एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिभेचे चोचले : संजीव कपूरचं ‘यलो चिली’
पद्मश्री पुरस्कार मिळवणारे देशातले पहिले शेफ संजीव कपूर हे नावच आता ब्रॅण्ड होऊन बसलंय, त्या ब्रॅण्डच्या नावाचा फायदा घेत आता संजीव कपूर या ब्रॅण्डचे अनेक रेस्टॉरन्टस केवळ मुंबईतच नाहीत तर अगदी जगभर आहेत.
शेफ म्हणजेच आपल्या साध्या मराठी भाषेत आचारी असं लोकांच्या मनातलं समीकरण खऱ्या अर्थाने बदलवणारा शेफ म्हणजे संजीव कपूर, खाद्यपदार्थांच्या दुनियेला ग्लॅमर मिळवून देणारा आणि साधारण वीस वर्षापूर्वी ‘नमक स्वादानुसार’ म्हणत लोकांच्या घरोघरी पोहोचलेला संजीव कपूर. संजीव कपूरच्या छोट्या-छोट्या टिप्स अगदी घरोघरी वापरल्या जाऊ लागल्या, त्यालाही आता काळ उलटला, दरम्यान एक नवी खाद्यसंस्कृतीच उदयाला आली आणि सेलिब्रिटी शेफ्सची एक जंत्रीच तयार झाली. पण संजीव कपूरची बातच वेगळी, मध्यमवयीन महिलांपासून नुकत्याच स्वयंपाकाचा छंद जोपासू लागलेल्या युवतींपर्यंत सगळ्यांना रेसिपीज पुरवणाऱ्या संजीव कपूरचं रेस्टॉरन्टही लोकप्रिय होणार यात वादच नाही.
पद्मश्री पुरस्कार मिळवणारे देशातले पहिले शेफ संजीव कपूर हे नावच आता ब्रॅण्ड होऊन बसलंय, त्या ब्रॅण्डच्या नावाचा फायदा घेत आता संजीव कपूर या ब्रॅण्डचे अनेक रेस्टॉरन्टस केवळ मुंबईतच नाहीत तर अगदी जगभर आहेत..एक हॉंगकॉंग नावाची रेस्टॉरन्ट्सची चेन आहे संजीव कपूरच्या अनेक रेस्टॉरन्ट चेन्सपैकी एक, मुंबईतही हॉंगकॉंग नावाचे रेस्टॉरन्ट आहेत, या हॉंगकॉंगमध्ये पूर्णपणे एशियन म्हणजे चायनिज, थाय, जपानी खाद्यपदार्थ मिळतात. ’खजाना’ या नावाची भारतीय पदार्थ सर्व करणारी जगभर अनेक रेस्टॉरन्टस आहेत. पण मुंबईकरांना संजीव कपूरचं माहिती असलेलं रेस्टॉरन्ट म्हणजे ‘द येलो चिली’ नावाचं संपूर्ण भारतीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असेली फूड चेन. पवई, दादर आणि ठाणे अशा पूर्व उपनगरातलं हे येलो चिली नावाचं संजीव कपूरचं रेस्टॉरन्ट जबरदस्त चालतं.
थोडं मागे जाऊन नीट आठवलं की लक्षात येईल की पारंपरिक पद्धतीने जेवणाऱ्या आपल्यासारख्या भारतीयांना आणि खासकरुन भारतीय महिलांना गार्निशींग म्हणजेच पदार्थाची सजावट कऱण्याची कला शिकवली ती संजीव कपूरने. ताटात चारही बाजूंनी पदार्थ वाढताना तो पदार्थ कढईतून वाडग्यात किंवा भांड्यात काढणारे आपणही पदार्थ सजवून प्रेझेंट करु लागलो ते याच शेफमुळे. अगदी संजीव कपूरची हीच खासियत प्रकर्षाने जाणवते ते ‘येलो चिली’ मधल्या प्रत्येक पदार्थांच्या सजावटीमध्ये. स्टार्टर्स, मॉकटेल किंवा मेनकोर्स म्हणून जेवण असं काहीही मागवा, विविध आकाराच्या आकर्षक डिशेस, ग्लासेस आणि अतिशय सुंदर अशी सजावटीची पद्धत या सगळ्यातून खव्यांची भूक जागृत करण्याचं काम मात्र अगदी परफेक्ट होतं.
बरं पदार्थांचा विचार केला तर इतर सेलिब्रिटी शेफ्सच्या प्रसिद्ध रेस्टॉरन्टमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला त्या शेफने केलेले विविध प्रयोग चाखायला मिळतात, पण संजीव कपूरच्या येलो चिलीमध्ये मात्र त्यामानाने पारंपरिक पदार्थांचेच पर्याय अधिक दिसतात. तसंही शेफ संजीव कपूर हा हटके प्रयोगांपेक्षा पदार्थ सोप्या पद्धतीने चवदार करुन लोकांसमोर आणण्यासाठीच प्रसिद्ध आहे. या संजीव कपूरच्या वैशिष्ट्यानुसारच आपल्याला मेन्यू कार्ड तयार केलेलं दिसतं. पंजाबी आणि मुगलई पदार्थांचं जरी बाहुल्य असलं तरी सगळ्या भारतीय भागांचं, तिथल्या पदार्थांचं प्रतिनिधित्व अगदी एखाद्या पदार्थाच्या माध्यमातून का असेना पण आहेच. इथे सुखद धक्का देणारी आणखी एक छोटीशी गोष्ट म्हणजे इंग्रजाळलेल्या एकूण वातावरणात हिंदीचा वापर. स्टार्टर्सच्या मेन्यूवर लिहीलेलं दिसतं. ’शुरुवात’. असाच पदार्थांच्या नावातही देशी शब्दांच्या आणि ओळखीच्या नावांचा वापर केलेला दिसतो. त्यांच्या मेन्यूकार्डातल्या सर्वाधिक मागवल्या जाणाऱ्या पदार्थाचं नाव आहे. चौक की टिक्की... हा पदार्थ म्हणजे खरं तर कुठेही मिळणारी आलु की टिक्की पण संजीव कपूर टचमुळे चवीला निश्चित वेगळी लागणारी आणि म्हणूनच यलो चिलीजला जाणाऱ्या सगळ्यांच्या पसंतीला उतरणारी.
अगदी नेहमी आपण खातो असा मसाला पापड असो किंवा रायता प्रत्येक साध्यातसाध्या पदार्थातही तो संजीव कपूर टच जाणवतो एवढं मात्र नक्की. मशरुम वापरुन तयार केलेले शबनम के मोती नावाचे कबाब असोत किंवा कच्चे केले के शम्मी नावाचे केळ्याचे कबाब असोत. चना जोर गरम टिक्की आणि गलावटी कबाब हा तर संजीव कपूर आणि यलो चिलीजचा मस्ट इट पदार्थ. या कबाब आणि टिक्क्यांच्या स्टार्टर्सबरोबरच इथल्या पंजाबी आणि मुगलई भाज्याही लोकांच्या खास आवडीच्या ठरतात.
’शाम सवेरा’ नावाची पालकाचा वापर केलेली भाजीही लोकांची एकदम फेवरेट, एकतर त्या भाजीचं नावही हटके आणि चवही. असेच थोडंसं पारंपरिक आणि थोडासा चवबदल अशी प्रत्येक पदार्थाची खासियत. मग विविध भागातलं वैशिष्ट्य दाखवणाऱ्या बिर्याणीच्या प्लेट्स असोत किंवा चिकनच्या डिशेस सगळ्या अगदी परफेक्ट असतात.
डेझर्टसमध्येही पूणर्पणे भारतीय चॉईसेस दिसतात मग शाही तुकडा असो किंवा रसमलाईसारखा पदार्थ, पण त्यातही कायम भाव खातो तो गुलाब ए गुलकंद नावाचा पदार्थ. गुलाबजामच्या मधोमध गुलकंद असा तो पदार्थ सर्व्हही फार आकर्षक पद्धतीने केला जातो.
या मेन्यूकार्डातल्या सर्व पदार्थांशिवाय भारतीय सण किंवा महत्त्वाचे दिवस यांची आठवण ठेवत छोटे मोठे सरप्राईजेस देणं हीसुद्धा यलो चिलीजची एक स्पेशालिटी. महाराष्ट्राच्या गुढीपाडवा या महत्त्वाच्या सणाला आपण जर यलो चिलीजला गेलो तर अगदी मॉडर्न डेकोरेशन केलेलं वेगवेगळ्या फ्लेवरचं श्रीखंड आणि चित्रविचित्र आकाराच्या पुऱ्या आपल्यासमोर येतात, त्याही कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच अगदी निशुल्क. सणांचा विचार करुन वेगळा मेन्यूसुद्धा डिझाईन केला जातो यलो चिलीजमध्ये. गणपतीपासून ते थेट ३१ ऑक्टोबरपर्यंत तर त्यांच्या शुद्ध नावाने पूर्णपणे उपवास, व्रत या सगळ्याला चालेल असा पूर्ण मेन्यू ठेवलाय या रेस्टॉरन्टमध्ये. त्यात सूप, स्टार्टर्स आणि मेन कोर्स सगळं काही आहे. सूप म्हणून कद्दू आणि मखाण्याच्या सूपचं ऑप्शन आहे. तर स्टार्टर्समध्ये साबुदाणा वड्यासारखे पदार्थ. अगदी मेनकोर्सही सात्विक आणि सगळ्यांना चालणारा असा. असे बदल केले जात असल्याने कुठल्याही दिवशी बाहेर जेवायला जाणं सहज शक्य होतं.
संजीव कपूरचं ब्रॅण्ड नेम असल्याने चवींबद्दल तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही पण किमती मात्र या ब्रॅण्डनेममुळेच चांगल्याच जास्त आहेत. इतर ठिकाणी अगदी तोच पदार्थ ज्या किमतीत मिळतो त्या तुलनेत थेट १०० रुपयाचा तरी फरक पडतो इथे, त्याचबरोबर लिमिडेट मेन्यू हा आणखी एक थोडंसं नाराज करणारा मुद्दा. कारण आता मल्टीक्युझीन रेस्टॉरन्ट्समुळे भरपूर पर्यायांमधून निवड करण्याची सगळ्यांनाच सवय लागलेली असते, अशाच पाच सहाच स्टार्टर्स किंवा मेनकोर्सचेही कमी पर्याय बरेचदा लोकांना पटत नाहीत. अर्थात ते लिमिटेड पदार्थ पण टॉप क्लास चव हा पर्यायही अनेक लोक स्वीकरत असल्यानं यलो चिली हा ब्रॅण्ड मुंबईत तरी चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
संबंधित ब्लॉग :
जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद
जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर
जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्टअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement