एक्स्प्लोर

Jayant Sawarkar : मला भेटलेले 'अण्णा' आजोबा....

Jayant Sawarkar Blog : जयंत सावरकर (अण्णा) (Jayant Sawarkar) यांच्या निधनाची बातमी येताच शब्दच सुचेनासे झाले. माझ्या आजोबांसोबत माझं खूप घट्ट नातं होतं. त्यांच्या निधनानंतर 'जयंत सावरकर' नामक एक व्यक्ती आमच्या घराजवळ राहायला आहे. सेलिब्रिटीपेक्षा एक आजोबा म्हणून ते माझ्या संपर्कात आले. पुढे त्यांच्या कामाबद्दल कळू लागलं आणि त्यांच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस वाढू लागला. 

हसरा चेहरा, कपाळावर टिळा, डोक्यात स्टाइलिश टोपी , गळ्यात मफलर असा काहीसा सावकर आजोबांचा लूक सर्वांनी पाहिला असेल. मी त्यांना ओळखू लागल्यापासून ते आजपर्यंत त्यांचा हा लूक कायम राहिला. एखाद्या तरुणाला लाजवतील इतके शिस्तबद्ध, कामाशी प्रामाणिक सावरकर आजोबा मी खूप जवळून पाहिले आहेत. 

ठाण्यात आईचं पोळी-भाजी केंद्र आहे. जयंत सावरकर हे कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करण्यापेक्षा माझ्या आईच्या हातचं खायला नेहमी पसंती दर्शवत असत. त्यामुळे ते आमचे नेहमीचे ग्राहक होते. मला अगदीच आठवतंय, मी शाळेत असताना आजोबा एकदा जेवण घ्यायला आले होते. दरम्यान मी भाजी घेऊन त्यांना देण्यासाठी गेले आणि म्हटलं आजोबा पिशवी पुढे करा भाजी टाकते. त्यावेळी ते म्हणाले होते,"बाळा भाजी टाकत नाहीत.. ठेवतात... कचरा टाकला जातो". अशा छोट्या-छोट्या गोष्टी सावरकर आजोबांनी शिकवल्या सांगितल्या आहेत. 

एक किस्सा अगदीच सांगावसा वाटतो. सावरकर आजोबा माझ्या घराजवळ राहत असल्याने आणि त्यांचे आमच्यासोबत चांगले संबंध असल्याचं माझ्या कॉलेजमध्ये माहिती होतं. त्यामुळे माझा एक मित्र त्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावरकर आजोबांना विचार असं सांगून मला घेऊन त्यांच्या घरी गेला. त्यावेळी सावरकर आजोबा त्याला म्हणाले,"कार्यक्रमाला मी नक्की येईल. अर्थात जास्त वेळ उभं राहायला मला जमणार नाही. पण नक्कीच येईल". दरम्यान माझ्याकडे पाहत ते म्हणाले,"मंजिरीची आई आमची अन्नदाती आहे. त्यामुळे तिने सांगितलेल्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो नाही तर आमच्या जेवणाचं अवघड होईल". 

साधी राहणी आणि उच्चविचारसरणी काय असते हे सावरकर आजोबांकडे पाहिल्यावर कळतं. अण्णा आजोबांचे सासरे म्हणजे मामा पेंडसे. स्वत: एक उत्कृष्ट रंगकर्मी, अनेक गाजलेल्या नाटकांत, सिनेमांत काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जयंत सावरकर सर्वांनीच पाहिले आहेत. पण रंगमंचावरील त्यांचं काम मला प्रत्यक्ष पाहता आलं याचा आनंद वेगळाच आहे.

'एकच प्याला' या नाटकात जयंत सावरकरांनी साकारलेली तळीरामाची भूमिका चांगलीच गाजली. तळीरामाच्या भूमिकेत त्यांनी 100% दिले आहेत. दारुच्या आहारी गेलेल्या तळीरामाचं पात्र त्यांनी चांगलचं रंगवलं आहे. अनेक कार्यक्रमात त्यांनी तळीराम सादर केला आहे. राम गणेश गडकरींचे संवाद आणि जयंत सावरकर यांचा दर्जेदार अभिनय यामुळे 'एकच प्याला' या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

मामा पेंडसे यांची लेक अर्थात सावरकर आजोबांची पत्नी यादेखील त्यांच्याप्रमाणेच कडक शिस्तीच्या. सावरकर आजोबांचं आजीवर खूप प्रेम होतं. कोरोनाआधी सावरकर आजोबा आजीला घेऊन दररोज न चुकता एक फेरफटका मारायचे. त्यावेळी त्या दोघांना पाहताना आपण एखादा सिनेमा पाहतोय असं वाटायचं. 

घरातील छोट्या-मोठ्या गोष्टी सावरकर आजोबा स्वत: खरेदी करायचे. किराणा सामान असो, भाजी घेणं असो वा आमच्या घरी येऊन जेवण घेणं असो. अभिनयाप्रमाणेच या सर्व गोष्टी करायची सावरकर आजोबांना आवड होती. आजींची तब्येत अनेकदा ठिक नसे. त्यावेळी आजीचा हात पकडून आजीला दवाखान्यात घेऊन जाताना आजोबांना मी पाहिलं आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात प्रेम, काळजी दिसायची.    

सावरकर आजोबांना व्यायामाची खूप आवड होती. त्यांनी कधी लिफ्टचा वापर केलेला मी पाहिलेलं नाही. पाचव्या-सहाव्या मजल्यापर्यंत जिन्याने जात असत. आपण काय आहार घेतो याकडे त्यांचं लक्ष असे. जयंत सावरकर यांच्या चेहऱ्यावर वागण्या-बोलण्यात कायम उत्साह असे. मला आठवतंय, सावरकर आजोबा रस्त्यावरून जाताना कायम त्यांच्या आसपासची लोक 'अरे हे सेलिब्रिटी आहेत ना' अशा प्रकारची कुजबूज करत असत. 

काम मिळत नाही म्हणून निराश झालेलं सावरकर आजोबांना कधीही पाहिलेलं नाही. नाटक, वेबसीरिज, सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. सावरकर आजोबांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, बीड पोलिसांनी झटपट अंत्यविधीही उरकला, आता नवी अपडेट समोर
कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, झटपट अंत्यविधीही उरकला, नवी अपडेट समोर
Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08 AM 01 April 2025Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा :01 April 2025 : 7 AMABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 01 April 2025Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 01 April 2025 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, बीड पोलिसांनी झटपट अंत्यविधीही उरकला, आता नवी अपडेट समोर
कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, झटपट अंत्यविधीही उरकला, नवी अपडेट समोर
Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Embed widget