एक्स्प्लोर
Budget Cars: Maruti ते Tata... पाच लाखांपर्यंतच्या बजेट कार
1/6

टाटा टियागो (TATA Tiago): हॅचबॅक कार घ्यायची असेल तर टाटा टियागो एक उत्तम कार आहे. कंपनीने नुकतच या कारचं लिमिटेड एडिशन लॉन्च केलं आहे. टाटा टियागोमध्ये बीएस 6 इंजिन आहे. कंपनीने या कारचे 6 वेरियंट लॉन्च केले आहेत. या कारची किंमत 4 लाख 60 हजारपासून सुरू होते. या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 86 Ps पावर आणि 113Nm ची टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर ही कार 23 किलोमीटर प्रतिलिटरचा मायलेज देते.
2/6

रेनॉल्ट किगर (Renault Kiger) : सर्वात स्वस्त सब कॉम्पॅक्ट SUV कारमध्ये रेनॉल्ट किगरचा समावेश आहे. या कारची किंमत 5 लाखांपासून सुरु होते. सब कॉम्पॅक्ट SUV किगारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. बीएस 6 हे प्रमाणित 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 71 bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे इंजिन एक 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 99 bhp ची पावर आणि 160Nm ची टॉर्क जनरेट करते. किजरचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि सीटीव्ही गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. कमी बजेटमध्ये SUV चा आनंद घेणाऱ्यांसाठी ही कार सर्वोत्तम पर्याय आहे.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत
बॉलीवूड























