एक्स्प्लोर
जाऊबाईंच्या भांडणात याकूब फासावर !
कुठल्याही संयुक्त कुटुंबात दोन जावा एकत्र राहत असतील, तर त्यांच्यात भाडणं होणं, ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. त्या नेहमीच आपापल्या पतींकडे एकमेकींच्या तक्रारी करुन कान भरत असतात. मात्र, जावा-जावांमध्ये होणारी बारीक-सारीक भांडणांमुळे कुणी फाशीपर्यंत पोहचवलंय, असं तुम्ही कधी ऐकलं नसेल.
12 मार्च 1993 च्या बॉम्बस्फोटाआधी मुंबईतील माहिम परिसरातील अल हुसैनी इमारतीत टायगर मेमन हा आई-वडील आणि याकूब या आपल्या लहान भावासोबत राहत होता. टायगर मेमनची पत्नी शबाना आणि याकूबची पत्नी राहीन यांचं एकमेकींशी अजिबात पटत नव्हतं आणि त्यामुळे दोघींमध्ये कायम खटके उडत.
मुंबई बॉम्बस्फोटच्या कटानुसार टायगर मेमनने याकूब मेमनसोबत कुटुंबातील सर्व सदस्यांना भारताबाहेर पाठवलं. कुटुंबातील सगळेच जण पहिल्यांदा दुबईला, त्यानंतर सौदी आणि शेवटी पाकिस्तानात गेले. या पूर्ण प्रवासादरम्यान जावा-जावांमध्ये म्हणजे टायगर आणि याकूबच्या पत्नींमध्ये भांडणं सुरुच होती.
याकूबची पत्नी दररोज टायगर आणि त्याच्या पत्नीची याकूबकडे तक्रार करत असे. "तुमच्या भावामुळे आपल्याला हे दिवस पाहावे लागत आहेत. आपण आपल्या नातेवाईकांपासूनही दुरावलो. ना कुणाच्या लग्नसमारंभात जाऊ शकत, ना कुणाच्या अंत्यसंस्काराला. याला आयुष्य म्हणायचं का? आता फक्त तुमच्या भावाच्या तुकड्यांवर आयुष्य काढावं लागेल.", असे याकूबची पत्नी त्याला वारंवार सांगत राहायची.
आपल्या पत्नीकडून रोज रोज ही तक्रार ऐकून याकूबच्याही जिव्हारी लागत असे. जावा-जावांमधील होणाऱ्या भांडणांमुळे तो अक्षरश: कंटाळला होता.
अखेर याकूबने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. याकूबच्या या निर्णयामागे जावा-जावांमधील भांडण हेही एक कारण होतं. रोजच्या भांडणांपासून त्याला सुटका हवी होती आणि त्याने टायगर मेमनसोबत बंडखोरी करुन भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
टायगर मेमन आणि अयूब मेमन यांना कराचीत सोडून याकूब नेपाळमार्गे भारतात परतला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी राहीन, इतर भाऊ आणि त्यांच्या पत्नी, आई-वडील हे होते. त्यानंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर याकूबला अटक करण्यात आली.
याकूबला आशा होती की, बॉम्बस्फोटात मोठी भूमिका नसल्याने काही वर्षात सुटका होईल. दिल्लीत अटक केल्यानंतर पत्नी राहीन, भाऊ आणि नातेवाईकांविरोधात टाडाअंतर्गत खटला चालवला गेला. याकूबची पत्नी राहीन हिला कोर्टाने सोडून दिलं. मात्र, याकूबला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.
30 जुलै 2015 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नागपूर जेलमधअये याकूबला फासावर लटकवण्यात आले. 30 जुलैला याकूबचा वाढदिवसही होता.
मेमन कुटुंबाच्या एका निकटवर्तीयाच्या म्हणण्यानुसार, जर जावा-जावांमध्ये भांडणं झाली नसती, तर कदाचित याकूब भारतात येण्यासाठी तयार झाला नसता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement