एक्स्प्लोर

Adani Wilmar Share : अदानी विल्मरचे गुंतवणूकदार मालामाल; 20 टक्क्यांच्या उसळीने अप्पर सर्किट

Adani Wilmar Share Price Upper Circuit : अदानी समूहाची कंपनी 'अदानी विल्मर'च्या शेअरला आज अप्पर सर्किट लागले.

Adani Wilmar Share Price Upper Circuit : अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेअर बाजारात मंगळवारी सूचीबद्ध झालेल्या अदानी विल्मरच्या शेअरमध्ये आज बुधवारी 20 टक्क्यांची उसळण घेतली. आयपीओमध्ये शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांना दोन दिवसात 5500 चा फायदा झाला आहे. 

बुधवारी,  शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले होते. बाजारातील व्यवहार सुरू होताच स्टॉक 10 टक्क्यांनी वधारला. त्यानंतर सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास अदानी विल्मरचा स्टॉक 18 टक्क्यांनी वधारून 313.05 रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर लागलीच शेअर 20 टक्क्यांनी वधारला आणि अप्पर सर्किट लागले. मंगळवारी शेअर बाजारात अदानी विल्मर स्टॉक लिस्ट होताना चार टक्क्यांच्या डिस्काउंटवर 221 रुपये प्रति शेअर दरावर लिस्ट झाला होता. त्यानंतर शेअरमध्ये चांगली खरेदी होऊ लागल्याने दिवसअखेर जवळपास 16 टक्क्यांनी वधारला आणि 265.20 रुपयांवर बंद झाला. 

गुंतवणूकदारांची कमाई 

अदानी समूहाच्या या शेअरने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. आयपीओमध्ये एक लॉट मिळालेल्या गुंतवणूकदाराचा 5500 रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीच्या आयपीओत एका लॉटमध्ये 65 शेअर होते. 

शेअर बाजारात तेजी 

मागील काही सत्रात घसरण सुरू असणारा शेअर बाजार आज वधारला आहे. बुधवारी शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली. प्री-ओपनिंगपासून सकारात्मक संकेत देणारा शेअर बाजार व्यवहार सुरु होताच 0.60 टक्क्यांनी वधारला. आज सेन्सेक्स, निफ्टीत चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे. 

प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला. बाजारातील व्यवहार सुरू होताच किंचीत घसरण झाली. मात्र, बाजार पुन्हा 330 अंकांनी वधारत 58,100 अंकावर पोहचला होता. त्यानंतर सेन्सेक्स 539 अंकांनी वधारला होता. निफ्टीदेखील वधारला होता. निफ्टी 17,380 अंकांवर ट्रेड करत होता. 

जागतिक बाजारपेठांमधील तेजीचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर दिसून आला. आशियाई बाजारपेठा देखील तेजी दिसून आली. सिंगापूरमधील इंडेक्स SGX Nifty देखील वधारला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Embed widget