एक्स्प्लोर
Advertisement
BLOG | 'डेक्सामेथासोन'!
डेक्सामेथासोन हे औषध अगोदरपासूनच बाजारात उपलब्ध असून त्याचा वापर इतर आजारांवर उपचार करण्याकरता करण्यात येत आहे. फक्त फरक एवढाच कि त्या औषधाचा वापर कोरोनाबाधित रुग्णांवर वापर करून त्यांनी या चाचणीच्या अहवालातील निष्कर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांना यामध्ये चांगल यश आल्याचं दिसून आलंय. त्यांनी त्यांच्या चाचणीचा अहवाल प्रदर्शित केला असून त्याचं अनेक ठिकाणी कौतुक होत आहे.
अजून एका औषधाची चर्चा बाजारात सुरु झालीय, कि ज्यामुळे गंभीर कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्यास मदत होणार आहे. या आणि अशा वेगवेगळ्या औषधांचं आगमन आणखी पुढील अनेक महिने सुरूच राहणार आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ञ कोणतं औषध बरे करण्यासाठी निवडतात त्यावर रुग्णाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. कोविड-19, या कोरोना विषाणूच्या साथीने अख्ख्या जगात धुमाकूळ घातला आहे. बहुतांश देशात या आजराशी दोन हात करताना प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बरं ज्या डेक्सामेथासोन औषधाबद्दल चर्चा सुरु आहे ते कोणत्याही प्रकारचं नवीन औषध नाही, हे औषध अगोदरपासूनच बाजारात उपलब्ध असून त्याचा वापर इतर आजारांवर उपचार करण्याकरता करण्यात येत आहे. फक्त फरक एवढाच कि त्या औषधाचा वापर कोरोनाबाधित रुग्णांवर वापर करून त्यांनी या चाचणीच्या अहवालातील निष्कर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांना यामध्ये चांगल यश आल्याचं दिसून आलंय. त्यांनी त्यांच्या चाचणीचा अहवाल प्रदर्शित केला असून त्याचं अनेक ठिकाणी कौतुक होत आहे.
डेक्सामेथासोन, हे एक प्रकारचं उत्तेजक (स्टेरॉइड) औषध असून गेली अनेक वर्ष ते जगातील अनेक डॉक्टर आपल्या प्रॅक्टिसमध्ये याचा वापर करीत आहे. अशा प्रकारची अनेक उत्तेजक बाजरात असून ती विविध स्वरूपातील आजरावर आपल्याकडे वापरण्यात येत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या निष्कर्षानुसार, या औषधामुळे गंभीर रुग्णातील प्रमाण एक तृतीयांशने कमी झाले आहे. हे औषध सौम्य स्वरूपाच्या, कमी लक्षणे असलेल्या रुग्णामध्ये फारसे प्रभावी दिसलेले नाही. मात्र व्हेंटिलेटर आणि कृत्रिम प्राणवायू लागणाऱ्या रुग्णांना चांगले निकाल दिसून आले आहे. हे औषध सर्व ठिकाणी उपलब्ध असून तुलनेने स्वस्त आणि परवडेल असे आहे. मंगळवारी या औषधाच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहे.
बीबीसी या इंग्रजी वेबसाईटवरील वृत्तानुसार ब्रिटन मधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक पीटर हॉर्बी यांनी सांगितले कि, 'सध्या तरी या औषधामुळे गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होत आहे'. 'आम्ही सुरुवातीच्या काळापासून आमच्या कडील गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमध्ये उत्तेजकाचा वापर करीत आहोत. मी थेट डेक्सामेथासोन नाही पण मेथीलप्रेडीनीसोलोन हे उत्तेजक कोविडच्या रुग्णांमध्ये वापरत आहे. आमच्या श्वसनरोग आजाराशी संबंधित सर्व डॉक्टरांना डेक्सामेथासोनविषयी व्यवस्थित माहिती आहे. आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही गंभीर अस्थमा, श्वसनाचे विकार यामध्ये वापरत असतो. त्याशिवाय क्षयरोगात पण याचा वापर होतो. आम्ही सध्या जी उत्तेजक वापरतो त्याची अॅक्शन 8-10 तास असते आणि डेक्सामेथासोनची अॅक्शन 24 तासापेक्षाही अधिक असते', असं त्यांनी म्हटलंय. 'ब्रिटनच्या डॉक्टरांनी या औषधाचा वापर कोविड बाधित रुग्णांवर करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे, चांगलं आहे. उत्तेजकाचा वापर वैद्यकीय व्यवसाय विविध ठिकाणी करतात. अनेक वेळा ज्यांना गंभीर संधिवात आहे त्यांनाही उत्तेजक दिली जातात', असं डॉ समीर गर्दे, श्वसनरोग तज्ञ, ग्लोबल हॉस्पिटल, परळ यांनी सांगितले.
या औषधाबद्दल माहिती देताना गर्दे असेही सांगतात की, 'हे औषध 30 वर्षापेक्षाही अधिक काळ आपल्याकडे असून डॉक्टर या औषधाचा उपयोग करीत आहे. आम्ही गंभीर न्यूमोनियामध्ये हे औषध वापरतो. ज्यावेळी फुफुसाला सूज आल्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. त्यावेळी कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्राद्वारे रुग्णाला प्राणवायू दिला जातो. या औषधामुळे फुफुसातील सूज कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे रुग्ण पुन्हा स्वतःहून श्वास घ्यायला लागतो. या प्रकारे या औषधाचा फायदा होत असतो.'
मुंबई शहर व परिसरात कोरोना विषाणूची बाधा व मृत्यूचे प्रमाण जास्त असून त्यावर उपाययोजना व विश्लेषण करण्याकरता सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षपदी के.ई.एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे सांगतात कि, 'आपण एप्रिल महिन्यात ज्यावेळी कोणती औषधं या आजारात द्यायची आणि कधी द्यायची त्या बैठकीतच डेक्सामेथासोन आणि मेथीलप्रेडीनीसोलोन या दोन उत्तेजकच वापर करण्यास सूचित केले होते. मात्र योग्य रुग्णांची निवड आणि योग्य पद्धतीने त्या औषधाची मात्रा संबंधित डॉक्टरांनी देणे अपेक्षित आहे. फारसे इफेक्ट्स नसले तरी औषधाची मात्रा जास्त झाल्यास साईड एफेक्ट होऊ शकतात. पण त्याकरिता डॉक्टर्स अँटिबायोटिक्सचा वापर करत असतात. या औषधाचा या गंभीर रुग्णांमध्ये फायदा होतो हे आपणसही दिसून आले आहे.'
डेक्सामेथासोन या औषधाच्या चाचणीचे अहवालाचे निष्कर्ष येण्यापूर्वी आपल्याकडे रेमिडिसीवीर या औषधाची चर्चा झाली होती. कोरोनाकाळ सुरु असेपर्यंत आणखी काही अभ्यास प्रसिद्ध होतील. या सर्व प्रकारात अजून कोणतेही नवीन औषध बाजारात आलेली नाही. आतापर्यंत जी औषध अगोदरपासून अस्तित्वात आहेत. त्याचा वापर करून काही चांगले निकाल हाती येत आहे. सध्याच्या घडीला अनेक देश नवीन औषध, लस शोधण्याच्या कामात व्यस्त आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते, कोणतेही नवीन औषध बाजारात येण्याकरता वर्षभरापेक्षा जास्त काळ लागतो, कारण त्याच्या विविध चाचण्या करणं अपेक्षित असतं. त्यावरून त्याचे निष्कर्ष पहिले जातात आणि मगच नवीन औषध बाजारात येत असतात. एखादं नवीन औषध बाजारात आणताना फार्मासुटिकल्स कंपन्या खूप अभ्यास करत असतात, कारण खूप खर्च या सगळ्या प्रक्रियेत होत असतो.
पुणे येथील केईएम रुग्णालयातील श्वसनविकार तज्ञ डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात की, 'आपण पण आपल्या रुग्णांवर हे औषध वापरात आहोत, त्यांचा चांगला फायदा होत आहे. ब्रिटनने जाहीर केलेल्या या निष्कर्षामुळे आपली औषध उपचारपद्धती बरोबर आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हे औषध गेली अनेक वर्ष डॉक्टर वापरत आहे.'
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement