कमाल आहेत WhatsApp चे हे तीन फिचर्स, तुम्ही पाहिले का?
WhatsApp या मेसेजिंग अॅपचा वापर साऱ्या जगभरात केला जात आहे. करोडो युजर्सच्या वापरात हे अॅप आल्यामुळं सहाजिकच त्यामध्ये बदलत्या काळानुसार काही अनोखे फिचर्सही दिले जात आहेत.
मुंबई : WhatsApp या मेसेजिंग अॅपचा वापर साऱ्या जगभरात केला जात आहे. करोडो युजर्सच्या वापरात हे अॅप आल्यामुळं सहाजिकच त्यामध्ये बदलत्या काळानुसार काही अनोखे फिचर्सही दिले जात आहेत. युजर्सना चांगला अनुभव मिळावा या एकमेव हेतूनं WhatsApp कडून नवनवीन फिचर्स वापरात आणले जातात. सध्या आपण लक्ष देणार आहोत WhatsApp च्या अशाच 3 कमाल फिचर्सकडे
QR Code (क्यूआर कोड)
मागील वर्षअखेरीस हे फिचर लाँच करण्यात आलं. याच्या माध्यमातून तुम्ही फोनमध्ये नवे कॉन्टॅक्ट सेव्ह करु शकता. यासाठी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या व्हॉट्सअॅपचा क्यूआर कोड स्कॅन करण्य़ाची आवश्यकता आहे. या फिचरच्या वापरातून तुमचा बराच वेळ वाचणार आहे. मुख्य म्हणजे तुम्ही हा क्यूआर कोड इतरांसोबतही शेअर करु शकता. व्हॉट्सअॅप सेटींगमध्ये तुम्हाला हा पर्याय मिळणार आहे.
IND vs ENG: कसोटी मालिका समाप्त होताच अश्विनच्या पत्नीचं भावनिक ट्विट
Advanced Search Option (एडवांस सर्च ऑप्शन)
आतापर्यंत तुम्हाला या अॅपमध्ये कोणत्याही फाईल अथवा फोटो, व्हिडीओला शोधण्यासाठी त्या कॉन्टॅक्टच्या चॅटबॉक्समध्ये जावं लागत होतं. या अडचणीला दूर करण्यासाठी व्हॉट्सअॅपनं एक फिचर आणलं आहे. अॅपमध्ये सर्वात वरच्या बाजुला तुम्हाला हे फिचर दिसेल. इथं क्लिक करुन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं व्हिडीओ, फोटो आणि एखादं डॉक्युमेंट शोधू शकता.
Disappearing Messages (डिसअपीयरिंग मैसेज)
हे फिचर अनेकांसाठीच उपयोगाचं. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही सर्वाधिक चॅट करता आणि जुने चॅट आपोआप डिलीट करु इच्छिता त्यांच्यासाठी हे फिचर फायद्याचं. ज्या व्यक्तीच्या जुन्या चॅटला तुम्ही डिसअपियर करु इच्छिता त्या चॅटबॉक्समध्ये जाऊन डिसअपियर मेसेज ऑन करा. हे फिचर ऑन केल्यानंतर 7 दिवसांपूर्वीचे चॅट डिलीट होतील.