एक्स्प्लोर

Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे.

Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. जयंत सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका (Serial), सिनेमे (Movies) आणि वेबसीरिजमध्येही (Web Series) ते झळकले आहेत. 

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर एबीपी माझासोबत बोलताना जयवंत वाडकर म्हणाले की,"गेल्या 15 दिवसांपासून जयंत सावरकर यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले. पण नंतर काही वेळातच त्यांचं निधन झालं". जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर उद्या (25 जुलै) अंत्यसंस्कार होणार आहेत.

जयंत सावरकर कोण होते? (Who Is Jayant Sawarkar)

जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी जयंत सावरकर यांनी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांची अनेक नाटके गाजली आहेत. 'अपराध मीच केला' (गोळे मास्तर), 'अपूर्णांक', 'अलीबाबा चाळीस चोर', 'अल्लादीन जादूचा दिवा', 'आम्ही जगतो बेफाम', 'एकच प्याला' अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत. 'एकच प्याला' नाटकातील त्यांची तळीरामांची भूमिका चांगलीच गाजली आहे. विनोदीसह गंभीर भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. काही महिन्यांपूर्वीच 'आई कुठे काय करते' या छोट्या पडद्यावरील मालिकेत ते दिसले होते. 'समांतर' या वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे.

हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवलेले जयंत सावरकर

नाटकांबरोबरच जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांनी चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं. येड्यांची जत्रा,बिस्कीट,विघ्नहर्ता महागणपती, हरिओम विठ्ठला, पोलीस लाईन या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच सिंघम, वास्तव : द रिॲलिटी,  बडे दिलवाला, सिंघम या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर त्यांना कामे करायला मिळाली आहेत.

संबंधित बातम्या

Jayant Sawarkar: ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन; मराठी कलाकारांकडून शोक व्यक्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget