एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

BLOG : राज्यपालांच्या सूचनेचा आदर करत शाळांच्या वेळा बदलाव्यात : पूर्वप्राथमिक -माध्यमिक वर्गांची शाळा 9 च्या आत नकोच!

मुंबई : विद्यार्थ्यांनी झोप पूर्ण होण्यासाठी शाळांच्या वेळा बदला वृत्तानुसार  मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा  या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी राज्यपाल बैस यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा विषयाला वाचा फोडली आहे . त्यांनी राज्याच्या शिक्षण विभागाला सूचना केली आहे की बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलेल्या असून रात्री उशिरा झोपण्याकडे सर्वांचा कल वाढलेला आहे . रात्री उशिरा झोपण्याच्या संस्कृती मुळे शाळांची वेळ सकाळची असणे हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु लागलेले आहे . 

या पार्श्वभूमीवर झोपेच्या गणितानुसार शाळेच्या वेळा या विद्यार्थीकेंद्री असाव्यात अशी सूचना त्यांनी केलेली आहे . राज्यपालांच्या सूचनेचा आदर करत शाळांच्या वेळा बदलाव्यात आणि कुठल्याही परिस्थितीत पूर्वप्राथमिक -माध्यमिक वर्गांची शाळा 9 च्या आत नकोच असे धोरण अंमलात आणावे . अलीकडच्या काळात शाळा 2 शिफ्टमध्ये भरवल्या जात असल्याने अगदी केजीचे , प्राथमिकचे वर्ग देखील 7 वाजता सुरु होतात . हा एक प्रकारे चिंमुरड्या मुलामुलींवर अन्यायच म्हणावा लागेल . शहरांमध्ये अनेक विद्यार्थी हे 5-10 किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत स्कुलबसने जात असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ३० मिनिटे ते एकतास आधी घरातून बाहेर पडावे लागते . याचाच अर्थ त्यांना किमान 5.30  ते 6 च्या दरम्यान झोपेतून उठणे आवश्यक आहे .

आजकाल शहरात झोपण्याची वेळ हि रात्री 11 नंतरचीच असल्याने मुलांची झोप पूर्ण होत नाही . सकाळी उठायला उशीर होत असल्याने बरेच विद्यार्थी हे प्रातर्विधी न आटोपताच तर काही स्नान न करताच शाळेत जातात . शाळा सकाळची  असल्याने 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांच्या मम्मी पोळी -भाजी असा डबा न देता स्नॅक्स डब्यात देतात . हे सर्व प्रकार मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत . अपुरी झोप , अपुरे पोषण यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा दीर्घकालीन दुष्परिणाम होताना दिसत आहेत . बरे ! लहान मुलांच्या शाळा सकाळी तर माध्यमिक ,उच्चमाध्यमिक कॉलेजेस दुपारी असा उलटे वेळापत्रक असते .

यासर्व पार्श्वभूमीवर शारीरिक स्वास्थ्य सर्वात महत्वाचे असते याचा विचार करून किमान केजी आणि प्राथमिक शाळांची वेळ हि संपूर्ण राज्यात सकाळी 9 वाजताची करणे अनिवार्य असायला हवे . तसा नियमच राज्य सरकारने
करायला हवा . शाळा 2 शिफ्ट मध्ये असल्या तरी केजी -प्राथमिकची वेळ 9 वाजताच्या आत असूच नये असा नियम करावा . वर्तमानात मुलांमध्ये व्यायामाचा अभाव आहे आणि दुसरीकडे लवकरच्या शाळेमुळे आरोग्याची होणारी ससेहोलपट यामुळे सुदृढ भारताच्या उद्दिष्टावरच घाला घातला जात आहे . 

अनेक पालक , शिक्षणतज्ञ , सामाजिक संस्थांनी शाळा खूप सकाळी नकोत अशा प्रकारची मागणी शिक्षण विभागाकडे केलेली आहे . पण अशा सूचनांकडे कानाडोळा करण्याची संस्कृती शिक्षण विभागाची असलयाने त्याचा विचार  केला गेलेला दिसत नाही . मा . राज्यपाल महोदयास राज्यातील सर्व पालकांच्या वतीने विनम्र निवेदन आहे की त्यांनी केवळ सूचना देण्यावर न थांबता या सूचनेची अंमलबजावणी होते की नाही यावर देखील लक्ष ठेवावे आणि आगामी शैक्षणिक वर्षांपासून बालवाडी ते 8 वी पर्यंतच्या वर्गाच्या शाळा या सकाळी 9 वाजेच्या आत नको या धोरणाची अंमलबजावणी राज्य सरकारला भाग पाडावे .

वर्तमानात अनेक शाळा या 2 सत्रात भरवल्या जात असल्याने सकाळच्या सत्राची वेळ बदलताना शाळा प्रशासनाला कसरत करावी लागणार ही बाब रास्त असली तरी सकाळी 7 वाजता शाळेची वेळ असल्याने लहान
मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत जे प्रश्न निर्माण होत आहेत त्याला नजरेआड करणे उचित ठरणार नाही . खरे तर बालवाडी , 5 वी च्या वर्गांची शाळा रोज 5/6 ला ठेवणे खरेच गरजेचे आहे का ? याचा देखील विचार करून पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक वर्गाच्या शाळेची वेळ कमी करून २ सत्रात शाळा चालवण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर मात करता येऊ शकेल .

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी देखील शाळेच्या वेळा सकाळी नको अशी मागणी करताना आपली मुले टीव्ही , मोबाईल , संगणकावरील खेळ अशा गोष्टींमुळे उशिरापर्यत जागणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी . शाळा  उशिरा आहे या कारणास्तव मुले जर 12/1 वाजेपर्यत इलेक्ट्रॉनिक पडद्यासमोर व्यस्त राहणार असतील तर शाळेच्या वेळा बदलून काहीच फायदा होणार नाही .

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 10 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar NCP Setback Special Report : अजित पवार यांचे आमदार फुटणार? राज्यात परिस्थिती काय?Maharashtra Congress Special Report : काँग्रेसला हवं झुकतं माप, मविआत वाढणार ताप? ABP MajhaKangana Ranaut Slap Video : कंगना रणौतला लगावली कानशिलात,  विमानतळावरील EXCLUSIVE व्हिडीओ

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget