Amazon Mega Home Summer Sale | अॅमेझॉनचा मेगा होम समर सेल; AC, फ्रिजवर बंपर सूट
अॅमेझॉनच्या या मेगा होम समर सेलमध्ये सॅमसंग, व्हर्लपूल, एलजी, वोल्टास, सिम्फॉनीसह अनेक ब्रँन्ड्सच्या प्रोडक्ट्सवर मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

मुंबई : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर मेगा होम समर सेलची सुरुवात झाली आहे. साच मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये होम अप्लायसेंसपासून टीव्ही, फर्निचर, खेळण्यांसोबत अनेक प्रोडक्ट्सवर मोठ्या ऑफर्स मिळत आहेत. तुम्हालाही उन्हाळ्यात घरासाठी काही खरेदी करायची असेल तर ही संधी गमावू नका. या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट ऑफरही देण्यात येत आहेत.
या आहेत ऑफर्स
अॅमेझॉनच्या या मेगा होम समर सेलमध्ये सॅमसंग, व्हर्लपूल, एलजी, वोल्टास, सिम्फॉनीसह अनेक ब्रँन्ड्सच्या प्रोडक्ट्सवर मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत कमीत कमी साडे सात हजार रुपयांची खरेदी केल्यानंतर HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड ईएमआय आणि डेबिट कार्ड ईएमआयमार्फत पैसे भरल्यानंतर दहा टक्क्यांचा इंस्टंट डिस्काउंट देण्यात येत आहे. दरम्यान, या ऑफर्समध्ये जास्तीत जास्त दीड हजार रुपयांची सूट मिळत आहे. याव्यतिरिक्त या सेलमध्ये अफोर्डेबल नो-कॉस्ट ईएमआई, एक्सचेंज ऑफर्स, शेड्यूल डिलीवरी आणि इंस्टॉलेशन यांसारख्या ऑफर्सही अवेलेबल आहेत.
कोणत्या प्रोडक्ट्सवर किती डिस्टाउंट?
या सेलमध्ये सॅमसंग, व्हर्लपूल, एलजी, गोदरेज, हायर यांसारख्या ब्रँड्सच्या रेफ्रिजरेटर्सवर 35 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही या सेलमध्ये 657 रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर फ्रिज खरेदी करु शकता. सेलमध्ये एनर्जी एफिशिएंट रेफ्रिजरेटर्स 13,790 रुपयांपासून आणि कन्वर्टिबल रेफ्रिजरेटर्स 21,290 रुपयांपासून सुरु असून आकर्षक ऑफर्ससह तुम्ही खरेदी करु शकता.
स्वस्तात मस्त AC
अॅमेझॉनच्या या मेगा सेलमध्ये तुम्हाला 22,999 रुपयांपासून स्प्लिट इन्वर्टर AC उपलब्ध होतील. तसेच 17,490 रुपयांमध्ये विंडो AC ऑर्डर करु शकता. याव्यतिरिक्त अॅमेझॉन बेसिक्सचे स्प्लिट AC तुम्ही केवळ 22,499 रुपयांपासून खरेदी करु शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
