एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!
तेव्हा दप्तर घरी पोचवून पालकांना कळवायची जबाबदारी याच मुलीवर टाकली गेली. पालक मुलींना शोधत असताना त्यांनी विहिरीत उडी मारल्याचा अंदाज कुणीतरी व्यक्त केला. पोलीस आले. मुलींची प्रेतं बाहेर काढून पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी नेली. तिघींची दप्तरं आणि स्लीपर्स विहिरीजवळ रांगेत ठेवलेल्या होत्या.

स्वयंपाकासाठी येणाऱ्या मावशीचं डोकं आज सटकलेलं दिसत होतं. तिला स्वत:हून काही विचारायचं नाही, असा नियम मी घालून घेतलेला होता; कारण तिला कामावर ठेवून घेण्याआधीच तिला माझ्याकडे घेऊन येणाऱ्या बाईनं ‘सांभाळून घ्यायची तयारी असेल तरच तिला काम द्या’ असं थेट सांगितलं होतं. नियमित येईल ना, काम वेळेत व व्यवस्थित करेल ना, या प्रश्नांचं उत्तर होकारार्थी होतं. मग सांभाळून – समजून घ्यायचंय, ते कशाबाबत? तर तिचं हे डोकं असं अधूनमधून ‘भिन’ होतं, त्याबाबत. याच कारणानं तिला काम मिळत नव्हतं की, लक्ष नसताना काही अपघात झाला, भाजलं-जळलं तर काय करा? यानंतर प्रत्येक बाईची असते, तशी हिचीची गोष्ट समोर आली. एकुलता एक सुस्वभावी मुलगा. इयत्ता पाचवीत शिकणारा. आईला घरी-बाहेर कामात मदत करणारा. नवरा प्रचंड तापट. मारहाण करणार, शिवीगाळी देणार, व्यसनात पैसा उधळणार.
एके दिवशी मुलाला शाळेत प्रकल्पासाठी काही साहित्य हवं होतं. बापाने नकार तर दिलाच, वर शिक्षणाचा उद्धार केला आणि आईला मदत करतो, बायकांची कामं करतो म्हणून ‘बायल्या’ म्हटलं. मुलाची समजूत काढून, कामावरून पैसे घेऊन येताना तुला हवं ते साहित्य घेऊन येते म्हणून, त्याला शाळेत पोहोचवून ही कामावर गेली. मुलगा शाळा अर्धी सोडून घरी परतला. ही संध्याकाळी घरी गेली, तेव्हा गळफास लावून घेतलेला दिसला. पोलीस, पंचनामा, अंत्यसंस्कार, तेरावा सगळं पार पडलं. नवऱ्याची तुच्छता अधिक वाढली होती... आत्महत्या केली म्हणजे तर तो ‘बायल्या’ असण्यावर शिक्कामोर्तबच झालेलं त्याच्या मते. असा पोरगा मेला हेच बरं, असं मत. त्याच्यापुढचा प्रश्न फक्त ‘आपल्याला पिंड कोण देणार?’ असा ‘स्वर्गीय’ होता! नात्यागोत्यात दत्तकासाठी विचारणा झाली. याचा स्वभाव माहीत असल्याने कुणी तयार झालं नाही. त्यातून बायकोचा माहेरचं मूल नको होतं आणि आपल्याच नात्यातला, तोही मुलगाच हवा होता असे अजून दोन मुद्दे आडवे आले. आता आज त्याने नवा फतवा काढलाय की, बायकोनं कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली होती, ते टाके काढून टाकायचे आणि तिनं पुन्हा एक मुलगा जन्माला घालायचा!
हे सगळं पुन्हा आठवलं, त्याचं निमित्त पुन्हा अशीच एक बातमी आहे. एक नव्हे, सांकरी, रेवती, मनीषा आणि दीपा या चार विद्यार्थिनींनी शाळेजवळच्या विहिरीत उडी मारून सामूहिक आत्महत्या केली. घटना तामिळनाडूमधल्या पनक्कम इथल्या मुलींच्या सरकारी उच्च माध्यमिक शाळेतली आहे. अकरावीत शिकणाऱ्या १४ मुलींना तिमाही परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून मीनाक्षी नामक शिक्षिकेने कुत्री, म्हैस असं संबोधत शिवीगाळ केली आणि वर्गात हात वर करून उभं राहण्याची शिक्षा दिली. या मुलींपैकी सांकरीला दोन मार्कांच्या दोन-तीन प्रश्नांत अर्धा-अर्धा मार्क मिळाले होते, त्यामुळे तिनं मैत्रिणीला तिचे मार्क विचारले. तिला पूर्ण मार्क मिळाले होते. त्यांना बोलताना पाहून शिक्षिका प्रचंड संतापल्या.
दुसऱ्या दिवशी त्यांनी ११ मुलींनी पालकांना शाळेत घेऊन यावं, कारण आता त्यांना शाळेतून काढलं जाणार आहे असंही सांगितलं. शाळेतून नाव काढल्याची बातमी घरी कशी सांगायची याची काळजी, भीती मुलींना वाटू लागली. काहींचे पालक मजुरी करणारे होते. पोटाला चिमटा काढून मुलींना शिकवत असताना, त्यांना चांगले मार्क मिळाले नाहीत, हे समजून घेण्याच्या मन:स्थितीत आपले पालक असणार नाहीत, याचा अंदाज त्यांना होता. खेरीज पालक शाळेत आले तर शिक्षक सगळ्यांसमोर पालकांचाही अपमान करतील, अशी धास्ती त्यांच्या मनात होती. त्यामुळे घरी काहीच सांगायचं नाही, असं त्यांनी ठरवलं. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत घरी जाऊन, जेवून त्या परतल्या तेव्हा पूर्ण वर्ग बाहेर ग्राउंडवर आणला होता. वर्गात बोलणं, शिक्षिकांना उलट उत्तर देऊन अपमान करणं हे आरोप या मुलींवर लावण्यात आले आणि त्या ‘मुंबईच्या डॉन’हून देखील वाईट आहेत असं मुख्याध्यापिका म्हणाल्या. या मुलींचे पालक अशिक्षित असल्याने त्या अशा बिघडलेल्या आहेत, असं अजून एक शिक्षिका म्हणाली. तब्बल अडीच तास या मुली मैदानात भीतीने थरथर कापत, रडत, दोन्ही हात वर करून उभ्या होत्या; पण त्यामुळे कुणालाच काही फरक पडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता त्यातल्या दोन मुली शाळेत आल्या, एकीनं आपलं दप्तर वर्गात ठेवलं; नंतर त्या गायब झाल्या. मुली गायब झाल्याचं मुख्याध्यापिकेला १० वाजता समजलं, तेव्हाही त्यांनी या मुलींच्या नात्यातल्या मुलींना बोलावून, “त्या कुत्र्या कुठे आहेत?” असा जाब विचारला. पैकी दोघींना तिने सायकली घेऊन शाळेबाहेर जाताना पाहिलं होतं, ‘बाय’ म्हणून त्या वेगाने निघून गेल्या होत्या व त्यांचे चेहरे दु:खी होते.
तेव्हा दप्तर घरी पोचवून पालकांना कळवायची जबाबदारी याच मुलीवर टाकली गेली. पालक मुलींना शोधत असताना त्यांनी विहिरीत उडी मारल्याचा अंदाज कुणीतरी व्यक्त केला. पोलीस आले. मुलींची प्रेतं बाहेर काढून पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी नेली. तिघींची दप्तरं आणि स्लीपर्स विहिरीजवळ रांगेत ठेवलेल्या होत्या.
आता शाळेच्या मुख्याध्यापिका राममणी आणि वर्गशिक्षिका मीनाक्षी व अजून एक शिक्षिका अशा तिघींना तात्पुरतं निलंबित करण्यात आलं आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी सरकारला सरकारी शाळांमध्ये समुपदेशन केंद्र स्थापन करण्याची मागणी केली; तसंच सरकारने पीडितांच्या कुटुंबांना मदत करावी अशीही मागणी केली.केसचं पुढे काय व्हायचं ते होईल, पण बहुसंख्य मुलांना घरात आणि शाळेत कुठेच सुरक्षितता, विश्वास लाभत नाही हे या घटनेने पुन्हा एकदा लक्षात आलं. आत्महत्या ही केवळ अपमानाच्या दु:खातून झाली आहे का? कमी मार्क मिळाल्याची नाचक्की, आपला खुलासा/बाजू ऐकून न घेतल्याची खंत, पालकांच्या प्रतिक्रियेची धास्ती, पालकांचाही सार्वजनिक अपमान केला जाईल याची भीती, शाळेतून काढलं गेल्याने भविष्याची काळजी... कितीतरी नकारात्मक भावना एकवटून आल्याने मुलींनी हा आत्मघाताचा निर्णय घेतलेला दिसतोय. असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये.
'चालू वर्तमानकाळ' सदरातील याआधीचे ब्लॉग :
चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं
चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन
चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’
चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं
चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर
चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड
चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे
चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं
चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं
चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या
चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…
चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…
चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत
चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!
चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब

View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
सांगली
राजकारण