एक्स्प्लोर

BLOG | पर्यावरणाचा इशारा ओळखा, नाहीतर..

आताच आपण निसर्गावरचा अत्याचार थांबवला नाही तर भविष्यात येणाऱ्या संकटापासून वाचायला डोक्यावरचं छत आणि पायाखालची जमीनही नसेल.

आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. इथे धर्म, भाषा, सण, परंपरा, खाद्यपदार्थ यांचं जे वैविध्य आहे; तसं जगात कुठल्याचं देशात नाही. हे आता इथे लिहिण्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी शिकवताना एक गोष्ट मात्र कायमची आपल्याला सांगायची राहून गेलीये. किंबहुना ती गोष्ट या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची, उल्लेख करण्याजोगी आहे हेच कुणाला कधी वाटलं नाहीये आणि हेच आपलं दुर्दैव आहे. ही गोष्ट म्हणजे आपल्या जगण्याला खरा अर्थ देणारी आपली जैवविविधता. आपला देश जैवविविधतेच्या बाबतीत जगातील टॉप 17 देशांत येतो. या बाबतीत जगात आपला 9 वा क्रमांक लागतो. आपल्या देशात जगातल्या जैवविविधतेच्या मोठ्या हॉटस्पॉटमधील चार हॉटस्पॉट आहेत. हिमालय पर्वतरांगा, पश्चिम घाट, उत्तर-पूर्वेकडच्या डोंगररांगा आणि अंदमान निकोबार द्वीपसमूह हे जैवविविधतेच्या दृष्टीनं देशातले सर्वात संपन्न प्रदेश म्हणजे हॉटस्पॉट आहेत. आज हे सांगण्याचं कारण म्हणजे 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. दरवर्षी जगभरातील 100 हून अधिक देशात हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाकडून एक संकल्पना किंवा विषय ठरवण्यात येतो आणि एक देश या दिनाच्या औपचारिक कार्यक्रमाचा आयोजक असतो. यंदा जैवविविधता हा विषय असून कोलंबियासह जर्मनी याचे आयोजक आहेत. उद्देश हाच की जगभरात या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती व्हावी, चर्चा घडून यावी, पर्यावरणाच्या या महत्त्वाच्या विषयाबाबत सगळ्यांचं लक्ष वेधलं जावं. जैवविविधतेच्या बाबतीत आपण कितीही संपन्न असलो तरी जगातल्या सात आश्चर्यात आपला ताजमहाल आहे हे जसं आपण अभिमानानं सांगतो. तसं आमच्याकडे हिमालय आहे किंवा सह्याद्री आहे हे आपल्या अभिमानाचा भाग कधीच नसतात. केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला ज्या क्रूरपणे मारलं गेलं ते पाहून ऐकून आपण व्यथित होतो, चिडून सोशल माध्यमांवर व्यक्त होतो. पण, हे एक उदाहरण आहे. अशा शेकडो जीवांना माणूसच आपल्या स्वार्थासाठी मारत आलाय. त्यात आपण सगळेच आलो. आपल्या गरजांसाठी, आपल्या हव्यासासाठी आपण अशा अनेक निष्पापांचे बळी घेतले आहेत. यातले कित्येक दुर्मिळ किटक, प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती अस्तंगत झालेत. गेल्या काही वर्षांत जगानं तापमान वाढ, दुष्काळ, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ, भूस्खलन, अशी संकटं अनुभवली आहेत. आता आपण कोरोनासारख्या आपत्तीचा सामना करतोय. पण, लॉकडाऊनमुळे दिसणाऱ्या चमत्कारांमुळे थक्क होतोय. चंदीगढमधून दिसणारा हिमालय, मुंबईच्या समुद्रात बऱ्याच वर्षांनी दिसलेले डॉल्फिन, मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांत सध्या अनुभवायला मिळणारी शुद्ध हवा याचं आपल्याला मोठं कौतुक वाटतंय. पण, तरिही या गोष्टी कायम राहाव्यात यासाठी आपण कणभरही प्रयत्न करत नाही. खरं तर निसर्ग आपल्याला त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्तपणे बागडू देत आलाय. त्याचा सगळा खजिना त्यानं आपल्याला खुला केलाय. पण, आपण त्यालाच बोचकारतोय. त्यामुळे, निसर्गही कोपलाय. त्यानं काही छोटे मोठे धक्के देऊन इशारा दिलाय. तरिही आपल्याला जाणीव नाहीये. निसर्गानं आता माणसाशी युद्ध पुकारलंय. पुढच्या काही वर्षांत न भुतो न भविष्यती असं संकट माणसासमोर उभं ठाकणार आहे. कोरोनाच्या संकटापासून सुरक्षित राहायला आपल्याकडे घर तरी आहे. पण, आताच आपण निसर्गावरचा अत्याचार थांबवला नाही तर भविष्यात येणाऱ्या संकटापासून वाचायला डोक्यावरचं छत आणि पायाखालची जमीनही नसेल.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Monsoon Trek : पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Lok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Monsoon Trek : पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Embed widget