एक्स्प्लोर

BLOG : ये कौनसा बॉल मेरे कोर्ट में छोड़ गए हो 'पंचम'

R D Burman Death Anniversary : वो प्यास नही थी... जब तुम म्यूजिक उड़ेल रहे थे जिंदगीमें...और हम सब कोक बढ़ाके मांग रहे थे तुमसे...

प्यास अब लगी है... जब कतरा कतरा तुम्हारी आवाज का जमा कर रहा हूँ...
क्या तुम्हें पता था पंचम के तुम चुप हो जाओगे?
और में तुम्हारी आवाज ढूंढता फिरूँगा????????

"गुलजार रिमेम्बर्स पंचम या अल्बमसाठी गुलजारने लिहिलेली ही प्रस्तावना. पंचमने अनपेक्षितपणे आपल्यातून एक्झीट घेतल्यानंतर आपली पण अवस्था अशीच काहीशी झाली आहे, नाही का? 

"मोनिका ओ माय डार्लिंग" पासून अमरप्रेमच्या रैना बिती जाये"पर्यंत, आणि पुन्हा आंधीच्या "इस मोड से जाते हैं" पासून 1942 लव्ह स्टोरीच्या कुछ ना कहो" पर्यंत, तू आम्हाला खूप काही दिलं पंचम तुझं आजच्या दिवशी जाणं हे आयुष्यातल्या कृष्ण विवरा प्रमाणं आहे, जे दिसत नाही पण त्यातल्या दुःखांचा अंत शोधूनही सापडणार नाही!

पण आपल्याहून मोठं दुःख त्याला होतं. 1986 नंतर त्याच्याच जवळच्या माणसांनी त्याला झिडकारायला सुरुवात केली. काम देणं बंद केलं. तेव्हा तो कोसळला. त्यात सर्वाधिक कोणाचा वाटा असेल तर सुभाष घईचा. निमित्त होतं "राम लखन" चित्रपटाचं. घईंनी राम लखन जाहीर केला. संगीतकार म्हणून पंचम जाहीर केलं. पण त्याला न सांगता त्याच्या जागी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना घेतलं. ते पंचमला कुणीच सांगितलं नाही. जेव्हा कळलं तेव्हा मरणाहून जास्त दुःख त्याला झालं. 

एकीकडे सुभाष घई सारखे लोक होते, जे पंचमला दिवसेंदिवस मृत्यूच्या छायेत ढकलत होते. ते दुसरीकडे विधू विनोद चोप्रा सारखे काही मोजके होते, जे पंचमला जगण्याची ताकद देत होते. जेव्हा लोक पंचम सोबत काम करायचं नाही म्हणून फिल्म सोडायचे, पंचमचं नाव ऐकलं तरी निर्मात्याला बुडवायला निघालेला डायरेक्टर, असं म्हणायचे, त्या काळात, त्याचा हात कोणी सोडला नसेल तर विधू विनोद चोप्राने. आधी परिंदा, आणि मग 1942 लव्ह स्टोरी सारखे चित्रपट म्हणजे व्हेंटिलेटरवर असलेली पंचमला दिलेला ऑक्सिजन. 

1942 साठी विधूने पंचमला सांगितलं ट्यून बनव. पंचम ने पण एक साधी ट्यून बनवून त्याला ऐकवली... ती ऐकत असताना मध्येच त्याला तोडून विधू म्हणाला, "दादा हे काय ऐकवतोय? हे म्युझिक नाहीये, तुझ्या कडून तर नाहीच" वर एस डी बर्मन यांचा फोटो होता. त्याला बघून विधू म्हणाला, "मला ते हवे होते, पण त्यांच्या नंतर तूच बेस्ट ऑफ ऑल आहेस" ते ऐकून पंचम इतका घाबरला, " मग मी फिल्म करतोय ना? की नाही?" त्याने विचारलं... विधू म्हणाला, "नको ते बोलू नको, फिल्म तूच करणार".
एक आठवड्यानंतर पुन्हा म्युजिक सिटिंगसाठी जेव्हा विधू गेला... तेव्हा पंचमने पेटीवर हात ठेवला आणि पहिली धून ऐकवली, "रोंगीला, रोंगिला, रोंगिला रे... रोंगिला". डोळे बंद करून विधू ऐकत होता. त्याने पंचम ला थांबवलं. म्हणाला हे गाणं हिट आहे. पंचम म्हणाला, "अजून गाणं पूर्ण नाही ऐकलं, पुढे ऐकू". विधू म्हणाला, "गरज नाही, पहिला सुर ज्याचा हा आहे, ते गाणं हिट आहे" गाणं होतं, " कुछ ना कहो, कुछ भी ना कहो".

शून्यातून उभं राहून, सर्वोच्च पदाला जाणारे आणि तिथून पुन्हा शून्य बनणारे खूप कलाकार आहेत, जसे की राजेश खन्ना. पण शून्यातून उभं राहून, सर्वोच्च पदाला पोचणारा, तिथून इंडस्ट्रीने पाठ फिरवल्याने पुन्हा शून्याला येणारा, पण हार न मानता आपल्या आयुष्याच्या शेवटच्या चित्रपटाला पण सुपरहिट संगीत देऊन पुन्हा सर्वोच्च स्थळी जाणारा "पंचम" हा एकमेव असेल. पण त्याच दुर्दैव, आयुष्याच्या शेवटच्या चित्रपटाचं, म्हणजेच 1942 लव्ह स्टोरीचं यश पाहायला तो या जगात नव्हता. 56 वर्ष हे काही वय नाही जग सोडून जायचं, पंचम. 

म्हणून गुलजार म्हणतो.... 

"याद है पंचम? जब भी कोई नई धुन बना कर भेजते थे, तो कह लीया करते थे..... The ball is in your Court.....
ये कौनसा बॉल मेरे कोर्ट में छोड़ गए हो पंचम.... जिंदगी का ये खेल अकेले नही खेला जाता.... हमारी तो टीम है... 

आ जाओ, या फिर बुलालो!!!!!!"

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget