एक्स्प्लोर

Gold Rate Today : ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी! सोन्याच्या दरात 24 तासांत दोन हजार रुपयांची घसरण; वाचा ताजे दर

Gold Rate Price Down : सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारात अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केलेली पाहायला मिळालं आहे.   

Gold Rate Price Down : सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दराने तब्बल साठ हजारांची विक्रमी पातळी गाठली होती. मात्र, गेल्या चोवीस तासांत सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रूपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारात अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केलेली पाहायला मिळालं आहे.   

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यात अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण होईल असा अंदाज सोने व्यावसायिक आणि ग्राहकांना होता. मात्र, अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात एकाच दिवसात साडे अठराशे रुपयांनी वाढ झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह 61,000  हजार रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले होते. त्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या मागे दोन हजार रुपयांची घसरण झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह 59,200 रुपये झाले आहेत.

जागतिक पातळीवर सोन्याचे दर घसरणीचा परिणाम

जागतिक पातळीवर सोन्याचे दर घसरल्याने त्याचा परिणाम म्हणून जळगावच्या सुवर्णनगरीमध्येही सोन्याच्या दरात घसरण झाली असल्याचं सोने व्यावसायिकांनी म्हटलं आहे. यामुळेच भारतीय बाजारपेठेत सोनं खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. 

ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी 

सोन्याचे दर वाढल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली होती. मात्र, आज सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांकडूनही समाधान व्यक्त केलं जातंय. तसेच, भारतात लग्नसराईचा काळदेखील सुरु असल्याने ग्राहकांची सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळतेय. या दरम्यान भविष्यकालीन आर्थिक गुंतवणुकीसाठीही  ग्राहकांनी सोन्या-चांदीचं नाणं गुंतवणूक म्हणून घेणं पसंत केलं आहे.   

सोनं खरेदी करण्यापूर्वी 'अशी' तपासा सोन्याची शुद्धता (Check Gold Purity) 

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Gold Rate Today : दिलासादायक! सोन्याच्या दरांत हजार रूपयांची घट, तर चांदीही स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nutritious Food Pregnant Women : गर्भवती माता पोषण आहारात साप; सखोल चौकशीची मागणी9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaNawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP MajhaBhole Baba Hathras : हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; 121 जणांचा जीव गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
Pankaja Munde Wealth: शेअर मार्केटमध्ये 1 कोटींची गुंतवणूक, 45 तोळे सोनं, पण एकही गाडी नाही, जाणून घ्या पंकजा मुंडेंची संपत्ती
शेअर मार्केटमध्ये 1 कोटींची गुंतवणूक, 45 तोळे सोनं, पण एकही गाडी नाही, जाणून घ्या पंकजा मुंडेंची संपत्ती
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
Embed widget