(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | आश्चर्य! सख्खे शेजारी असूनही..
या सर्व देशामध्ये भूतानचे एक विशेष म्हणजे या देशातील रुग्णसंख्या कमी तर आहेच. मात्र, आजतागायत या देशात कोरोनामुळे एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही हे अधोरेखित करण्यासारखे आहे.
भारतात कोरोनाचे आगमन होऊन 10 महिने झाले, तरी हा संसर्गजन्य आजार कमी व्हायचे नाव काय घेईना, कोरोनबाधित रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येच्या अनुषंगाने भारत देश जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाला आहे. भारत देशाच्या सीमारेषेला लागून सहा देश आहेत. त्या देशातसुद्धा कोरोनाची साथ आहे. परंतु, ज्या तुलनेने भारतात या आजाराचा प्रादुर्भाव खूपच मोठ्या प्रमाणात झाला आहे त्या तुलनेने या सहा देशातील रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा फारच कमी आहे. या सगळ्या सहा देशातील मिळून एकूण रुग्णसंख्या आजच्या घडीला 8 लाख 91 हजार 575 आहे. जर ही आकडेवारी पाहिली तर आपल्याकडे केवळ महाराष्ट्राची रुग्णसंख्या ही 14 लाख 80 हजार 489 इतकी आहे, म्हणजे आपल्या बॉर्डरवर असलेल्या संपूर्ण सहा देशाच्या रुगसंख्येच्या आकडेवारीच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्र राज्याची आकडेवारी कैक पटीने जास्त आहे. विशेष म्हणजे मृताच्या आकडेवारीचा जर विचार केला या सहा देशात आतापर्यंत 17 हजार 706 नागरिकांचा या आजाराने बळी गेला आहे. तर केवळ महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 39 हजार 072 नागरिकांचा या आजराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच या सहा देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जे आजही उपचार घेत आहे त्यांची संख्या 1 लाख 29 हजार 193 आहे तर महाराष्ट्राची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 44 हजार 527 इतकी आहे. या आकडेवारीवरून आपले हे सहा देश सख्खे शेजारी असूनही त्या देशात फारच कमी प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे जी आकडेवारी सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे यावरून दिसत आहे.
चीन, भूतान, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार या सीमेवर असणाऱ्या देशाची आकडेवारी या लेखात घेण्यात आली आहे. याचे विशेष महत्त्वाचे एक कारण म्हणजे या सहा देशांपैकी चीन हा देश सोडला तर अन्य पाच देशाची लोकसंख्या भारतातील लोकसंख्येपेक्षा बऱ्यापैकी कमी आहे. या देशाची आडकेवारीची तुलना करताना महाराष्ट्र राज्य घेतलेले आहे, कारण भारतात सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेले महाराष्ट्र राज्य आहे.
वर्ल्डओमीटर या संकेतस्थाळावर संपूर्ण जगातील देशाची कोरोना आजाराशी संबंधित सर्व आकडेवारी आहे, भारतीय वेळेनुसार दुपारचे 2 वाजून 22 मिनिटांनी जी आकडेवारी या संकेतस्थळावर होती ती घेण्यात आली आहे. प्रत्येक देशाचे स्वतःचे असे एक आरोग्य धोरण असते त्या प्रमाणे ते देश काम करत असतात.
आपल्या देशातील आरोग्याचे धोरण आणि अन्य सीमेवरील देशाची धोरणे ही वेगवेगळे असण्याची शक्यता जास्त असतील किंबहुना वेगळीच असावीत. प्रत्यक्षात आपल्या देशातील रुग्णांची संख्या जास्त असली तरी बऱ्यापैकी रुग्ण हे उपचार घेऊन घरी गेले आहेत. भारताची रुग्णसंख्या 68 लाख 35 हजार 655 इतकाही असून आतापर्यंत 58 लाख 27 हजार 704 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याशिवाय 9 लाख 02 हजार 397 रुग्ण आजही विविध ठिकाणी उपचार घेत असून 1 लाख 05 हजार 554 नागरिकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. टेस्टिंगचे प्रमाण संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात आहे. घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली जात आहे, त्यामध्ये काही नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत दिली जात आहे. संपूर्ण देशात सध्या अनलॉक टप्प्या-टप्प्याने केले जात आहे. नागरिकांना सुरक्षित वावर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याचे राज्याचे वैद्यकीय सल्लागार आणि जागतिक आरोग्य परिषदेच्या साऊथ आशिया विभागीय कार्यालयात 4 वर्षे सहायक विभागीय संचालक म्हणून काम पाहणारे डॉ. सुभाष साळुंखे सांगतात की, "या सर्व देशाच्या सीमेवर असणाऱ्या देशात रुग्णसंख्या कमी असली तरी त्याला तशी वेगवेगळी कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे चीन देश सोडला तर बाकी अन्य देशातील लोकसंख्या आपल्या देशाच्या तुलनेने कमी आहे. चीन मध्ये वुहान शहर सोडले तर चीनच्या इतर भागात या विषाणूचा काही फारसा प्रसार झालाच नाही. त्यांनी त्या शहराच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या, त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय एकदम कडक केले होते. त्याचप्रमाणे कोरोनाचा विषाणू आणि या आजाराचा पॅटर्न हा सर्वत्र सारखाच जरी असला तरी प्रत्येक देशाचे राहणीमान, सामाजिक, पर्यावरण, वातावरण, भौगोलिक परिसर ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यानुसार अनेक बदल हे आरोग्याच्या बाबतीत घडत असतात. पाकिस्तान देशात फारशा टेस्ट झाल्याच नाही. आपल्या देशात तुलनेने सर्वात अधिक टेस्टिंग झाल्याने रुग्णसंख्या वाढ आपल्याकडे दिसत आहे. बांग्लादेश या देशातील काही भागात आपल्यासारखी दाटीवाटीची वस्ती आहे, त्या देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेने तिथेही रुग्ण आहेतच आपल्या देशाच्या तुलनेने कमी असणारच, कारण लोकसंख्या कमी आहे. शिवाय टेस्टिंग किती होते ते पाहणे गरजेचे आहे."
भारतात संपूर्ण देशात मास्क घालणे बंधनकारक केले आहे. ह्यामुळे आजाराचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घेतली जात आहे. सिरो सर्वेक्षण देशात करण्यात आले आहे. त्यामध्ये सुद्धा म्हणावी तितक्या प्रमाणात नागरिकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे आणखी एकदा अशाच प्रकारचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याकरिता राज्यातील आरोग्य व्यवस्था शक्य तेवढे प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य रुग्णांना उपचार परवडावेत म्हणून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. तात्पुरत्या रुग्णालयांची निर्मिती प्रमुख शहरात करण्यात आली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे आहे, साथ आटोक्यात आणण्यासाठी नवीन उपाययोजनांची व्यवस्था केली जात आहे. जेव्हा साथ सुरु झाली तेव्हा सगळ्यांसाठीच हा आजार नवीन होता. वैश्विक महामारीच्या या काळात काही त्रुटी राहणार, चुका होणार मात्र त्यावर मात करत पुढे जावे लागणार आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे खजिनदार आणि सार्क मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांच्या मते, या सहा देशांपैकी मुख्येत्वे चीन आणि पाकिस्तान या दोन देशाच्या संपूर्ण कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे त्या दोन देशांच्या आकड्यांवर किती विश्वास ठेवायचा हाच मोठा मुद्दा आहे. बाकीच्या चार देशांमध्ये जर पहिले तर तेथे बहुतांश देशातील नागरिक हे त्या ठिकाणच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून आहे. तेथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत आहे. मुख्य म्हणजे या चारही देशात फार कमी प्रमाणात खासगी वैद्यकीय व्यवसायिक आहेत. भूतान देशात तर रुग्णांचा बहुतांश खर्च तेथील सरकार करते. या देशात 10 टक्के लोकसुद्धा खासगी वैद्यकीय व्यवसाय करत नाही. या सर्व देशातील जीडीपीच्या 3.5% ते 4.5% खर्च हा आरोग्य व्यवस्थेवर होतो. बांगलादेशात बहुतांश जेनेरिक औषधांचा वापर होतो. म्यानमारमध्ये सुद्धा आरोग्याच्या व्यवस्था चांगल्या आहेत. अर्थात भारताशी तुलना केली तर लोकसंख्या हा मुद्दा आहेच. मात्र, या देशातील बाकी आरोग्य व्यवस्था चांगली आहे. मी या सर्व बहुतांश वैद्यकीय परिषदेकरिता जाऊन आलेलो आहे. आपल्या देशातही कोरोनाच्या अनुषांगाने चांगले प्रयत्न सुरु आहेत." वैद्यकीय तज्ञांच्या वर्तुळात पाकिस्तान आणि चीन या देशातील कोरोनाच्या अनुषंगाने चालणाऱ्या कामकाजावर फारसे बोलतनात कुणीही आढळत नाही. कारण जोपर्यंत सर्व गोष्टीत सार्वजनिक स्थळी विज्ञान जगतासमोर मांडून त्यावर साधक बाधक चर्चा होते तोपर्यंत त्यांच्या कामकाजावर फारसे कुणी बोलणार नाही. मात्र, इतर चार देशात त्यांच्या पद्धतीने काम करीत असून या महासंकटाला ते व्यस्थित तोंड देत आहे, असे म्हणायला हरकत नाही. या सर्व देशामध्ये भूतानचे एक विशेष म्हणजे या देशातील रुग्णसंख्या कमी तर आहेच. मात्र, आजतागायत या देशांमध्ये या आजरामुळे एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही हे अधोरेखित करण्यासारखे आहे. येत्या काळात आपल्या देशातील रुग्णसंख्या कमी होण्यासाठी आपली आरोग्य व्यवस्था आणखी नेटाने प्रयत्न करीत आहेच, त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते कि आपल्या सीमेवर असणाऱ्या देशाची रुग्णसंख्या एवढी कमी आहे. सहा देशाची आकडेवारी जागतिक क्रमवारीनुसार :
- 16. बांगलादेश - 3 लाख 73 हजार 151 असून 5 हजार 440 मृत आहेत, 81 हजार 080 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे.
- 21. पाकिस्तान - 3 लाख 16 हजार 934 असून 6 हजार 544 मृत्यू झाले तर 8 हजार 015 अॅक्टिव्ह रुगसंख्या आहे.
- 45. नेपाळ - 94 हजार 253 असून 578 मृत तर 25 हजार 007 अॅक्टिव्ह रुगसंख्या आहे.
- 47. चायना - 85 हजार 500 असून 4 हजार 634 मृत असून, 200 अॅक्टिव्ह रुगसंख्या आहे.
- 82. म्यानमार - 21 हजार 433 असून 510 मृत असून, 14 हजार 839 अॅक्टिव्ह रुगसंख्या आहे.
- 185. भूतान - 304 असून 0 मृत असून, 52 अॅक्टिव्ह रुगसंख्या आहे.
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!