एक्स्प्लोर

माणूस : मुक्काम मंगळ

मंगळावर बर्फाच्या रुपात विपुल पाणी आहे. मंगळावर कार्बन डायऑक्साईड असल्यानं त्यापासून हायड्रोकार्बन म्हणजेच प्लॅस्टिक बनवणं शक्य आहे. अंतराळ प्रवासासाठी महत्वाचं असतं ते इंधन. सध्या अशी रॉकेट बनवण्याचा प्रयत्न होतोय जी मिथेन आणि द्रवरूप ऑक्सिजनवर चालवली जाऊ शकतात. हे दोन्ही घटक मंगळावर निर्मिले जाऊ शकतात.

गेल्या आठवड्यात माझ्या लेखात आपण भारताची चंद्रमोहिम असलेल्या चांद्रयान 2 बद्दल वाचलं. मंगळाबद्दलही त्यात मी जाता जाता उल्लेख केला होता. मला वाटतं, याबाबत जगात अन्य ठिकाणी काय घडतंय ते जाणून घ्यायला वाचकांना नक्कीच आवडेल. विविध अवकाश संशोधन संस्थांद्वारे पुढच्या वर्षी 4 मंगळ मोहिमा आखण्यात आल्या आहेत. इतक्या साऱ्या एकाच वेळी का? त्याचं कारण असं की, दर 26 महिन्यांनी पृथ्वी आणि मंगळ एकमेकांच्या सर्वाधिक जवळ येतात. दोन्ही ग्रह हे सूर्याभोवती वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करत असल्याने मंगळ कधी कधी 40 कोटी किलोमीटर अंतरावरही असू शकतो तर कधी तो अगदी ४ कोटी किलोमीटरवरसुद्धा असू शकतो. म्हणूनच, मंगळावर रॉकेट पाठवण्याची सुयोग्य वेळ हीच असू शकते आणि 2020 च्या जुलैमध्ये हा योग जुळून येतोय. 17 जुलै रोजी अमेरिकेच्या एखाद्या चारचाकीच्या आकाराच्या मार्स रोव्हरचं प्रक्षेपण केलं जाईल. त्यानंतर आठच दिवसांनी, ब्रिटीश रसायन शास्त्रज्ञ रोझलिंड फ्रँकलिन यांच्या नावाची; रशिया-युरोप यांची संयुक्त मोहीम उड्डाण घेईल. ही दोन्ही यानं 2021 च्या फेब्रुवारीत मंगळावर उतरतील. याद्वारे मंगळाच्या भूमीवर काही प्रयोग केले जातील तसेच जीवसृष्टीच्या अस्तित्वाचाही शोध घेतला जाईल. चीनसुद्धा याच सुमारास मंगळ मोहीम राबवणार आहे, ज्यात ऑर्बिटर (मंगळाभोवती अंतराळात भ्रमण करणारा उपग्रह) आणि रोव्हरचा (मंगळ भूमीवर उतरणारे उपकरण) समावेश असेल. मंगळाभोवती सध्या सहा ऑर्बिटर आहेत, ज्यात अमेरिकेच्या ‘नासा’चे तीन, युरोपचे दोन आणि भारताच्या मार्स ऑर्बिटरचा समावेश आहे. याशिवाय, प्रत्यक्ष मंगळभूमीवर ‘नासा’चे दोन रोव्हर आहेत. चीनचा सौरऊर्जा आधारीत रोव्हर सुमारे २५० किलोचा असेल. याशिवाय, संयुक्त अरब आमिरातीही जपानच्या रॉकेटद्वारे मंगळ मोहीम राबवणार आहे. मंगळामधील ही रुची निव्वळ वैज्ञानिक कुतूहलापेक्षा जास्त आहे. मंगळावर मानवी वसाहतच स्थापण्यासाठी काही मंडळी काम करत आहेत. यामागचं कारण असं की, मंगळ अनेक बाबतीत पृथ्वीशी मिळताजुळता आहे. मंगळावर वातावरण आहे, अर्थात ते जवळपास सारं कार्बन डायऑक्साईडचं बनलं आहे आणि जवळपास पृथ्वीसारखाच तिथला दिवस साडेचोवीस तासांचा आहे. शिवाय, मंगळ पृथ्वीच्या जवळजवळ निम्म्या आकाराचा आहे, पृथ्वीप्रमाणेच तिथंही गुरुत्वाकर्षण आहे, मात्र आपल्यापेक्षा कमी. आपल्याकडे एखाद्याचं वजन 50 किलो असल्यास मंगळावर त्याचं वजन 20 किलोपेक्षा कमी भरेल. आपल्या सौरमालेतले अन्य ग्रह पृथ्वीपेक्षा खूपच वेगळे आहेत. एकतर ते सूर्यापासून फारच दूर असल्यानं खूप थंड आहेत. गुरुसारखा ग्रह आकारानं प्रचंड तर आहेच शिवाय तिथलं गुरुत्वाकर्षणही जास्त आहे, तर काही ग्रहांवरचं वातावरण विषारी आहे. मंगळावर बर्फाच्या रुपात विपुल पाणी आहे. मंगळावर कार्बन डायऑक्साईड असल्यानं त्यापासून हायड्रोकार्बन म्हणजेच प्लॅस्टिक बनवणं शक्य आहे. अंतराळ प्रवासासाठी महत्वाचं असतं ते इंधन. सध्या अशी रॉकेट बनवण्याचा प्रयत्न होतोय जी मिथेन आणि द्रवरूप ऑक्सिजनवर चालवली जाऊ शकतात. हे दोन्ही घटक मंगळावर निर्मिले जाऊ शकतात. काही लोक मंगळाचं पृथ्वीसमांतरण (टेराफॉर्मिंग) करण्यावरही काम करत आहेत. याचाच अर्थ मंगळावर पृथ्वीसदृश अशी स्थिती निर्माण करणे जिथे वातावरण आपल्यासारखं असेल आणि पृष्ठभाग हरित असेल. हे अशक्य तर नाहीच पण अनेकांच्या दृष्टीने ते अवघडही नाही. या प्रक्रियेला काही काळ मात्र द्यावा लागेल. वनस्पतींना मुख्यत: सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड लागतो हे तर आपण जाणतोच, आणि या दोन्ही गोष्टी मंगळावर उपलब्ध आहेत. ज्या तिसऱ्या घटकाची म्हणजेच जमिनीतील पोषणद्रव्यांची गरज आहे ती सहजपणे भागवली जाऊ शकते. यातून तयार होणाऱ्या हरित पट्ट्यामुळे ऑक्सिजनची निर्मिती होईल ज्याची मानवाला गरज आहे. या सर्व कारणांमुळेच मंगळ हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे. त्यामुळे तिथे जाण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या जात आहेत. मंगळावर मानवी वसाहत बनवण्याच्या प्रयत्नांच्या, योजनांच्या बाबतीत ‘स्पेस एक्स’ ही खाजगी कंपनी, ‘नासा’ किंवा आपल्या ‘इसरो’सारख्या सरकारी संस्थांच्या कितीतरी पुढे आहे. ही कंपनी फक्त 17 वर्षांची आहे, तरीही कृत्रिम उपग्रह प्रक्षेपणा बाबतीत तीचा दबदबा आहे. सध्या या कंपनीद्वारे मिथेन आणि द्रवरूप ऑक्सिजन वापरण्यात आलेल्या इंजिनाच्या चाचण्या सुरु आहेत आणि कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत अशा रॉकेटचा संपूर्ण आराखडा त्यांच्याकडे तयार असेल. ही कंपनी अवकाश यानांच्या विविध उपकरणांच्या पुनर्वापरामध्येही आघाडीवर आहे. रॉकेट अतंराळात गेल्यावर विवध टप्प्यात त्याचे काही भाग सुटे होतात व निरूपयोगी ठरतात, ‘स्पेस एक्स’ ही अशी एकमेव कंपनी आहे जी अशा सुट्या भागांना पृथ्वीवर परत आणते. (तुम्ही यू ट्यूबवर या कंपनीचं भन्नाट काम पाहू शकता) या कंपनीने जगात सर्वाधिक क्षमतेची रॉकेट विकसित केली आहेत. मंगळावर 100 टनापर्यंत सामान वाहून नेण्याची त्यांची योजना आहे. याचा अर्थ हा की, 2022 पर्यंत जेव्हा मंगळावर स्वारी करण्याची पुढची संधी मिळेल, तेव्हा अधिक गुंतागुतीची आणि प्रचंड क्षमतेची प्रक्षेपणं आपल्याला पाहता येतील, ज्यांचा उद्देश मंगळावर माणूस पाठवणं हाही असेल. अर्थात, एक प्रश्न उपस्थित होईलच. शेवटी मंगळ कुणाचा आहे? विविध देशांचा, कंपन्यांचा की आपल्या साऱ्या सजीव प्रजातीचा? या क्षेत्रातली आता थांबवता न येणारी प्रगती पाहता, या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. हे सगळं उत्तेजित करणारं असलं तरी यामुळे पृथ्वीही कमालीची बदलेल. मंगळावरून एखाद्यानं अवकाशातल्या एखाद्या लहानशा ठिपक्यासारख्या दिसणाऱ्या पृथ्वीकडे पाहिल्यावर त्याला आपली राष्ट्र, धर्म आणि विविध भेदांबद्दल कसं वाटेल? गेल्या वर्षी ‘स्पेस एक्स’नं एका प्रचंड रॉकेटद्वारे मंगळाच्या कक्षेत एक इलेक्ट्रिक कार पाठवली. कदाचित पुढच्या लाखो वर्षात एखाद्या परक्या प्रजातीच्या कुणाला ती गाडी सापडलीच, तर त्या गाडीवर संदेश लिहिलाय: 'पृथ्वीवरच्या माणसांकडून निर्मित' अनुवाद : प्रसन्न जोशी
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full BMC Election : मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद? मतांच्या ध्रुवीकरणाला खतपाणी?
Mahapalikecha Mahasangram Gadchiroli : काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता, नागरिकांच्या अपेक्षा काय?
Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Dhananjay Munde and Walmik Karad: भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Embed widget