एक्स्प्लोर
आर डी बर्मन यांच्या गाण्यातली सौंदर्यस्थळं
राहुल देव बर्मन, आपल्या पित्याच्या (सचिन देव बर्मन) दोन पावले पुढेच गेला आणि हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झाला.
![आर डी बर्मन यांच्या गाण्यातली सौंदर्यस्थळं RD Burman Birthday special blog by Anil Gowilkar आर डी बर्मन यांच्या गाण्यातली सौंदर्यस्थळं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/27103117/R-D-Burman.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
असे नेहमी म्हटले जाते, मोठ्या वृक्षासमोर लहान झाड वाढत नाही, मोठ्या झाडाची मुळे, ती वाढ रोखून ठेवतात. अर्थात याला काही अपवाद नक्कीच सापडतात आणि जेंव्हा असे अपवाद समोर येतात, तेंव्हा त्यांची झळाळी अलौकिक अशीच असते. राहुल देव बर्मन - यांच्या बाबतीत वरील विवेचन अत्यंत चपखल बसते, किंबहुना असे म्हणता येईल, राहुल देव बर्मन, आपल्या पित्याच्या (सचिन देव बर्मन) दोन पावले पुढेच गेला आणि हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झाला.
वडिलांच्या हाताखाली कारकीर्दीला सुरवात होणे क्रमप्राप्तच होते - असे बरेचवेळा ऐकायला मिळाले आहे, सचिन देव बर्मन यांच्या काही चाली राहुल देव बर्मन यांनी बांधल्या होत्या. एक उदाहरण म्हणून अनुमान मांडता येईल. "जाने क्या तुने कही" आणि "दिये जलते हैं, फुल खिलते हैं", या रचनांचे लयबंध सारखे आहेत. आणखी अशीच काही उदाहरणे देता येतील. मुद्दा असा, वडिलांच्या संगीतरचनांमध्ये मुलाचा सहभाग विशेष होता आणि हेच वैशिष्ट्य पुढे अधिक विस्ताराने सिद्ध झाले.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)