एक्स्प्लोर

ट्रम्प निवडीनंतरची अमेरिका

725, फिफ्थ अॅव्हेन्यू, न्यूयॉर्क. अर्थात ट्रम्प टॉवर. मॅनहॅटनमधली ही इमारत सध्या अमेरिकेच्या आणि पर्यायानं जगाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनली आहे. जगभरातले नेते, उद्योगपती, मीडिया, राजकारणी यांची सध्या इथं लगबग सुरू असते. कारण अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्योग साम्राज्याचा कारभार या इमारतीतून चालतो आणि इथंच पेंटहाऊसमध्ये ते राहतात. याच ट्रम्प टॉवरमध्ये एका जमान्यात डोनाल्ड ट्रम्प ‘द अॅप्रेंटिस’ हा रिअॅलिटी टिव्ही शो होस्ट करायचे. आता तिथं वेगळा रिअॅलिटी शो सुरू असल्याचं ट्रम्प टॉवरमधून वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचं म्हणणं आहे. फिफ्थ अॅव्हेन्यूवरच्या या इमारतीची सुरक्षाव्यवस्था व्हाईट हाऊसच्या सुरक्षाव्यवस्थेइतकीच कडक करण्यात आली आहे. त्यामुळं इमारतीच्या अगदी जवळ जाता येत नाही. जवळपास १०० फूट आधीच पोलिस, सुरक्षारक्षक आणि एफबीआय एजंट्सही तुमच्यावर नजर ठेवून असतात. सुरक्षेच्या या कड्याच्या आत आणि कड्याबाहेरही सध्या हालचालींना बराच वेग आला आहे. ट्रम्प टॉवर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या साम्राज्याची जणू राजधानी आहे. पण या इमारतीबाहेर न्यूयॉर्कमध्ये मात्र ट्रम्प यांच्याविषयी प्रचंड नाराजीच दिसून येते. मुक्त विचारसरणीच्या या शहरात लोक आपली नाराजी उघडपणे व्यक्तही करतात. गेल्या शुक्रवारचीच गोष्ट घ्या ना. ‘हॅमिल्टन’ हे ब्रॉडवेवरचं गाजलेलं संगीतक (म्युझिकल) पाहण्यासाठी निर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी हजेरी लावली होती. जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन यांच्या साथीनं अमेरिकेच्या उभारणीला हातभार लावणाऱ्या अॅलेक्झांडर हॅमिल्टनची कहाणी हे नाटक सांगतं. हॅमिल्टनचा गुलामगिरीला विरोध होता. अमेरिकेची आर्थिक घडी बसवण्यात त्यानं मोठं योगदान दिलं होतं. त्याचा जीवनप्रवास मांडणाऱ्या या नाटकानं गेल्या काही वर्षांत अनेक मोठे पुरस्कार पटकावले आहेत. शुक्रवारचा प्रयोग संपल्यावर हॅमिल्टनच्या सर्व कलाकारांनी प्रेक्षागारात उपस्थित माईक पेन्स यांना उद्देशून निवेदन सादर केलं – “विविधतेने नटलेल्या अमेरिकेला काळजी वाटते आहे की नवं सरकार आमचं, जगाचं, आमच्या मुलांचं, आई-वडिलांचं रक्षण करू शकणार नाहीत. आमच्या अधिकारांची पायमल्ली होईल अशी भीती वाटते आहे. या नाटकानं तुम्हाला अमेरिकन मूल्यांची आणि आम्हा सर्वांच्याच साठी काम करण्याची प्रेरणा दिली असेल अशी आशा आहे.” त्यावर पेन्स यांनी थिएटरमधून बाहेर पडताना केवळ स्मितहास्य केलं. पण डोनाल्ड ट्रम्प यांना ही गोष्ट रुचलेली नाही. ट्रम्प यांनी शनिवारी ट्विट करून माफीची मागणी केली. https://twitter.com/realDonaldTrump/status/799972624713420804 https://twitter.com/realDonaldTrump/status/799974635274194947 https://twitter.com/realDonaldTrump/status/800298286204723200 तर हॅमिल्टनच्या कलाकारांच्या वतीनं निवेदन वाचणाऱ्या व्हिक्टर डिक्सननं ट्विटरवरूनच ट्रम्पना उत्तर दिलं. https://twitter.com/BrandonVDixon/status/799977281875755008 स्वतः माईक पेन्स यांनी आपल्याला अजिबात राग आला नसल्याचं म्हटलंय आणि नाटकातील सर्व कलाकारांचं कौतुक करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण ट्रम्प यांच्या ट्विट्सनी अमेरिकेत, खास करून न्यूयॉर्कमध्ये नव्या वादाला सुरूवात केली आहे. कलाकारांनी अशी राजकीय टिप्पणी करणं अनेकांना मान्य नाही. तर सामान्य न्यूयॉर्कर्सच्या मते असं कुठल्याही विषयावर खुलेपणानं मत मांडता येणं हीच न्यूयॉर्कची ओळख आहे. ट्रम्प टॉवरपासून काही काही ब्लॉक दूर, फॉक्स न्यूजचं मुख्यालय आहे. ट्रम्प टॉवरप्रमाणेच इथंही अधूनमधून निदर्शनं होत असतात. शुक्रवारी सकाळीच एक माणूस तिथं हातात निषेधाचा बोर्ड घेऊन उभा होता. एका वाटसरूला ते रुचलं नाही, त्यानं ओरडून आपली नापसंती व्यक्त केली. निषेध करणाऱ्यानं फक्त पुन्हा एकदा हातातला बोर्ड उंचावला, आणि फॉक्स न्यूजच्या दिशेनं बोट दाखवलं. फॉक्स न्यूजनं निवडणुकीआधी प्रचारादरम्यान अनेकदा उघडपणे ट्रम्प यांचं समर्थन केलं होतं. ट्रम्पना पाठिंबा देणाऱ्यांनाही अशा ‘सायलेंट प्रोटेस्ट’ला सामोरं जावं लागतंय. ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शनं आखण्याच्या तयारीत असलेल्या एका मानवाधिकार कार्यकर्त्यानं ओळख लपवण्याच्या अटीवर माझ्याशी बातचीत केली. आपण त्याला तात्पुरतं जॉन म्हणूयात. जॉनच्या मते ‘सर्वसामान्य न्यूयॉर्कवासियांच्या मनात एकेकाळी ट्रम्प यांच्याविषयी सुप्त आकर्षण होतं. स्वतः मलाही त्यांच्या यशाविषयी आदर वाटायचा. न्यूयॉर्क जगाची आर्थिक राजधानी म्हणून मिरवणारं शहर आहे. इथल्या प्रत्येक युवा उद्योगपतीच्या मनात ट्रम्पसारखं बनण्याची इच्छा असायची. पण गेल्या काही वर्षांत आणि खास करून निवडणूक प्रचारादरम्यान समोर आलेल्या घटनांनी ट्रम्प न्यूयॉर्कवासियांच्या नजरेतून साफच उतरले आहेत. ट्रम्प न्यूयॉर्कर आहेत याचा आधी न्यूयॉर्कला अभिमान वाटायचा, पण आता त्याच गोष्टीची लाज वाटू लागली आहे.’ जॉनचे आईवडील कॅलिफोर्नियाचे आहेत. त्याचा जन्मही तिथलाच. पण जॉनचं सगळं आयुष्य न्यूयॉर्कमध्ये गेलं. याच दोन राज्यांत ट्रम्पना सर्वाधिक विरोध होतो आहे. ‘अमेरिकेतली बाकीची राज्य ट्रम्पना राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारतीलही, पण कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क ही गोष्ट कधीच स्वीकारू शकणार नाहीत. आम्ही शक्य होईल तेव्हा आवाज उठवत राहू’ असं जॉननं म्हटलं. जॉनची सहकारी न्यूयॉर्कच्या क्वीन्सची रहिवासी. ट्रम्पही मूळचे क्वीन्सचेच आहेत, पण क्वीन्समध्ये ट्रम्प यांच्यासारख्यांच्या विचारसरणीला थारा नाही, असं तिनं स्पष्टपणे म्हटलं. फॉक्स न्यूजच्या समोर, रस्त्यापलिकडेच रॉकफेलर सेंटरच्या इमारती आहेत. ट्रम्प यांचं उद्योग साम्राज्य उभं राहण्याच्या जवळपास शतकभर आधी अमेरिकेत जॉन डी रॉकफेलर यांनी तेलाच्या व्यापारातून साम्राज्य उभं केलं होतं. त्यांचा मुलगा जॉन डी रॉकफेलर ज्युनियरनं आपल्या वडिलांचं साम्राज्य आणखी वाढवलं.(अगदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखंच, पण त्यापेक्षा कित्येक पटींनी मोठं आणि कायदेशीर.) याच रॉकफेलरनं मॅनहॅटनमध्ये रॉकफेलर सेंटर उभारलं. टीव्ही आणि रेडियो या त्या काळातल्या नव्या तंत्रज्ञानाला या सेंटरनं बळ दिलं. असोसिएटेड प्रेस, एनबीसी टीव्ही आणि रेडियो सिटी म्युझिक हॉल तसंच अनेक मासिकांची कार्यालयं या सेंटरच्या परिसरात आहेत. साहजिकच न्यूयॉर्कच्या माध्यमांमधल्या प्रतिक्रियांचं प्रतिबिंब इथं लगेच उमटतं. ज्युनियर रॉकफेलरची पत्नी एबिगेलला मॉडर्न आर्टमध्ये रस होता. तिच्याच प्रयत्नांमुळं न्यूयॉर्क कलेचं नवं केंद्र बनलं- न्यूयॉर्कनं पॅरिसलाही मागे टाकलं. रॉकफेलर सेंटरच्या परिसरातील इमारती कलेचं आश्रयस्थान बनल्या. म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, ख्रिस्तीज ऑक्शन हाऊसमध्ये अनेक कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळते. इथल्याच ऑब्झर्व्हेटरीमधून उंचावरून न्यूयॉर्कचं नयनरम्य दृष्य पाहता येतं. एक प्रायव्हेट प्रॉपर्टी असलेलं हे सेंटर आता जणू अमेरिकेचा राष्ट्रीय ठेवा बनलं आहे. हे सेंटर म्हणजे उद्योगपतींच्या एका कुटुंबानं न्यूयॉर्कला दिलेलं गिफ्ट आहे. आता न्यूयॉर्कचाच आणखी एक उद्योगपती देशाची सूत्र हाती घेण्याच्या तयारीत आहे, पण त्याविषयी इथं फारसा उत्साह दिसत नाही. रॉकफेलर सेंटरचे कर्मचारी अगद उघडपणे ट्रम्प यांच्याविषयीची नाराजी व्यक्त करत होते. मी तिकिटांसाठी लाईनमध्ये उभे होते. काऊंटरवरच्या एलिना आणि रोझा एका जर्मन पर्यटकाचा - एरिकचा पास तयार करताना त्याच्याशी निवडणुकीविषयीच गप्पा मारत होत्या. तुम्ही अमेरिकन्सनी ट्रम्पला कसं काय निवडलंत, अमेरिकन्स असं कसं करू शकतात हे मला कळत नाही, असा सवाल एरिकनं केला. त्यावर दोघीही एकदमच म्हणाल्या, आम्हालाही कळत नाहीये असं कसं झालं. एलिनानं आम्हाला पुढच्या डेकपर्यंत नेलं. ‘मी १० वर्ष इथं काम करते आहे. सगळ्या अमेरिकेतून आणि जगातून लोक इथं येतात. आजवर एकही माणूस ट्रम्पना पाठिंबा देताना दिसलेला नाही. काय माहित आता पुढे काय होईल.’ आमच्या त्या ग्रुपमध्ये ट्रम्प यांच्या बाजूनं कौल देणाऱ्या टेक्सास राज्यातला अँड्र्यूही होता. स्वतः रिपब्लिकन असलेल्या अँड्र्यूनं यावेळी मात्र क्लिंटन यांच्याबाजूनं मत दिलं होतं. ‘एलिनाला प्रश्न पडला आहे, कुणी ट्रम्पना पाठिंबा देत नाही, असं तिला वाटतं. पण ट्रम्पना मत देणारे न्यूयॉर्कपर्यंत येऊही शकत नाहीत. त्यांचं जग गाव-खेड्यापुरतंच आहे, त्यांच्यासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. ते सोडवण्यात प्रस्थापित राजकारणी अपयशी ठरले आणि ट्रम्प यांच्यासारख्यांचं फावलं. ओबामांकडून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्यातल्या बऱ्याच पूर्ण झालेल्या नाहीत. आणि ती हिलरीही फार काही वेगळं करू शकली नसती.’ असं अँड्र्यूनं म्हटलं. एलिनानं त्यावर फक्त खांदे उडवले. ‘Whatever, we have to bear him. चार वर्ष सहन करावं लागेल.’ आमचा रॉकफेलर टूर गाईड अॅरनलाही काळजी वाटतेय. एखाद्या रॅपरच्या शैलीत गप्पा मारत अॅरन आम्हाला रॉकफेलर प्लाझामधल्या अनेक शिल्पांविषयी आणि इमारतींविषयी माहिती देत होता आणि अधूनमधून राजकीय टिप्पणीही करत होता. मी पत्रकार आहे म्हटल्यावर तर आणखीनंच आपुलकीनं बोलू लागला. ब्राँक्समध्ये जन्मलेल्या, कृष्णवर्णीय अॅरनला ट्रम्पविषयी अजिबात आदर वाटत नाही. पण आता ते आपले राष्ट्राध्यक्ष आहेत ही गोष्ट स्वीकारायला हवी, आणि जेव्हा ते चुकतील तेव्हा आवाज उठवायला हवा असं अॅरनचं म्हणणं आहे. ‘रॉकफेलर सेंटरनं कलाकारांना, पत्रकारांना आणि विचारस्वातंत्र्याला प्रोत्साहन दिलंय. म्हणून मला इथं काम करायला आवडतं. मला वाटतं ट्रम्पनी इथं यायला हवं एकदा, ते नेहमी श्रीमंतीचं बटबटीत प्रदर्शन करतात. त्यापेक्षा ट्रम्पनी जरा रॉकफेलरचा आदर्श ठेवायला हवा. स्वतः कमवा पण लोकांसाठीही असं काहीतरी उभारा. ट्रम्पना हे जमणार नाही.’ रॉकफेलर सेंटरच्या मुख्य इमारतीच्या पुढच्या लॉबीत दोन भव्य म्युरल्स - भित्तीचित्रं आहेत. एक भिंतीवरचं ‘अमेरिकन प्रोग्रेस’ - मोठमोठे नेते अमेरिकेच्या उभारणीला हातभार लावत असल्याचं चित्र आणि दुसरं छतावरचं भित्तीचित्र ‘टाईम’. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही दोन्ही म्युरल्स विशेष महत्त्वाची वाटतात. याच प्लाझामध्ये असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर न्यूज हे इसामू नोगुचीचं शिल्प आहे. ते दाखवताना अॅरन मला म्हणाला – ‘तुम्हा लोकांना आता आणखी धावपळ करावी लागेल नाही?’ मी म्हटलं – ‘अॅरन, आमच्या देशातही कमी धावपळ नाही...’
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान', 290 कोटी मंजूर, 1902 पुरस्कार देणार; अभियानाबद्दल जाणून घ्या सर्व माहिती
राज्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान', 290 कोटी मंजूर, 1902 पुरस्कार देणार; अभियानाबद्दल जाणून घ्या सर्व माहिती
एबीपी माझाचा इम्पॅक्ट! टक्केवारी घेतल्याचा आरोप होऊनही कंत्राटदाराविरोधात फिर्यादी असलेल्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाडांची अखेर उचलबांगडी
एबीपी माझाचा इम्पॅक्ट! टक्केवारी घेतल्याचा आरोप होऊनही कंत्राटदाराविरोधात फिर्यादी असलेल्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाडांची अखेर उचलबांगडी
नितीन गडकरींच्या उंचीची व्यक्ती आम्हाला दिसत नाही; शरद पवारांकडून दिल्लीत कौतुक, स्तुतीसुमने
नितीन गडकरींच्या उंचीची व्यक्ती आम्हाला दिसत नाही; शरद पवारांकडून दिल्लीत कौतुक, स्तुतीसुमने
भाजपा माजी जिल्हाध्यक्षाच्या कारने उडवलं, बुलेटस्वार अन् महिला जखमी; नागरिकांनी ड्रायव्हरला चोपले
भाजपा माजी जिल्हाध्यक्षाच्या कारने उडवलं, बुलेटस्वार अन् महिला जखमी; नागरिकांनी ड्रायव्हरला चोपले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modiपाकिस्तानच्या DGMO चा फोन, विनवणी केली, आता हल्ले बस करा,पाकिस्तान याचना करु लागला
PM Narendra Modi : कोणत्याही देशानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही,मोदींची मोठी माहिती
Amit Shah Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव'ची इनसाईड स्टोरी, अमित शाहांनी सगळं सांगितलं
Manikrao Kokate Controversy | मंत्रीपदाची खुर्ची शाबूत, अजित पवारांनी सुनावलं
Pothole Protests | कल्याण पश्चिममध्ये KDMCC दुर्लक्ष, ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान', 290 कोटी मंजूर, 1902 पुरस्कार देणार; अभियानाबद्दल जाणून घ्या सर्व माहिती
राज्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान', 290 कोटी मंजूर, 1902 पुरस्कार देणार; अभियानाबद्दल जाणून घ्या सर्व माहिती
एबीपी माझाचा इम्पॅक्ट! टक्केवारी घेतल्याचा आरोप होऊनही कंत्राटदाराविरोधात फिर्यादी असलेल्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाडांची अखेर उचलबांगडी
एबीपी माझाचा इम्पॅक्ट! टक्केवारी घेतल्याचा आरोप होऊनही कंत्राटदाराविरोधात फिर्यादी असलेल्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाडांची अखेर उचलबांगडी
नितीन गडकरींच्या उंचीची व्यक्ती आम्हाला दिसत नाही; शरद पवारांकडून दिल्लीत कौतुक, स्तुतीसुमने
नितीन गडकरींच्या उंचीची व्यक्ती आम्हाला दिसत नाही; शरद पवारांकडून दिल्लीत कौतुक, स्तुतीसुमने
भाजपा माजी जिल्हाध्यक्षाच्या कारने उडवलं, बुलेटस्वार अन् महिला जखमी; नागरिकांनी ड्रायव्हरला चोपले
भाजपा माजी जिल्हाध्यक्षाच्या कारने उडवलं, बुलेटस्वार अन् महिला जखमी; नागरिकांनी ड्रायव्हरला चोपले
शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबतच अश्लील चाळे; इंस्टावरुन करायची अर्धनग्न व्हिडिओ कॉल,पोक्सोचा गुन्हा दाखल
शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबतच अश्लील चाळे; इंस्टावरुन करायची अर्धनग्न व्हिडिओ कॉल,पोक्सोचा गुन्हा दाखल
Gold Rate : सोन्यातील गुंतवणुकीवर सहा महिन्यात दमदार परतावा, तज्ज्ञ आता म्हणतात पुढचे 5 महिने जरा जपून... कारण काय?
सोन्यातील गुंतवणुकीवर सहा महिन्यात दमदार परतावा, तज्ज्ञ आता म्हणतात पुढचे 5 महिने जरा जपून... कारण काय?
Video: 9 मे रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला, पण...; ट्रम्पच्या मध्यस्थीबाबत PM मोदींचं लोकसभेत उत्तर
Video: 9 मे रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला, पण...; ट्रम्पच्या मध्यस्थीबाबत PM मोदींचं लोकसभेत उत्तर
Rahul Gandhi :  डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले हे या सभागृहात सांगा, देश तुमच्या इमेज, राजकारण आणि पीआरच्या वर, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले हे या सभागृहात सांगा, राहुल गांधी यांचं ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत नरेंद्र मोदींना आव्हान
Embed widget