एक्स्प्लोर

पूरग्रस्तांना आता नेमकं काय हवंय?

खरं तर केलेली मदत कमीच पडेल अशी अवस्था कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात झाली आहे. प्रत्येक जण आपल्या परीने मदत करत आहे. पण आपण करत असलेली मदत खरंच त्यांना मदत ठरली पाहिजे इतकीच अपेक्षा!

सांगली कोल्हापूर साताऱ्यात पूर आला. अनेकांचे संसार बुडाले आणि त्याचवेळी अवघ्या महाराष्ट्रात मदतीचा पूर देखील आला. लोकांनी जमेल त्या पद्धतीने धान्य, कपडे, औषधांची मदत केली. पहिल्या काही दिवसातील मदतीचा ओघ आता हळूहळू थांबेल पण पूरग्रस्तांना आता खरी मदतीची गरज आहे. पाणी ओसरत आहे. लोक आता आपल्या घराकडे परतत आहेत. पुरानंतर आता गावागावात पाणी ओसरत आहे, काही ठिकाणी अजून ही पाणी आहे. पण जिथे पाणी ओसरलं तिथे घरा घरात ,वस्त्यांवर गाळ आणि चिखल जमला आहे. घर आणि तो परिसर आता राहण्यालायक नाही. आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नाही. त्यामुळे आता तिथे मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांची गरज आहे, ज्यांना अशा कामाची माहिती आहे. जे स्वच्छता करण्याच्या कामात भाग घेऊ शकतात. मनसे नेते अनिल शिदोरे यांच्या मते "महाविद्यालय, शाळा मधील NSS, स्काऊट आणि गाईड मधील विद्यार्थी, तरुण ज्यांना ट्रेनिंग असतं अशा विद्यार्थ्यांनी या भागात कामासाठी आलं पाहिजे, त्यामुळे मदत होईल".  सध्या अनेक ठिकाणी विविध संस्था, राजकीय पक्षांच्या माध्यमातून सफसफाईचे काम सुरू आहे पण ती मदत अपुरी आहे. लोकांना आता मदत करायची असेल तर काही दिवस या भागात येऊन स्वच्छता मोहिमेसाठी हातभार लावणं गरजेचे आहे. केरळच्या पुरात ज्यांनी मदत केली होती आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या विनिता तटके यांनी सांगितलं की "केरळमध्ये सरकारने नियोजन केले होते, कोणत्या कॅम्पमध्ये किती लोक. त्यांना नेमकी कशाची आवश्यकता आहे आणि दर आठवड्याने कॅम्पमधील स्थिती आणि आता कशाची मदत हवी ही यादी देखील अपडेट व्हायची. आता राज्य सरकार किंवा प्रशासनाकडे अशी माहिती नाही. लोक कोणत्या कॅम्पमध्ये आहेत, कशाची मदत हवी आहे. अनेक लोक आपल्या ओळखीने येऊन मदत देत आहेत किंवा नुसतं सामान येत आहे. ही मदत नेमकी कुठे कुणाला द्यायची. कुणाला कशाची गरज आहे हे नेमकं नियोजन करायला हवे" सध्या कोल्हापूर, सातारा सांगली भागात अन्नधान्य पोहचले आहे. तिथे मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मते आता तिथे सर्वाधिक गरज आहे भांड्यांची. संपूर्ण घर पाण्यात गेल्यामुळे अन्नधान्य दिले तरी घरात ते ठेवायला, शिजवायला भांडी हवी. नुसतं अन्नधान्य देऊन उपयोग नाही, शिजवायला गॅस, तेल, मसाले हे ही लागतं. त्यामुळे मदत करताना ह्याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुरात अनेक दिवस घर पाण्याखाली होती. अनेकांची घर तुटली तर जी घर वाचली ती आता सुरक्षित नाहीत. आता पाणी ओसरलं तरी घराला ओल असणार. ही घर काही दिवसात पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी घर पुन्हा बांधण्याची आवश्यकता आहे. काही आमदार गावं दत्तक घेत आहेत. पण समाजातील लोकांनी आता मोठ्या प्राणावर येऊन आर्थिक मदत किंवा घर बांधण्यासाठी जे काही करता येईल ती मदत करणे आवश्यक आहे. एक अशीही मदत करता येऊ शकते की जमेल तसं लोकांनी एक कुटुंब दत्तक घेतले तरी मदत होईल. कुटुंब दत्तक घेणं म्हणजे काय तर त्या घरात किमान पुढचे तीन महिने अन्नधान्य, ते शिजवण्यासाठी गॅसची- भांड्यांची सोय, घरातील लोकांना चटई, बेड, चादर, कपडे , शालेय पुस्तक किमान इतकी मदत झाली तरी खूप आहे. कोणी फ्रीज, फर्निचर, टीव्हीची अपेक्षा ठेवत नाही. पण किमान बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी जर एक कुटुंब दत्तक घेतले तर खारीचा वाटा असेल. सध्या पूरग्रस्त भागात साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे यासंबंधी औषध तिथे पोहचणे आवश्यक आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर मृत जनावरांची विल्हेवाट लावणे आता आवश्यक आहे. लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य मदत पोहोचली तरी गुरांसाठी आवश्यक चारा पोहोचला नाही. गुरांना खाण्यासाठी, त्यांना आरोग्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. ही मदत पोहोचणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी जुने कपडे पाठवले ते परत पाठवण्यात आले. आता हे जुने कपडे भांडीवाल्यांना देऊन त्यांच्याकडून नवीन भांडी घेऊन पुरग्रस्तांना देता येऊ शकतात. त्यामुळे जमेल त्या आसपासच्या जिल्ह्यांतून भांडीकुंडी मदत होऊ शकेल. अतिशय महत्वाचे म्हणजे पूरग्रस्तांची ओळखपत्रं,आवश्यक कागदपत्रं पाण्यात बुडाली आहेत. गावात आपला सात बारा, आधारकार्ड, रेशन कार्ड, मार्कशीट, महत्वाची कागदपत्रं सगळं बुडालं आहे. लोकांकडे ओळखपत्रं राहिलेली नाहीत. शासकीय मदत असो किंवा काहीही गरज लागली तर ओळखपत्रं लागतात. त्यामुळे शासनाने लोकांना त्यांची ओळखपत्र तात्काळ देणं आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा तहसीलदारांकडे फेऱ्या माराव्या लागतील. ओळखपत्र नसल्याने मदत मिळत नाही अशी स्थिती होईल. त्यामुळे आधार कार्ड, रेशन कार्ड, सात बारा तात्काळ खूप ताटकळत न ठेवता कसा देता येईल, यासाठी कॅम्प लावता येईल अशी सोय झाली पाहिजे. गणपती उत्सव जवळ येत आहे. यावर्षी पूरग्रस्त भागात गणेशोत्सव कितपत साजरा होईल ही शंका आहे. यामुळे अशा गावांमध्ये एक गाव, एक गणपती संकल्पना राबवता येईल. खरं तर या स्थितीत सण साजरा करण्याचे भान कुणाला नाही पण तरीही भकास घर, शेत पाहून मन उदास होण्यापेक्षा गणपतीच्या निमित्तानं लोक हे दुःख काही काळ विसरू शकतील. सांगली, कोल्हापूर, सातारा हा भाग तसा सधन भाग समजला जातो. लोकांची शेती, गुरं ढोरं होती. पण आता आपल्या डोळ्यासमोर सगळं पीक वाया गेलं. शिरोळ तालुक्यातील विश्वास काळे यांनी सांगितलेला अनुभव तर भयाण आहे. तीस एकर उसाचे पीक घेणारा माणूस आज जेवणासाठी रांगेत उभा आहे. त्याच संपूर्ण पीक पाण्याखाली गेलं. 2005 च्या पुरात जे नुकसान झालं, ते कर्ज आता फेडून झालं. माझं आयुष्य त्यात गेलं. आता या पुराने जे नुकसान झालं त्याच कर्ज माझी मुलं आयुष्यभर फेडत बसणार अशी त्या शेतकऱ्याने भावना व्यक्त केली आहे. इथला माणूस खचून गेला आहे. भकास डोळ्याने आपल्या शेतीकडे लोक पाहत बसतात.  त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. आपण ह्यातून बाहेर येऊ, सावरू हा मानसिक आधार हवाय. मास कौन्सिलिंगची गरज पूरग्रस्त भागात आहे" खरं तर केलेली मदत कमीच पडेल अशी अवस्था कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात झाली आहे. प्रत्येक जण आपल्या परीने मदत करत आहे. पण आपण करत असलेली मदत खरंच त्यांना मदत ठरली पाहिजे इतकीच अपेक्षा! सरकार, प्रशासन जे करेल ते करेल पण समाज म्हणून आपण ही जे काही करता येईल आणि ज्याचा फायदा पूरग्रस्तांना होईल अशीच मदत केली पाहिजे!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
Sujay Vikhe Patil: शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
Nilesh Rane Vs BJP: गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
Sharad Pawar on Congress :  मुंबई पालिकेसाठी काँग्रेसचा 'स्वबळाचा' नारा: महाविकास आघाडीत तणाव! उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून नाराजी व्यक्त
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
Sujay Vikhe Patil: शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
Nilesh Rane Vs BJP: गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Salil Deshmukh : मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार, सलील देशमुखांची रोखठोक भूमिका; नागपुरातील निवडक प्रचारानं चर्चेला उधाण
आधी राजीनामा, आता म्हणताय, मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार; सलील देशमुखांचा निवडक प्रचार चर्चेत
Karnataka Congress Crisis: डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
Shani Sade Sati: 2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
2026 वर्षात शनिची साडेसाती तुमच्यावर नाही ना? फार कमी लोकांना माहीत, ठरवलेले प्लॅन रद्द होण्याची शक्यता, ज्योतिषी म्हणतात..
Raj Thackeray: काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
Embed widget