एक्स्प्लोर

BLOG | कोरोनानंतरचं 'डिजिटल आर्ट'!

कोरोनामुळे प्रत्येक उद्योग काही प्रमाणात संकटात सापडले असताना, त्यातून आलेलं आव्हान कसं स्वीकारणार?

सतत बदलत्या इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीमुळे, 'अ‍ॅनिमेशन सेक्टर'ची प्रभावी भूमिका ई-लर्निंग, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, तसेच मेडिकल अ‍ॅनिमेशन क्षेत्रांत पसरली असून, दरदिवशी हे सेक्टर वाढतंच आहे.

चित्रं, रेखाटनं केव्हा सुरू झालं? तर, कलावर्गात आम्हाला कलाशिक्षक एक गोष्ट सांगायचे.

पूर्वी गुराखी त्यांची असंख्य गुरं-ढोरं चरायला घेऊन जाताना, त्या गुरांची संख्या लहान-लहान दगडांनी मोजायचे. त्यासाठी ते दगडांची पिशवी सोबत ठेवत आणि परत गोठ्यात सोडताना तेच एक एक दगड पिशवीतून काढून बाहेर टाकत. जेवढे दगड शिल्लक राहिले, तेवढी गुरं हरवली, किंवा चोरी गेली याचा अंदाज त्यांना यायचा. पण ही गोष्ट सोप्पी नसायची. जेवढी गुरं जास्त, तेवढं दगडांचे ओझं जास्त. त्यांनतर रेषेचा शोध लागला आणि तो गुराखी भिंतीवर उभ्या रेषा मारून गुरांचा हिशोब ठेवू लागला. त्यानंतर, हळूहळू गुहेत चित्र साकारू लागला, यातूनच अक्षरलेखन, सुलेखन प्रकार अस्तिवात आला असावा.

जसं की आपल्याला माहीत आहे, प्रिंट मीडिया, त्यानंतर टेलिव्हिजन मीडिया आणि आत्ता इलेक्ट्रॉनिक मीडियामधील 'व्हर्च्युअल रियालिटी'ने आपल्या प्रत्येकाला एकमेकांना जवळ केलं आहे, किंबहुना बांधून ठेवलं आहे. या लॉकडाऊनच्या काळामुळे आलेलं त्यांचे महत्व आपण तितकंच समजतो. 'डिजिटल आर्ट'मधील सर्वात मोठा कोअर पार्ट म्हणजे 'ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशन'.

BLOG | कोरोनानंतरचं 'डिजिटल आर्ट'!

आज तरुणांमध्ये क्रिएटिव्ह-इनोव्हेटिव्ह बुद्धी ही अधिक सक्षम झालेली पाहायला मिळत आहे. तर, अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ग्राफिक्स, गेमिंग, वेब डिजाईन, 3D आर्किटेक्चर/मेकॅनिकल/मेडिकल/मीडिया ते चित्रपटातील CGI मॉडेल्स या मोजक्याच, परंतु अथांग पसरलेल्या गोष्टींमध्ये हे डिजिटल आर्टचं विश्व पसरलेलं आहे. ह्या प्रत्येक प्रकारांमध्ये दरवर्षी वेगवेगळी जॉब प्रोफाईल तयार झालेल्या पाहायला मिळतात. जसं की सध्या 'VR' (virtual Reality) आभासी सत्यता प्रचलीत झालंय.

कोरोनामुळे प्रत्येक उद्योग काही प्रमाणात संकटात सापडले असताना, त्यातून आलेलं आव्हान कसं स्वीकारणार? आपण पाहिलं तर, 2018 मध्ये 3D मधील ग्लोबल मार्केट USD 13.75 Billion तर, 2025 पर्यंतचा CAGR 11% आहे, अर्थात 12 ते 27% एवढा तो होऊ शकतो. हा अंदाज दरवर्षी कायम वाढत आहे आणि पुढेही कमालीचा वाढण्याची शक्यता भरपूर आहे. याच मुख्य कारण म्हणजे, फक्त एकेकाळी चित्रपटसृष्टीमध्येच जास्त रेलचेल असलेलं काम हे अलीकडे वेगवेगळ्या क्षेत्रांत अगदी प्रामुख्याने आपला ठसा उमटवत आहे. मेडिकल, विज्ञान तसेच ई-लर्निंग, बांधकाम उद्योग, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील वैचारिक-काल्पनिक संकल्पना या चित्ररूपाने ग्राफिक्स, 3D, 2D माध्यमांतून अगदी प्रत्यक्षात उतरत आहेत. आणि या क्षेत्रातील रोजगार ओळखूनच यांचे पदवी शिक्षण आज कित्येक कॉलेज संस्थामधून ते वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थी याचा वेगळ्या करियरमधील संधी म्हणून याकडे पाहू शकतात.

BLOG | कोरोनानंतरचं 'डिजिटल आर्ट'!

डिजिटल आर्ट, अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स यामध्ये कसं याल? चित्रकला, छंद तसेच क्रिएटिव्ह आवड असणाऱ्या मुलांना त्यांचे पालक अगदी लहानपणापासून ई-लर्निंग माध्यमांद्वारे याचं शिक्षण देऊ शकतात. त्यानंतर 10, 12 वी झाल्यावर चित्रकला महाविद्यालयात, तर काही इतर कॉलेजमधून डिजिटल आर्ट मधील अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ग्राफिक्स, गेमिंग, वेब डिजाईन या विषयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.

कमी कालावधीत उपलब्ध असलेले कोर्सेस हे महागडे आहेत, त्यामुळे झटपट यश मिळेल या विचाराने इथं प्रवेश करणे धोकादायक ठरू शकेल. कारण अभ्यास, सराव आणि तसंच कष्ट घेणं, काही काळ कलेची सेवा करणं व स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रामाणिक धडपड करणं जरुरी आहे. लॉकडाऊन काळात घरी कमी कालावधीत काही ऑनलाईन कोर्सेस घरच्या घरीच केल्यास रोजगार, तसेच डिजिटल आर्टच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आपली नक्कीच वाट पाहताना दिसून येतील.

BLOG | टिकटॉकर विरुद्ध युट्युबर

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?Shivsainik Bail granted On Kunal Kamraकुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूरYogesh Kadam On Kunal Kamra CDR : कुणाल कामराला कुणी पैसे दिलेत का? हे तपासणार : योगेश कदम

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
Embed widget