एक्स्प्लोर

Blog : 'अपूर्वाई'च्या झऱ्यात खळखळ वाहणारा 'व्यक्ती'; 'पु.ल देशपांडे' एक हास्य मैफल

Blog :  महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांची यादी तशी फार मोठी. म्हणजे अगदी बालगंधर्वांपासून ते पु.ल देशपांडे, अचार्य अत्रे अशी बरीच मंडळी या यादीत समाविष्ट आहे. त्यातलाच पु.ल.देशपांडे, अत्रे यांचा काळ मराठी रसिक प्रेक्षकांच्या विशेष आवडीचा. असं म्हणतात की, रडवणं सोप्पं असतं पण हसवणं तितकचं कठीण असतं. पण पु.लंच्या भाषणाने आजही तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंतचा वर्ग खळखळून हसतो, हीच काय ती त्या हास्य मैफीलीची पोच पावती. कलेचा वारसा लाभलेल्या याच महाराष्ट्र पु.लं देशपांडेंसारखं एक व्यक्तिमत्त्व जन्माला यावं आणि अवघ्या महाराष्ट्राच्या कायम स्मरणात रहावं यासाठी पु.ल. देशपांडेंच व्हावं लागतं, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

नागपूर, मुंबई, पुणे सारख्या शहरी लोकांवर केलेली मिश्किल टीप्पणी असो किंवा अगदी आडनावरुनही केलेली  गंमतीशीर कानटोचणी, या सगळ्यामुळे आज अभिमानाने सांगतो की, आताच्या स्टँडअप कॉमेडीचे जन्मदाते हे आमचे पु.ल देशपांडेच आहेत. नाटक, सिनेमा,पुस्तकं अशा अनेक माध्यांमधून पु.लंमुळे एक वेगळा रसिक आणि वाचक वर्ग तयार झाला. ज्या वर्गाने पु.ल देशपांडे या व्यक्तीवरच नाही तर त्याच्या लेखणीवरही अगदी निस्वार्थ प्रेम केलं. 

बटाट्याची चाळ, अपूर्वाई, व्यक्ती आणि वल्ली, गाठोडं, आपुलकी, असा मी असामी अशा अनेक पुस्तकांचा खजिना या अवलियाने दिला. म्हणूनच अगदी समान्य वर्गालाही पु.ल जास्त भावले. बटाट्याच्या चाळीतून त्यांनी सांगितलेली चाळीची गोष्ट असो अपूर्वाईच्या कथा असो किंवा अनुभवाचं गाठोडं असो, या प्रत्येक खजिन्यातून पु.लं आणि आयुष्य अगदी वेगवेगळ्या पद्धतीने गवसलं. व्यक्ती आणि वल्ली मधून भेटलेली सखाराम गटणे, नामू परिट, नारायण, अंतू बर्वा, हरितात्या, नंदा प्रधान, लखू रिसबूड, अण्णा वडगावकर, चितळे मास्तर ही पात्रं तर प्रत्येकाला आपल्या घरातलीच वाटलीत. 

स्वच्छ लिखाण, साधी भाषा, आयुष्याची गोष्ट, सामान्यांच्या व्यथा अन् अनुभवांच्या कथा अशा अनेक गोष्टी पु.लंनी अगदी सहज साधल्या आणि कागदावर लिहिल्या देखील. 'अंमलदार','गुळाचा गणपति','घरधनी','चोखामेळा', दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' अशा सलग अकरा सिनेमांचं संगीत दिग्दर्शन करणाऱ्या या विनोदी लेखकाने संगीताच्या सूरांची देखील अविरत सेवा केला. 

, ‘ती फुलराणी’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘तुका म्हणे आता’, ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकांच्या माध्यमातून रंगदेवतेलाही विनम्र अभिवादन त्यांनी केलं. खरंतर नाटक, सिनेमा, साहित्य यांमधून लेखक, दिग्दर्शक, विनोदी लेखक, संगीत दिग्दर्शक, अभिनेता अशा चौफेर भूमिका साकारणारा कलाकार मराठीत जन्माला आला, ही मराठी सिनेसृष्टीची आणि मराठी रसिकांची पुण्याईच म्हणावी लागेल. म्हणूनच 'अपूर्वाई'च्या झऱ्यातून खळखळ वाहणारा 'व्यक्ती', 'आपुलकी'च्या 'गाठोड्या'त अनुभवांचा साठा ठेवून 'असाच मी' म्हणणारे पु.लं देशपांडे ही हास्य मैफल आमच्यासाठी आजही स्पेशलच...

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Blast: 'समन्वयाचा अभाव', NSG टीमला अवजड सामानासह भिंत ओलांडावी लागली!
Delhi Blast: 'रुग्णालयाच्या माहितीनुसार आठ जणांचा मृत्यू', गृहमंत्री Amit Shah यांची माहिती
Delhi Blast: 'सर्व शक्यता तपासून बघणार', Amit Shah यांचा इशारा; NSG, FSL कडून तपास सुरू
Delhi Blast: 'आम्ही लहानपणापासून इथेच राहतो', लाल किल्ल्याजवळील स्फोटाने बेघर हादरले
Delhi Blast: 'उद्या सकाळीच बड्या अधिकाऱ्यांसोबत Meeting घेणार', स्फोटानंतर गृहमंत्री Amit Shah यांचा मोठा निर्णय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Delhi Blast : नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
Embed widget