एक्स्प्लोर

आपलं गिरगाव’ कॅलेंडरची वर्षपूर्ती!

आपलं गिरगाव’ कॅलेंडरची वर्षपूर्ती!

आपण ज्या ठिकाणी राहतो, लहानाचे मोठे होतो. त्या घराशी जसं आपलं नातं निर्माण होतं, तसं त्या परिसराबद्दलही एक वेगळी ओढ, आपुलकी वाटत असते. त्यातही जर तुम्ही गिरगावसारख्या सांस्कृतिक माहेरघरात राहात असाल तर हा ओलावा काही वेगळाच असतो. म्हणजे आपले आईवडील, आपले कुटुंबीय हे जसे आपल्यावर संस्कार करत असतात. तसे त्या त्या परिसराचेही आपल्यावर संस्कार होत असतात, असं मी मानतो. गिरगाव बाबतीत माझं असंच आहे.

त्याच गिरगावचं ऋण व्यक्त करण्यासाठी (जे कधीच फिटू शकत नाही) आम्ही सरत्या वर्षात एक वेगळा प्रयत्न केला, तो गिरगाव कॅलेंडरच्या माध्यमातून. ‘आपलं गिरगाव 2020’ ही दिनदर्शिका आम्ही प्रकाशित केली. ज्यामध्ये अरुण पुराणिक, दिलीप ठाकूर ही दोन ज्येष्ठ लेखक, अभ्यासक मंडळी जी माजी गिरगावकर आहेत, जी मनाने खरं तर अजूनही गिरगावातच आहेत. या दोघांचाही मोलाचा वाटा आहे. तसंच निल क्रिएशनचे बाळा अहिरेकर आणि या प्रोजेक्टसाठी आमच्या मागे बळ उभे करणारे स्थानिक राजकीय नेते पांडुरंग सकपाळ यांच्या गिरगावप्रेमाशिवाय हे अधुरंच राहिलं असतं कदाचित. त्यामुळे ही चार मंडळी या गिरगाव कॅलेंडरचे चार खांब आहेत.

आज 2020 संपत आलेलं असताना, या कॅलेंडरच्या निर्मितीचा गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेला प्रवास डोळ्यासमोर तरळला. त्यासाठी विषयांची निवड, कोणी कोणता विषय लिहायला घ्यायचा. तो या एका पानामध्ये सामावण्यासाठी काय करायचं. या सगळ्याबद्दल ठाकूर, आणि पुराणिकांसोबत काही मीटिंग्ज केल्या. ज्याचा फायदा कॅलेंडरच्या निर्मितीत खूप झाला. खरं तर ही दोन्ही मंडळी प्रचंड अभ्यासू, माहितीचा खजिना असलेली. त्यामुळे कॅलेंडरच्या एका पानावरच मावेल इतका लेख त्यांना लिहायला सांगणं, तो जास्त होत असेल तर त्यांना तसंही सांगणं, हे मी रोखठोकपणे केलं. या दोघांचंही मोठेपण हे की, त्यांनी माझ्याही सूचनांचा आदर केला. टीमवर्कचं उत्तम उदाहरण म्हणजे हे कॅलेंडर, असं मी म्हणेन. दुसरी एक बाब म्हणजे गिरगाव प्रेम हा या कॅलेंडरच्या निर्मितीमागचा समान धागा असल्याने आम्हाला तिघांना काम करणं सोपं गेलं. वयाची साठी पार केलेली ही दोन्ही ज्येष्ठ मंडळी अंधेरी, बोरीवलीहून गिरगावात येत. प्रुफ चेकिंग, पेज मेकिंगमध्ये अगदी बारकाईने इंटरेस्ट घेत. हे गिरगाव कॅलेंडर फक्त एक कॅलेंडर नसून ते आपल्या तिघांचं बाळ आहे, असं आम्ही तिघांनीही मानलं आणि काम केलं. ठाकूर, पुराणिक यांच्यासोबत एबीपी माझावर फ्लॅशबॅक या सिनेमाशी संबंधित शोमध्ये खूप एपिसोड्स एकत्र काम केल्याने, मला त्यांची आणि त्यांना माझी काम करण्याची पद्धत माहिती होती. ही नस माहिती असल्याचा फायदाच या कॅलेंडरसाठी झाला. या कॅलेंडरच्या मीटिंग्जच्या निमित्ताने मलाही गिरगावबद्दल अनेक अपरिचित गोष्टी कळल्या. मॅजेस्टिक थिएटरमधील सिनेमासाठी होणारं डेकोरेशन असेल किंवा मग काही खाण्याचे अड्डे असोत. आपण किती समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत भागात राहतोय, याची जाणीव पुन्हा एकदा झाल्याने अभिमान वाटला.

या कॅलेंडरचं टायमिंगही मला फार महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आज गिरगाव आणि परिसरात 90-100 वर्षांच्या चाळींचं अस्तित्त्व टिकून आहे. त्याच वेळी टॉवर्सच्या गगनचुंबी इमारतीही उभ्या राहतायत. यामुळे आणखी 10 वर्षांनी गिरगावचं रुपडं काय असेल, असाही विचार आम्हा तिघांच्या मनात आला. या चाळींमधला आपलेपणा, तिथले सण, उत्सव, तिथली जीवनशैली हा खरं तर गिरगावचा आत्मा आहे. या निमित्ताने आम्हा तिघांनाही आपापलं बालपण, त्या काळातलं वातावरण अनुभवता आलं. म्हणजे 2019 मध्ये वर्षानंतरचं म्हणजे कॅलेंडर साकारत असताना आमचं मन मात्र फ्लॅशबॅकमध्ये गेलं. ते वातावरण, तो काळ कुठेतरी शब्दबद्ध, कॅमेराबद्ध व्हावा, हाच यामागचा हेतू होता. ते साध्य करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला, याचं समाधान आहे.

लेखांसोबतच यातले फोटोग्राफ्सही तितकेच मोलाचे आणि त्या त्या काळातील घटना, तो काळ अधोरेखित करणारे आहेत. याशिवाय सध्याच्या काही फोटोंसाठी बबलू कारेकर या मित्राने केलेलं तसंच फोटोग्राफर सचिन वैद्यसह अनेकांनी सहकार्यही फार मोलाचं. म्हणजे उन्हातान्हात जाऊन फोटो काढून आणणं. मग आम्ही काही फोटो परत काढायला सांगितले तरीही तेही विनातक्रार परत जाऊन काढणं. या सगळ्याबद्दल कोणताही मोबदला न मागणं. गिरगावच्या आणि आमच्या प्रेमापोटी त्याने हे केलं. बबलूसारखी अनेक माणसं या कॅलेंडरच्या निर्मितीसाठी पाठी उभी राहिली. ज्यामध्ये गिरगाव परिसरातील शाळा, कॉलेजेसचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आहेत, प्रार्थनास्थळांचे पुजारी, ट्रस्टी आहेत, राजकीय नेते आहेत, परखड आणि खरं मत व्यक्त करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये आहेत, अनेक लोक आहेत अशा मंडळींचा ऋणनिर्देश आम्ही या कॅलेंडरच्या शेवटच्या पानावर केलाय. या सर्वांच्या सहकार्याशिवाय हा प्रोजेक्ट अधुराच राहिला असता. तसंच कॅलेंडर प्रकाशित झाल्यानंतर त्याला प्रसिद्धी देणारी माध्यमं मग त्यामध्ये वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे दोन्ही आलीच. त्यांचेही खास आभार.

गिरगावबद्दल मनोगत व्यक्त करणारी रमेश देव, सीमाताई, जयंत सावरकर, अशोक सराफ, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण अशी दिग्गज मंडळी यांचेही विशेष धन्यवाद मानायला हवेत. हे सर्वच जण आतून व्यक्त झाले. तेच या कॅलेंडरसाठी हवं होतं.

आपण आपल्या नोकरी व्यवसायात काही ना काही करत असतो. त्यातले चढउतार अनुभवतच असतो. मात्र असं काहीतरी क्रिएटिव्ह जे स्वानंदासाठी, समाधानासाठी केलेलं आहे. ते पूर्ण होणं, ते मुख्यमंत्र्यांच्या हातून प्रकाशित होणं यातला आनंद काही वेगळाच. असं असलं तरीही कॅलेंडर प्रकाशन सोहळ्याला मी काही कारणास्तव पोहोचू नाही शकलो, ही बोच मात्र मनाला कायम राहील. असो.

कोरोना काळ आला नसता तर कदाचित आणखी लोकांपर्यंत हे कॅलेंडर पोहोचवू शकलो असतो. गिरगावच्या माहितीचं संकलन करण्याचा हा प्रयत्न होता, तो मात्र आम्ही पूर्ण झोकून देऊन केला. असंच काहीतरी ज्यावर आपली छाप असेल, जे आपल्या नियमित कामापेक्षा वेगळं असेल, जे मलाही काही देऊन जाईल. असं काम येणाऱ्या काळातही आपल्याकडून व्हावं याच नवीन वर्षासाठी माझ्या अपेक्षा आहेत. आपणा सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी अशाच राहू देत.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
ABP Premium

व्हिडीओ

Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget