एक्स्प्लोर

ADB on India GDP : दक्षिण आशियाई देशांचा विकास मंदावला, भारतालाही फटका: आशियाई विकास बँक

ADB on India GDP : आशियाई देशांचा आर्थिक विकास मंदावणार असून भारतालाही त्याचा फटका बसणार असल्याचे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे.

ADB on India GDP : आशियाई देशांच्या विकासाची गती मंदावणार असल्याचा अंदाज आशियाई विकास बँकेने (The Asian Development Bank ) व्यक्त केला आहे.  भारताचा जीडीपी 2022 मध्ये 7.2 टक्के राहणार (India GDP Forecast) असून वर्ष 2023 मध्ये 7.8 टक्के राहण्याचा अंदाज  आशियाई विकास बॅंकेने वर्तवला आहे. भारतासह अनेक देशांचा जीडीपी घसरणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्याशिवाय, महागाईदेखील वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

आशियाई विकास बँकेने भारताच्या विकास दरात घट केली आहे.  एप्रिल 2022 या वर्षात सालात भारताचा जीडीपी 7.5 टक्के,  तर वर्ष 2023 साठी आठ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दक्षिण आशियाई देशांच्या विकास दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज आशियाई विकास बँकेने वर्तवला आहे.

दक्षिण आशियातील महत्त्वांच्या देशांपैकी असलेले श्रीलंका आणि पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. श्रीलंकेत मोठं आर्थिक अरिष्ट निर्माण झालं आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. त्याच्या परिणामी विकासगती मंदावणार असल्याचे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. 

आशियाई देशातील महागाई दरही वाढणार 

वर्ष 2022 मध्ये  महागाई दर 4.2 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी या वर्षात महागाई दर 3.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, पुढील वर्षात हा महागाईचा दर 3.5 टक्के राहणार आहे. याआधी हा दर 3.1 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. 

इंधन दरवाढ, अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई दरात वाढ होणार असल्याचे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. मात्र, महागाई वाढीचा वेग जगातील इतर भागाच्या तुलनेत आशियाई देशात तुलनेनं कमी असल्याचे आशियाई विकास बँकेच्या अहवालात म्हटले आहे. 

विकास दर घसरण्याची काय आहेत प्रमुख कारणं? 

चीनमध्ये कोरोना महासाथीच्या भीतीमुळे लॉकडाउन लावले जात आहे. या सततच्या लॉकडाउनमुळे चीनमधील अर्थचक्र बिघडले आहे. तर, प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये अधिक आक्रमकपणे आर्थिक विकासाकडे पावलं टाकली जात आहे.  रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगातील अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा परिणाम आर्थिक विकासावरही दिसून येत आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

OPEC :  रशिया आणि सौदी अरेबियासह 22 देशांचा मोठा निर्णय, भारतावर नेमका काय परिणाम होणार? 
OPEC :  रशिया आणि सौदी अरेबियासह 22 देशांचा मोठा निर्णय, भारतावर नेमका काय परिणाम होणार? 
Success Story:  पतीचं आणि मुलीचं निधन, डोक्यावर दु:खाचा डोंगर, 15 वर्षानंतर शिक्षण सुरु केलं, अधिकारी होऊन दाखवलं, जिद्दीला सलाम
Success Story:  पतीचं आणि मुलीचं निधन, डोक्यावर दु:खाचा डोंगर, 15 वर्षानंतर शिक्षण सुरु केलं, अधिकारी होऊन दाखवलं, जिद्दीला सलाम
SBI ते रेल्वे! युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी, 6 हजार 500 जागांवर भरती सुरु, काय आहे पात्रता? कुठे कसा कराल अर्ज?
SBI ते रेल्वे! युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी, 6 हजार 500 जागांवर भरती सुरु, काय आहे पात्रता? कुठे कसा कराल अर्ज?
RBI Plastic Notes : भारतातील प्लास्टिक नोटांसंदर्भात नवी अपडेट, आरबीआयच्या प्रकल्पासाठी भारत आणि  अमेरिकेतील दोन कंपन्यांचं एकत्र मोठं पाऊल
भारतातील प्लास्टिक नोटांसंदर्भात मोठी अपडेट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रकल्पासाठी दोन कंपन्यांनी लावली बोली

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Embed widget