एक्स्प्लोर

BLOG | टिकटॉकर विरुद्ध युट्युबर

साधारणपणे सप्टेंबर 2018 ला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, स्नॅपचॅटला मागे टाकून सगळ्यात जास्त डाउनलोड केलं जाणारं टिक टॉक app ठरलं आणि 2020 मध्ये जगभरात टिक टॉक पाचव्या क्रमांकावर सर्वात जास्त डाउनलोड केलं गेलं.

प्रसिद्ध युट्युबर कॅरी मिनाटी आणि टिक टॉकर आमिर सिद्दीकी यांच्यातले वाद आणि त्यांना समर्थन देणारे चाहते, सहकारी यांची चांगलीच जुंपलेली आपल्याला पाहायला मिळत आहे, काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पहिल्या पाच पैकी चार ट्रेंड हे कॅरीच्या बाजूने होते.

सोशल माध्यम वापरून नाविन्यपूर्ण कंटेंट असलेले व्हिडीओ तयार करायचे विविध App आणि त्या कलाकृतींना प्रदर्शित करण्यासाठीचे वेब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आजवर कित्येक लोकांनी आपापल्या करियरची पोळी भाजलेली पाहायला मिळते, बहुतांश तरुणाई या माध्यमांकडे एवढया मोठ्या प्रमाणात वळाली आहे.

साधारणपणे सप्टेंबर 2018 ला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, स्नॅपचॅटला मागे टाकून सगळ्यात जास्त डाउनलोड केलं जाणारं टिक टॉक app ठरलं आणि 2020 मध्ये जगभरात टिक टॉक पाचव्या क्रमांकावर सर्वात जास्त डाउनलोड केलं गेलं, याहून विशेष बाब म्हणजे अमेरिकेहून अधिक म्हणजे भारतात सर्वात जास्त टिक टॉकचे वापरकर्ते तब्बल 119.3 मिलियन इतके आहेत!

याचाच अर्थ टिकटॉक आपल्यापैकी खूप लोकांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असेलही, यामध्ये 15 सेकंदाचे कंटेंट तयार करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने अगदी सहज सुलभ वापरता येईल अशी रचना आहे, यातून केला गेलेला कंटेंट तुफान मनोरंजनाचा केंद्रबिंदू ठरलेला पाहायला मिळतो.

अश्यातच विनोदी रोस्टिंग युट्युबर म्हणजेच कॅरी मिनाटीने टिकटॉकर आमिरच्या प्रश्नांची उत्तरं एका व्हिडीओद्वारे रोस्टिंग करत दिली, सदर व्हिडीओ पाच दिवसात तब्बल 67 मिलियन म्हणजेच 6.7 कोटी वेळा पाहिला गेला आणि त्याला 10 मिलियन म्हणजेच 1 कोटी चाहत्यांनी त्याला पसंद केले, या व्हिडीओमध्ये टिकटॉक क्रिएटर आणि युट्युबर यांच्यात कोण चांगलं काम करतं, व्हिडीओ करण्यासाठी मेहनत घेतं, तसेच पैसा कोण कसा कमावतो. हे सांगत दोघांनी टिकटॉक आणि युट्युबवर जंग सुरू केली. सोबत यांचे समर्थन करायला चाहते आणि इतर क्रिएटर ही उतरले याचाच पडसाद म्हणून युट्युबने कॅरी ने बनवलेला व्हिडीओ हा साईट वरून हटवला, आता नेटिझन्सच म्हणणं होतं की एकाअर्थी युट्युबला डिफेन्स करत असलेला व्हिडीओ युट्युबने का काढला? तर कारण काही असो.

बहुतांश देशामध्ये, मोबाईल धारकांनी कोणते app वापरावे कोणते नको याची यादी दरवर्षी दिली जाते, हे app वापरकर्त्यांची खासगी माहिती ही यातून मिळवतात यावर कित्येक खटले, वाद विवाद नेहमी कानावर पडतात. यामुळेच चक्क चीनने 2017 साली व्हॉट्सअप वर बंदी आणली.

अश्या या माध्यमातील कंटेंट क्रिएटर आणि त्यांना तिथं मिळणार प्रतिसाद यातील चढाओढ हा गंमतीचा विषय ठरतो, यामधून धार्मिक भावना दुखावणे, अफवा पसरवल्या जाण्याच्या प्रकारासोबतच, सामाजिक प्रश्न देखील मांडले जातात, तर काही व्हिडीओ मधून गुन्हेगारी स्वरूपाच्या गोष्टींना समर्थन देणाऱ्या कृती असलेले व्हिडीओ सुद्धा चर्चेचा विषय ठरलेले पाहायला मिळतात यातून जेल ची हवा देखील या क्रिएटर्सने खाल्लेली पाहतो.

कित्येकवेळा सोशल मीडियाद्वारे अनेक छुपे कलाकार ज्यांना त्यांची कला घरबसल्या जगासमोर आणता आली आणि त्याचं भलेही झालेलं पाहण्यात येतं, टिकटॉक आणि युट्युब आणि भविष्यात आणखी येणारे नवीन माध्यमे यातील वॉर हा आगामी काळातही जास्त वाढलेले दिसू शकतात, यामध्ये आपली भूमिका काय, मनोरंजन, ज्ञान, रसग्रहण किंवा नेमके कश्यासाठी आपण इथं आहोत याचा विचार केला पाहिजे, भले कॅरीचा व्हिडीओ डिलीट झाला तरी काही कोटींमध्ये त्याच्या चाहत्यांची भर मात्र पडलेली पाहायला मिळाली!

BLOG | चोरीचा मामला, मनी हाइस्ट

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget