एक्स्प्लोर

मुख्यमंत्री साहेब... मी किल्ला बोलतोय!!!

ढासळलोय... खिळाखिळा झालोय... काळजी वाटते मी संपून जाईन. मुख्यमंत्री साहेब... थोडा वेळ मिळाला की, माझ्याकडे पण लक्ष द्या! तसे तुम्ही संवेदनशील आहात, माझ्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत. सध्या तुम्ही शिवस्मारकाच्या गडबडीत होतात. म्हणून म्हटलं त्यातून थोडा वेळा मिळाला की, मग तुम्हाला पत्र लिहू... पत्र मिळताच तुम्ही तितक्याच संवेदनशील मनानं माझ्याकडे लक्ष द्याल असं वाटतं. राजांच्या स्मारकासाठीचा आटापिटा मी पाहायला साहेब... इथं तर माझ्या अंगाखांद्यावर आमचा 'जाणता राजा' वावरलाय... नाही... माझी काही तक्रार नाही साहेब... माझी माती तुमचे कार्यकर्ते इथून घेऊन गेले बरं का, अगदी वाजत-गाजत... शिवस्मारकासाठी... पण ढासळलेल्या बुरुजाकडे कुणाचं लक्ष काही गेलं नाही. बुरुज... माची... दरवाजे सारं काही खिळखळं झालंय... नाहीतरी आज ना उद्या त्याची मातीच होणार म्हणा... पण तुमचा आदेश महत्वाचा साहेब... ढोल ताशांच्या गजरात कलशात माती भरली... त्याच गजरात मीही खूश झालो. म्हटलं चला उद्या राहू न राहू कुणी पाहलंय... किमान यानिमित्तानं मुंबई तरी पाहू... जीवाची मुंबई होईल... स्मारकाच्या चरणी राहीन... याचा आनंद काय थोडाथोडका आहे का... cm and modi-compressed साहेब... मोठ्या साहेब्यांनी कलश हाती घेतला तेव्हा काय आनंद झाला सांगू... जेवढा तुम्हाला मुख्यमंत्रीच्या शपथेसाठीचा फोन आला होता त्यावेळी झाला असेल ना तेवढाच... वाटलं मोठ्या साहेबांचं आता आपल्याकडे लक्ष जाणार, आपला उद्धार होणार... पण मोठे साहेब दिल्लीत बसतात. तिथून माझ्यावर लक्ष जाणं तसं अवघडच आहे म्हणा, पण तुमच्या मित्रानं (म्हणजे आम्ही अजून तरी त्यांना तुमचे मित्रच म्हणतो... बरं का) मोठ्या साहेबांना आमच्यासाठी गळ घातली. दिल्लीतून आमच्यावर लक्ष ठेवणं कठीण... तरी कारभार आमच्या हाती द्यावा! साहेब... काय सांगू तुम्हाला... ऐकून असं भारी  वाटलं ना, म्हटलं आता मोठे साहेब ऐकणारच... shivsmarak-compressed साहेब... महाराजांचं स्मारक करताय तुम्ही, आनंद मनात मावत नाही माझा... आमच्या राजानं सत्ता गाजवली, जमिनीवर अन् समुद्रावरही... त्याच समुद्रात तुम्ही राजांचं स्मारक बांधताय, आमची माती त्याच स्मारकाच्या चरणी असेल. आमची म्हटलं... बरेच आहोत ना आम्ही... खचलेलो, मोडकळीस आललो... साहेब... खरं सांगू आज राहवलं नाही म्हणून हा पत्रप्रपंच... जेव्हा एक-एक दगड खचतो ना, तेव्हा मनाला पिळ पडतो... आमच्या राजानं जिवापाड आम्हाला जपलं, खचलेलो, दुंभगलेलो त्यांना आवडायाचं नाही, डोंगरावरचे मुकूट होतो ना आम्ही... ‘ज्याचा गड, त्याची जमीन’ आणि ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र,’ राजे नेहमी म्हणायचे... म्हणून आम्हाला फार जपायचे. modi सिंधुदुर्गानंतर... थेट भर समुद्रात महाराजाचं स्मारक... कुणाला आनंद होणार नाही, मलाही झालाय. फक्त भविष्यात माझ्यासारखी त्याची अवस्था होऊ नये इतकंच... साहेब... आता खरंच खचलोय! तुमचाच एक ढासळलेला किल्ला... संबंधित ब्लॉग: टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार... जयंत यादव? विराट कोहली… टीम इंडियाची 2000ची नोट! कमालही कर दी पांडेजी!  
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
ABP Premium

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget