एक्स्प्लोर

हवाई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सरकारनं 'या' नियमात केला मोठा बदल, प्रवाशांना मिळणार दिलासा

विमान प्रवाशांसाठी (Air passengers) एक महत्वाची बातमी आहे. विमान प्रवासाच्या तिकिटांच्या किमती ठरवण्याच्या संदर्भातील विमान कंपन्यांना असणाऱ्या अधिकारांच्या नियमात बदल (Rule changes) करण्यात आला आहे.

Air Fare News : विमान प्रवाशांसाठी (Air passengers) एक महत्वाची बातमी आहे. विमान प्रवासाच्या तिकिटांच्या किमती ठरवण्याच्या संदर्भातील विमान कंपन्यांना असणाऱ्या अधिकारांच्या नियमात बदल (Rule changes) करण्यात आला आहे. परवडणाऱ्या दरात हवाई प्रवास व्हावा याकडं सरकारचं लक्ष आहे. दरम्यान, सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार आता विमान कंपन्यांना 24 तास अगोदर विमान भाड्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. पूर्वी 24 तास अगोदर विमान कंपन्यांना भाड्याच्या संदर्भात बदल करण्याचा अधिकार होता. 

नेमका नियमात काय केला बदल?

नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी राज्यसभेत हवाई भाड्यांवरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, सामान्यतः सरकार हवाई भाडे नियंत्रित करत नाही. जेव्हा गरज असते तेव्हा, विशेषत: जेव्हा हवाई प्रवासी वाहतूक जास्त असते तेव्हा, वाढत्या भाड्याच्या बाबतीत सरकार हस्तक्षेप करते, जेणेकरून भाडे जास्त वाढवले ​​जावू नये. आतापर्यंत विमान कंपन्या प्रवासाच्या 24 तास आधी भाडे वाढवू किंवा कमी करु शकत होत्या, असा नियम होता. पण आता हा नियम हटवण्यात येणार आहे. यामुळं प्रवासाच्या काही तास आधीही तिकीट खरेदी केले असल्यास, त्याची किंमत प्रवासाच्या वेळेच्या 24 तास आधी होती तशीच राहणार आहे. 

हवाई भाडे प्रवाशांच्या आवाक्याबाहेर जाऊ नये यावर लक्ष

नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी राज्यसभेत सांगितले की, हवाई भाडे प्रवाशांच्या आवाक्याबाहेर जाऊ नये यावर मंत्रालय लक्ष ठेवते. नायडू यांनी सभागृहाला सांगितले की 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये हवाई प्रवास स्वस्त झाला आहे. सणासुदीच्या काळात हवाई तिकिटांच्या किमतीही तुलनेने कमी झाल्या आहेत.

विमान कंपन्यांना भाडे ठरवण्याचा अधिकार पण... 

हवाई प्रवासाच्या तिकिटांच्या किंमती निश्चित करण्याचा अधिकार विमान कंपन्यांना स्वतःला देण्यात आला आहे. जेणेकरुन ते त्यांच्या ऑपरेशनल गरजेनुसार तिकिटांच्या किमती निश्चित करू शकतील. उदाहरणार्थ, जर एखाद्या मार्गावर कमी प्रवासी असतील आणि ऑपरेशनल खर्च जास्त असेल, तर एअरलाइन्स भाडे वाढवून त्यांचे नुकसान वाचवू शकतात. पण अतिरीक्त भाडे वाढ केल्यास सरकारचं देखील लक्ष असेल असं सांगण्यात आलं आहे. विमान प्रवासातही फ्लेक्सी फेअर सिस्टीम लागू करण्यात आली असून, त्यानुसार विमान कंपन्या मागणीनुसार भाडे वाढवू शकतात. प्रवासाची वेळ जवळ येताच भाडे वाढत जाते. सरकारने कोणतीही कॅप लावलेली नाही पण विमान कंपन्यांना निश्चितपणे तिकिटांच्या दरात वाढ न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Viral: अरेच्चा..अवघ्या 74 सेकंदात पूर्ण होतो हा प्रवास? इतका छोटा प्रवास? जगातील सर्वात लहान विमान प्रवासाबद्दल जाणून घ्या..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special ReportSupriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्याAmit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Embed widget