ISRO अंतराळात 19 सॅटेलाईट लॉन्च करणार, 2021 मधील पहिलं अंतराळ अभियान आज
भारतीय अंतराळ अनुसंधान अनुसंधान संघटनेकडून PSLV-C51 च्या माध्यमातून आज सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी 19 सॅटेलाईट लॉन्च करण्यात येणार आहेत. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटरमधून PSLV-C51 लॉन्च करण्यात येणार आहे.
![ISRO अंतराळात 19 सॅटेलाईट लॉन्च करणार, 2021 मधील पहिलं अंतराळ अभियान आज ISRO Space Mission 2021 first space mission today ISRO launch 19 satellites ISRO अंतराळात 19 सॅटेलाईट लॉन्च करणार, 2021 मधील पहिलं अंतराळ अभियान आज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/28133212/isro.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ अनुसंधान अनुसंधान संघटनेकडून (ISRO) PSLV-C51 च्या माध्यमातून आज सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी 19 सॅटेलाईट लॉन्च करण्यात येणार आहेत. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटरमधून PSLV-C51 लॉन्च करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ब्राझीलच्या अमेझोनिया-1 सॅटेलाइटला देखील लॉन्च करण्यात येणार असून त्यासोबत अन्य 18 कमर्शियल सॅटेलाइट्सला प्रक्षेपित केलं जाणार आहे. यातील एक सॅटेलाईट स्पेस किड्ज इंडिया यांनी बनवलं आहे.
स्पेस किड्ज इंडियानं बनवलेल्या सॅटेलाईटमध्ये एक एसडी कार्ड आहे ज्यात भगवद् गीताची इलेक्ट्रॉनिक प्रत अंतराळात पाठवण्यासाठी सुरक्षित केली आहे. सोबतच सॅटेलाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र देखील लावण्यात आलं आहे.
PSLV रॉकेटसाठी मोठं अभियान साल 2021 मधील भारताचं हे पहिलं अंतराळ अभियान आहे. PSLV रॉकेटसाठी हे खूप मोठं अभियान असणार आहे. कारण याच्या उड्डाणाची वेळमर्यादा एक तास 55 मिनिटं आणि 7 सेकंदांपर्यंत असणार आहे. जर लॉन्चिंग व्यवस्थित पार पडलं तर भारताकडून लॉन्च करण्यात आलेल्या सॅटेलाईट्सची संख्या 342 होईल. ISRO नं म्हटलं आहे की, अमेझोनिया -1 च्या मदतीनं अमेझॉन क्षेत्रातील वनांची कत्तल आणि ब्राझीलमधील कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या विश्लेषणांसाठी यूझर्संना रिमोट सेंसिंग डेटा प्रदान करण्यास मदत होईल तसेच वर्तमान संरचना आणखी मजबूत बनू शकेल.
18 अन्य सॅटेलाइट्समधील चार इन-स्पेस मधून आहे. यापैकी तीन सॅटेलाइट्स भारतातील शैक्षणिक संस्थानांच्या यूनिटीसॅट्समधील आहेत. यात श्रीपेरंबदुर स्थित जेप्पीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूरमधील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कोईंबतूरमधील श्री शक्ति इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या संस्थांचा समावेश आहे. अन्य एकाची निर्मिती सतीश धवन सॅटेलाइट स्पेस किड्ज इंडियानं केली आहे तर बाकी 14 एनएसआयएलची निर्मिती आहे.
डिसेंबर 2020 मध्ये केलं होतं कम्युनिकेशन सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण इस्त्रोने 17 डिसेंबर 2020 रोजी नवीन कम्युनिकेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील सतिश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आलं होतं. CMS-01 हा भारताचा 42 वा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. याच्या माध्यमातून भारतीय मुख्य भूमीसोबतच अंदमान- निकोबार आणि लक्षद्विप ही बेटंही कव्हर करण्यात येत आहेत. हा उपग्रह सात वर्षांपर्यंत काम करेल असं सांगण्यात आलं आहे. PSLV-C50 या 44 मीटर उंचीच्या सॅटेलाईटमध्ये चार स्टेजच्या इंजिनचा वापर करण्यात आला होता. हे प्रक्षेपण PSLV या प्रकारातले 22 वे यशस्वी प्रक्षेपण होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)