Salaar And Dunki: किंग खानचा डंकी की प्रभासचा सालार? कोणता सिनेमा पैसा वसूल?
Salaar And Dunki: रणबीर, बॉबी, रश्मिका आणि उपेंद्र लिमये यांच्या 'अॅनिमल' (Animal) सिनेमाच्या चर्चा काही थांबतच नाहीत. ऑलमोस्ट ज्यांना सिनेमात रस नाही असा रसिक प्रेक्षक देखील सिनेमगृहाची पायरी चढतो आणि अशा चर्चेतल्या सिनेमांना जास्तच मालामाल करतो. काहींनी अॅनिमल हा सिनेमा खिसे रिकामे करून पाहिला तर काहींनी मिळेल त्या मार्गी हा सिनेमा बघितलाच. सिनेमाचा कॉन्टेन्ट चावट होताच त्यात त्याच्या चर्चा आजही कट्ट्यावर सुरू आहेतच अशातच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रभासचे (Prabhas) सिनेमे एकमेकांसमोर टक्कर दयला मागेपुढे उभे राहिले. खरा सुपरस्टार गल्ला कमावणारा की सिनेप्रेमींची मनं जिंकणारा? याची शर्यत लागल्याचं पाहायला मिळतं.
नेहमीप्रमाणे शाहरुखच्या जगभरातील फॅन्सने डंकीला उचलून धरलं मात्र सिनेमा अतिशय निराशा देणारा ठरला. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावरील विश्वासच उडल्यात जमा आहे कारण, डंकी हलकाफुलका असला तरी लॉजिकल विरोधाभास असलेला आणि अतिशयोक्ती अभिनयाने कधी संथ तर कधी खेचलेला सिनेमा जाणवला. परदेशात जाण्याची स्वप्नं पूर्ण करायला बाहेर पडणारे ध्येयवेडे तरुण आणि तेच काही वर्षांनी परदेशी राहून कंटाळून पुन्हा भारतात परतण्यासाठी त्यांनी केलेला खटाटोप, शिवाय त्यांचा वयोवृद्ध मेकअप सगळ्यांनाच न पचणारा आहे. अभिनय गाणी बरी आहेत पण बाकी बोलायला काहीच नाही. त्यामुळं डंकी का पाहावा? का पाहू नये?
इथवर रिव्ह्यू देण्यासाठी वेळ काढणं म्हणजे निव्वळ हास्यास्पद गोष्ट म्हणावी लागेल.
मात्र याउलट प्रभासचा सालार- पार्ट वन सीजफायर Action Thriller सिनेमा आहे तर डंकी हा Drama Romance दोघांची वर्गवारी वेगळी असली तरी सिनेमे एकाचवेळी पडद्यावर आल्याने वर्षाखेर नक्की खिसा कोणासाठी रिकामा करावा? वीकेंड कुठं घालवावा? असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतानाच. तिन्ही सिनेमे पाहिल्यावर लिहावं वाटलं ते सालार बद्दलच; याचमुळे लिहण्याची गोष्ट अशी की, दिग्दर्शक प्रशांत निलने जश्यास तसं लिहलेलं दिग्दर्शनात उतरवलं आहे. ज्याचं काम तुम्हाला प्रचंड प्रभावित करतं.
प्रशांत निल ने Fiction सिनेमात एक काल्पनिक 'खानसार' उभं केलंय, जिथली सामाजिक व्यवस्था, समाजातील वेगवेगळे वर्ग, खानसारचे 101 तुकडे त्या तुकड्याचे लीडर, खानसारच्या टोळ्या (Tribs) अर्थात तीन लुटारूंच्या प्रमुख टोळ्या, त्यांची एकत्रित न्यायव्यवस्था, त्यांनी एकत्र येऊन केलेलं प्रशासन, भारताशी आणि जगाच्या पाठीवरचं नातं, शासन आणि त्यांचा राजदरबार सोबतच महत्वाचं म्हणजे सगळ्या वर्गातील लिडर्सचा राजगादीवर ताबा मिळवण्यासाठीचा संघर्ष हा टिपिकल फिल्मी नात्यात गुंफला आहे.
संघर्षात जिंकणार कोण? खालसार गादीवर बसणार कोण? हा या सिनेमाचा प्लॉट नसून सिनेमाचा सस्पेंस तुम्हाला सिनेमाच्या प्रेमात पाडतो.खानसारचा इतिहास काय? देवा आणि त्याच्या आईने खानसार का सोडलं? Mannarshi, Ghaniyaar, Shouryaanga टोळीचा राजगादीसाठीचा संघर्ष नक्की काय आहे? सौरयांगच्या विरोधात मन्नार का होते? त्यांचा नामोनिशाण का मिटवला? वर्धा-राधारमा ची खलबतं नक्की काय आहेत? देवा वर्धाची या दोघांची मैत्री सरस ठरते की, पारंपरिक बदल्याची दुश्मनी देवा वर्धाच्या मैत्रीच्या नात्याआड येते? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी तुम्ही गुंतलेले असताना सिनेमा पाहताना तुम्ही नायकाच्याही प्रेमात पडणार नाही
किंवा इतर कोणतंही पात्र तुमच्या मनात बसेल असं वाटत नाही. कारण प्रभासला सिनेमात डायलॉग मोजके आहेत.याची तुलना करायचीच झाली तर शाहरुखच्या डंकी सोबत करता येईल डायलॉग्स आणि Expressions चा विषय जिथं येतो तिथं शाहरुख बाजी मारतो. तर Animal हा Violence Movie आहे ज्यात लॉजिक नसलेल्या गोष्टी नाट्यमय रित्या घुसवल्यात तर सालार हा Violence World मधील Dramatic सिनेमा आहे असं म्हणावं लागेल.
सालार मधील सर्वांचा अभिनय उत्तम, स्क्रिनप्ले मस्त, BGM धडकी भरवणारे आणि KGF बाहुबली सारख्या दाक्षिणात्य सिनेमे हॉलिवूडच्या मल्टिव्हर्स युनिव्हर्सच्या रांगेत भारतीय सिनेमाला स्थान नक्की देतंय हिच या सालारची विशेष गोष्ट आहे.
डंकी हा फॅमिली सिनेमा आहे, आपलं डोकं घरीच ठेऊन टाईमपास म्हणून पाहायला हरकत नाही, परदेशी जाण्याची ओढ प्रत्येकाला असतेच पण पंजाबी लोकांची खरी तळमळ सिनेमात उतरली नाहीच, तर सालार कोड्यात पाडणारा सिनेमा आहे दोन्ही सिनेमे बिग बजेट आहेतच दोन्हीचा प्रेक्षक वेगळा आहे. डंका वाजवेल असा मात्र डंकी अजिबात नाही तर सालार सिनेमा प्रभासचा पुन्हा बाहुबली अवतार दाखवणारा महत्वकांक्षी सिनेमा म्हणावा लागेल. सालार चा -भाग 2 शौर्यम पर्वम यात सगळी उत्तरं मिळतील आणि यासाठी दोन्ही सिनेमे पाहणं गरजेचं ठरेल, सालार सिनेमा ग्रे कलर आहे, कदाचित तुम्हाला टॉर्च घेऊन पाहावा लागेल अश्या मिम्स व्हायरल होत आहेत मात्र सिनेमाची ती गरज आहे.