एक्स्प्लोर

KKR vs DC IPL 2025: कोलकाता संघाचे नारायण नारायण

KKR vs DC IPL 2025: नुसते नावात नारायण असून चालत नाही...नारायणासारखी स्थितप्रज्ञता सुद्धा असावी लागते...अत्युच्च शिखरावर किती शांत राहतो हा माणूस. मॅनेजमेंट गुरूंनी सुनील नारायण वर चार-पाच स्लाईड बनवायला काही हरकत नाही...एका बाजूला एक बळी मिळविला की गोलंदाज काय पद्धतीने जल्लोष करतात...एखादे अर्धशतक  झाले की फलंदाज किती जल्लोष करतात...पण हा माणूस गेली कित्येक वर्ष आय पी एल स्पर्धेत खेळतो..आपल्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजाना भांबावून सोडतो...आपल्या फलंदाजीने मोठ मोठ्या गोलंदाजना चक्रावून सोडतो..पण तरी सुद्धा हा शांत...या माणसाच्या चेहऱ्यावर एखादे स्मित हास्य पाहणे म्हणजे कपिला षष्ठीचा योग...गेल्या वर्षीच्या आय पी एल स्पर्धेत हा MVP पुरस्काराचा मानकरी..पण इतका दमदार परफॉर्मन्स असून कधी अहम पणा नाही...की कधी आत ताई  पणा नाही..कसे जमू शकते या माणसाला. .अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आम्ही सुनील नारायण या माणसाकडून खूप काही शिकू शकतो...

कालच्या सामन्यात अगदी मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावली...संघाला जेव्हा विकेट हव्या होत्या तेव्हा सुनील नारायण याने विकेट मिळवून दिल्या ..त्या सुद्धा कोणाच्या डुप्लेसी..अक्षर...आणि स्टब...अजिंक्य रहाणे जखमी झाल्यावर कर्णधारपद सांभाळले...४ षटकात केवळ २९ धावा ३ बळी आणि एका अचूक फेकीवर राहुल याला धावचीत केले... लीड फ्रॉम दि फ्रंट यालाच तर म्हणतात...दिल्ली संघाला त्याने सांघिक १४ व्या व  आपल्या तिसऱ्या षटकात बॅकफूट वर नेले ..त्याच षटकात त्याने अक्षर आणि स्टब यांना बाद करून कोलकाता संघाचे पारडे जड केले..दिल्ली संघाकडून अक्षर आणि डुप्लेसी यांनी प्रयत्न केले..४२ चेंडूत ७६ धावांची भागीदारी केली..पण ते बाद झाल्यावर राजधानी चे बाकीचे डबे रुळावरून घसरले ...त्यांच्या या घसरणीत वरूण ने सुद्धा वाटा उचलला...

नाणेफेक जिंकून दिल्ली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून कोलकाता संघाला प्रथम फलंदाजी केली..आज कोलकाता संघाने २०९ धावा जरी धावफलकावर लावल्या तरी त्यांच्या एका सुद्धा फलंदाजाने अर्धशतक झळकावले नाही हे विशेष..पहिल्या विकेट साठी ४८ धावा जोडून पहिल्या ६ षटकात त्यांनी ७९ धावा केल्या...कोलकाता संघाच्या प्रत्येक फलंदाजाने छोट्या छोट्या भागीदारी केल्या..आणि आज मधल्या षटकात रघुवंशी आणि रिंकू यांनी ४६ चेंडूत ६१ धावा करून धावसंख्येला आकार दिला...रघुवंशी याने विपराज याला जे सलग दोन षटकार खेचले त्यावरून अभिषेक नायर त्याला इतके हाय रेट का करतात हे समजून येते..आज आल्या आल्या अजिंक्य ने स्टार्क ला एक सुंदर पिक अप चा षटकार खेचला आणि दुसऱ्या चेंडूवर एक खणखणीत ऑन ड्राइव्ह मारला...ते  दोन्ही फटके पाहून दिल्ली संघाचे प्रशिक्षक पीटरसन सुद्धा खुश झाले...इतके डोळ्यांना आनंद देणारे ते फटके होते...वेगात निघालेली राजधानी स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना मंदावली आहे....त्यांचे पुढील सामने हैदराबाद..पंजाब..गुजरात..आणि मुंबई संघासोबत आहेत...राहुल नाम तो सुना होगा असे म्हणणारा शाहरुख सिनेमात शेवटी शेवटी  नायिकेचे प्रेम मिळवितोच...दिल्ली संघाच्या राहुल आणि अक्षर यांना घसरलेली राजधानी पुन्हा रुळावर आणून आय पी एल नामक नायिकेला गवसणी घालायची आहे.. कारण सलग दोन सामने हरल्यावर त्यांना सुद्धा म्हणण्याचे असेल हारकर जितने वालों को बाजीगर कहते है...फक्त राहुल याला कंतारा सिनेमातून बाहेर येऊन बाजीगर व्हावे लागेल.

हा लेखही वाचा:

RR vs GT, IPL 2025: बॉस बेबी वैभव सूर्यवंशी!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
ABP Premium

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget