होणार आहे. प्री - वेडिंगची सुरुवात सर्वात श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या अन्नदानाने केली आहे. यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंबाने जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात सुमारे 60 हजार जणांना अन्नदान केले. अंबानी कुटुंब नेहमीच अशा खास प्रसंगी अन्नदान करत असते. हिंदू धर्मात अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखे आहे. अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते.
महत्वाच्या बातम्या: