
Lenovo Mobile Phones
ही हॉंगकॉंगस्थित मल्टीनॅशनल कंपनी संगणक संबंधी हार्डवेअर आणि इलेक्टॉनिक्स वस्तूंचे उत्पादन आणि विक्री करते. 1984 साली स्थापन झालेल्या या कंपनीने 2012 साली अँड्रॉइड फोन उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला. 2014 साली लिनोवोने गुगलकडून मोटोरोला या कंपनीची मालकी हक्क प्राप्त केली. अलिकडच्या काळात या कंपनीने Legion Phone Dual हा 5G मोबाईल लॉंच केला आहे. हा विशेषत: गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर वापरला आहे. तसेच 12 GB RAM ची सुविधा आहे. 256 GB इंटरनल स्टोरेज आहे. मागील बाजूस 64MP व 16 MP तर पुढील बाजूला 20 MP कॅमेराची सुविधा आहे. याला 2500mAh च्या दोन बॅटऱ्या आहेत तर 1080x2340 पिक्सेल रिझोल्यूशन सहित 6.59 इंचचा डिस्प्ले आहे.
TV
Appliances
Accessories





























