एक्स्प्लोर

टी20 का बॉस बोले तो सूर्या... दमदार फलंदाजी अन् चौकार, षटकारांचा पाऊस

सूर्यकुमार यादव... टी20 क्रिकेटचा बॉस, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संघ कितीही अडचणीत असला तरी, सूर्या है ना कैसे भी करके मार लेगा... हाच मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचा विश्वास सूर्यानं जिंकलाय. सूर्या मैदानावर खेळायला उतरला की, जणू वादळचं येतं... सूर्या नावाचं वादळ... मग समोरचा गोलंदाज कोणीही असो, स्पिनर असो वा फास्ट बॉलर असो सूर्याच्या दिशेनं चेंडू आला की, त्यानं तो मैदानाबाहेर टोलवला म्हणूनच समजा... बरं हे वादळ साधंसुधं नाही, हे वादळं स्टाईकवर आलं की, भल्या भल्या गोलंदाजांना त्याला रोखणं अशक्य होतं. काल वानखेडेवरच्या सामन्यात तर सूर्यानं गुजरातच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी केली. अन् मुंबईला 200 पार नेऊन ठेवलं आणि शतकही झळकावलं. 

सूर्याची फलंदाजी, त्याचे शॉर्ट्स, त्याचे स्ट्रोक्स पाहुन खुद्द क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही अवाक् झाला. सूर्यानं कालच्या सामन्यात एक शॉर्ट लगावला त्यावर सचिननं ट्वीट करुन सूर्याचं कौतुक केलं आहे. एवढंच नाहीतर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजही सूर्याच्या फटकेबाजीनं अवाक् झालेत.

'सूर्या' नावाचं वादळ मैदानात उतरलं की, भल्याभल्यांची भंबेरी उडते, पण कालच्या सामन्यानंतर सूर्यानं नावापुढे आणखी एक विशेषण लावण्यास भाग पाडलंय, ते म्हणजे, 'मुंबईचा तारणहार'

काहीही होऊ देत, सूर्या आहे ना, मग तो कसाही करुन मारणारच... असं म्हणतात. पण ते अगदी खरंच आहे... मुंबईचा संघ कितीही संकटात सापडला आणि सूर्या मैदानावर आला की, प्रतिस्पर्धी संघाचा काही खरं उरत नाही. सूर्याचे दमदार आणि दर्जेदार फटक्यांनी भले भले गोलंदाज अगदी घायाळ होतात. 

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL) मध्ये सध्या सूर्या जबरदस्त फॉर्ममध्ये परतला आहे. 12 मे (शुक्रवार) रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात सूर्यानं नाबाद शतकी खेळी केली. सूर्यानं 49 चेंडूंचा सामना करत नाबाद 103 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. सूर्याच्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबई संघाला 218 धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्यानं आपलं काम केलं अन् त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सनं 191 धावांत रोखून 27 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

सूर्यानं मुंबईला तारलं... 

कालच्या सामन्यात सूर्यानं मुंबईला तारलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आयपीएल 2023 मध्ये सूर्यकुमार यादव ज्या प्रकारे फलंदाजी करतोय त्यामुळे मुंबई इंडियन्सचं काम सोपं झालं आहे. एकेकाळी, मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत पिछाडीवर पडल्याचं दिसत होतं, परंतु सूर्यानं सारं चित्रच पालटलं. त्याच्या खेळीमुळे संघाची चिंता दूर झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आता 12 पैकी 7 सामने जिंकून प्ले ऑफमध्ये जवळपास पोहोचल्यातच जमा आहे.  

सूर्यासाठी क्रिकेटच्या देवाचं ट्वीट

सचिननं खास सूर्याच्या ब्लेड शॉर्टचं कौतुक करत एक ट्वीट केलंय. त्यासोबत सचिननं त्याच्या शॉर्टचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. सचिन म्हणाला, कालच्या मॅचमध्ये सुर्या तुफान खेळला पण मला आवडलेला शॉट म्हणजे त्यानं थर्डमॅनच्यावरुन मारलेला षटकार... तो शॉट खेळणं फार कठीण असतं आणि जातील फार कमी खेळाडू हा उत्तम प्रकारे खेळू शकतात. 

पहिल्या पाच डावांत 66 धावा, नंतर... 

आयपीएलच्या चालू हंगामात, सूर्यकुमार यादवनं गेल्या सात डावांमध्ये पाच वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. सूर्यानं या सात डावांमध्ये 68.33 च्या सरासरीनं आणि 202.45 च्या स्ट्राईक रेटनं 413 धावा केल्या आहेत. एकूणच, सूर्यानं चालू आयपीएल हंगामात 12 डावांमध्ये 43.54 च्या सरासरीनं 479 धावा केल्या आहेत. यादरम्यान सूर्याच्या बॅटमधून चार अर्धशतकं आणि एक शतक झळकलं आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होतं की, पहिल्या पाच सामन्यांमध्ये सूर्याला केवळ 66 धावांची भर घालता आली होती, पण त्यानंतर त्यानं जो स्पीड पकडला तो सर्वांनाच अचंबित करणारा होता. आपल्या दमदार खेळीच्या जोरावर सूर्यानं केवळ धावांचा डोंगरच रचलेला नाही, तर त्यानं ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही तिसरं स्थान पटकावलं आहे. 

सूर्यकुमारचे 7 सामन्यांतील 7 डाव (IPL 2023) 

57 (26) विरुद्ध पंजब किंग्स, मुंबई 
23 (12) विरुद्ध गुजरात टायटन्स, अहमदाबाद 
55 (29) विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई 
66 (31) विरुद्ध पंजाब किंग्स, मोहाली 
26 (22) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई 
83 (35) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई 
103 (49) विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई

सूर्यानं आयपीएल 2023 च्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये फारशा धावा केल्या नाहीत, त्याआधी टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची कामगिरी देखील फारशी चांगली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सूर्यकुमारला एकही धाव करता आली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर बाद) झाला होता. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर बरीच टीका झाली होती. 

सूर्या 'द' बॉस 

32 वर्षीय सूर्यकुमार यादवनं शानदार खेळी खेळून टी-20 क्रिकेटमध्ये आपण जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. सूर्या सध्या आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षी सूर्यकुमार यादवनं एकूण 31 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळून 1164 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यानं 2 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली होती. एका कॅलेंडर वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूची हजार धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती.

सूर्यकुमार यादवचं IPL करियर 

• 135 सामने, 3123 धावा, 31.87 सरासरी 
• एक शतक, 20 अर्धशतकं, 142.99 स्ट्राइक रेट 
• 336 चौकार, 108 षटकार 

सूर्याचं टी20 आंतरराष्ट्रीय करियर 

48 सामने, 1675 धावा, 46.52 सरासरी
3 शतकं, 13 अर्धशतक, 175.76 स्ट्राइक रेट 
150 चौकार, 96 षटकार 

सूर्याचं वनडे आंतरराष्ट्रीय करियर 

23 सामने, 433 धावा, 24.05 सरासरी
दोन अर्धशतकं, 102.36 स्ट्राइक रेट 
45 चौकार, 8 षटकार 

(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही) 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget