एक्स्प्लोर
हैदोस घालणारा "दादा" समर्थक!
जळगाव: अण्णाभाऊ साठे महामंडळाचा माजी अध्यक्ष आणि विविध गुन्ह्यात आरोपी म्हणून आर्थररोड कारागृहात बंदी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसमधील निलंबित वादग्रस्त आमदार रमेश कदम याने सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांना आर्वाच्च्य भाषेत केलेल्या शिवीगाळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कदम हा आयाबहिणीवरुन शिव्या देतोय आणि पवार हे संयमाने परिस्थिती हाताळत आहेत हे या व्हिडीओत दिसत आहे. कदमच्या या तोंडाळपणावर सोशल मीडियात फारसा शाब्दिक खडखडाट झालेला नाही. अनावधानाने "साला" हा शब्द उच्चारणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची आई-बहिण काढणारे व दानवेंच्या साल्यापर्यंत पोहचणारे कदमच्या अश्लिल बोलीवर मूग गिळून गप्प आहेत.
दानवेंचा उध्दार करणारी मंडळी कोण होती ? हेही या कदम प्रकरणामुळे सिद्ध झाले. आठवडाभरापूर्वी सोशल मीडियात "सालादानवे" हा हॅशटॅग शेअर करणाऱ्यांच्या फेसबुक वॉलवरील जुन्या पोस्ट किंवा फोटो जरी पाहिले तर ही मंडळी "साहेब" किंवा "दादा" यांचे "शिपाई" असल्याचे स्पष्ट होते. याशिवाय, काही जुन्या पोस्ट पाहिल्या तर ही मंडळी मूकमोर्चातील कट्टर कार्यकर्ती असल्याचे आढळते. त्याही पलिकडे गेले की, पुरंदरेंना शिवीगाळ केलेली, गडकरी पुतळा उखडून फेकण्याचे समर्थन करणारी बीग्रेडी मंडळी असल्याचेही दिसते. या सर्व मंडळींना सध्या नैराश्याने गाठले आहे. सत्ता आणि समाजाच्या पातळीवर कोणताही फासा सुलटा पडत नसल्यामुळे अनेकांची अवस्था मनोरुग्णासारखी झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पप्पू कलानी, भाई ठाकूर यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयोग सर्व प्रथम "साहेबांनी" केला. "साहेबांनी" श्रीगणेशा केलेली ही परंपरा आताचे सत्ताधारी गिरवत आहेत. खुनाच्या आरोपात नाव गुंतलेले असतानाही पद्मसिंह पाटील यांना साहेबांनी पक्षाच्या खासदारकीची उमेदवारी दिली. एका कुख्यात गुन्हेगाराला साहेबांनीच संरक्षण मंत्रालयाच्या विमानातून दिल्ली-मुंबई वारी घडविली होती. केवळ छत्रपतींचे वंशज आहेत म्हणून उदयनराजे भोसले यांचा तोंडाळपणा सहन करीत त्यांचे राजकीय लाड साहेबांनी चालवले आहेत. छगन भुजबळांचा भ्रष्ट कारभार उघड्या डोळ्यांना दिसत असतानाही साहेबांनी त्याकडे सतत दुर्लक्ष केले. हा सारा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे.
साहेबांच्या तालिमीत राज्याचे नेतृत्व करण्याची जिद्द बाळगणारे पुतणे तथा "एकच वादा दादा" यांचीही राजकीय कारकीर्द ही मुजोर व फटकळ लोकांना सत्तास्थानी बसवणारीच आहे. मोहोळ (जि. सोलापूर) मतदार संघात लक्ष्मण ढोबळे यांना उमेदवारी नाकारुन रमेश कदम हे फायंडिंग दादांचेच होते. ढोबळेंना बाजूला सारायला दादांनी कदम यांच्यासाठी साम, दाम, दंड व भेद याचा वापर केला. एवढेच नव्हे तर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद कदम यांना दिले. कदम हे ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत महामंडळाचे अध्यक्ष होते. याच काळात त्यांनी महामंडळात जवळपास २५९ कोटींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणाची दखल देवेंद्र फडणवीस सरकारने घेऊन कदम यांची रवानगी कारागृहात केली आहे. न्यायालयात जामीनासाठी बचाव करताना कदम याने गुन्हा कबुल करीत भरपाईसाठी माझी संपत्ती जप्त करा, असे वक्तव्य केले आहे. न्यायालयानेही कदम याची सुमारे १३५ कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश काढून त्यापैकी ७५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. कदम याने न्यायालयात असाही दावा केला आहे की, मी चूक केली पण मी दोषी नाही. माझा बळी दिला जातो आहे. कदम यांचा असा बळी देणारा कोण असावा?
दोन वर्षांपूर्वी विधानसभेत साठे महामंडळातील गैरप्रकारावर बोलताना तेव्हाचे महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले होते, महामंडळात २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा सीआयडीमार्फत चौकशी करायला हवी. या काळात दादा आणि बाबा हे शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी मागत होते. तो विषय साठे महामंडळ गैरव्यवहाराला जोडून खडसे पुढे म्हणाले होते, विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सातत्याने सभात्याग करीत आहे. पण अशाप्रकारे महामंडळात सरकारच्या रकमेवर सातत्याने दरोडे पडायला लागले तर कर्जमाफीसाठी सरकार पैसे कोठून आणणार ? हा सूचक इशारा समजल्यानंतर दादांनी सभागृहात पुन्हा संपूर्ण कर्जमाफी हा विषय काढला नाही. अर्थात, त्याचे सुस्पष्ट कारण नंतर पुढे आलेच. ते म्हणजे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे महामंडळातील गैरव्यवहारावर थेट म्हणाले होते की, या घोटाळ्यात रमेश कदम यांच्यासह तत्कालीन अर्थमंत्र्यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात सीआयडीने पुरावे गोळा केले असून गुप्ततेमुळे ते उघड करु शकत नाही. अर्थात, भुजबळ आणि कदम नंतर आपली कारागृहवारी होऊ नये म्हणून इतर मंडळी गप्प झाली.
आता कदम ज्या पद्धतीने कारागृहातही अरेरावी करतोय ती पाहता त्याचे वर्तन मी इतरांचे पाप डोक्यावर घेवून कारागृहात आहे. मी तोंड उघडले तर भले भले अडचणीत येतील अशाच अविर्भावाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबित केल्यानंतर कदम याने शिवसेनेशी संधान बांधल्याचीही चर्चा होती. त्याला शिवसेनेने दुजोरा दिला नाही.
कारागृहात असताना कदम याने पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्याच्या अगोदर वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही धमकावल्या गुन्हा दाखल आहे. कदम याला मूतखड्याचा त्रास आहे. त्याला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात न्यावे लागते. एकदा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी कदमला रुग्णालयात पाठविण्याचे सांगितले. मात्र, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी पोलीस एस्कॉर्ट व्हेईकल उपलब्ध झाले नाही. याचा राग येवून कदमने डॉ. घुले यांना धमकावले होते. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कदम विरुद्ध गुन्हा दाखल आहे. आता पवार यांना धमकावल्याबद्दल मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी उपायुक्त अखिलेश सिंह यांना चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे कदम याने एका कार्यकर्त्यामार्फत पवार यांच्याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन त्यांनी २५ हजार रुपये लाच मागितल्याचा दावा केला आहे.
कदम यांच्या दादागिरी व अरेरावीचे इतरही किस्से आहेत. अशा प्रकरणांसाठी दादांनी कदमांचे कान टोचलेले नाहीत. उलटपक्षी कर्तव्यतत्पर असा लौकिक असलेल्या अधिकाऱ्यांवर शेलक्या भाषेत टीका टिपणीच केली आहे. आमदार झाल्यानंतर कदम यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या सोबत बैठका घेणे सुरु केले होते. या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांना एकेरी भाषेत जाब विचारण्याची कदम यांची पध्दत होती. काही अधिकाऱ्यांनी तशी तक्रार सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे केली. त्यावर मुंडे यांनी लेखी आदेश दिले की, सरकारी अधिकाऱ्यांनी केवळ जिल्हा पालकमंत्र्यांच्या बैठकीलाच उपस्थित राहावे. दादांनी मुंडेवर टीका करण्यामागे हे कारण होते. मुंडे आणि कदम यांच्यातील संघर्ष वाळू चोरीवरही झाला. मुंडे यांनी विनापरवाना होणारी वाळू वाहतूक रोखायला कारवाई सुरु केली. त्यावर कदम यांनी रस्ते दुरुस्त करा मगच वाळू वाहतूक करु अशी मागणी करीत मोर्चा काढला. अर्थात, या मागे बांधकामे ठप्प पाडून मुंडेंविषयी नाराजी निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न होता. याच विषयावरील वादात कदम यांनी तलाठी हनीफ हुसेन तांबोळी यांना मारहाण केल्याचा गुन्हाही दाखल झाला. कदम यांनी या सोबत अशीही दादागिरी केली की, राष्ट्रीय महामार्गावरील उड्डान पुलाखालील बंद जागेचा अडथळा तोडून तेथे पार्किंग सुरु करायचा प्रयत्न केला. या दांडगाईबद्दलही कदमवर गुन्हा दाखल झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या दादांचे बोट धरून कदम हैदोस घालत होते त्या दादांनी कधीही कदमांना चाप लावला नाही. उलट कदमांसाठी मुंडे सारख्या निस्पृह अधिकाऱ्यावर टीका केली. पंढरपुरात आषाढी एकादशीच्या शासकीय पुजेला मुंडे यांच्या हस्ते (विश्वस्त मंडळ अध्यक्ष म्हणून) होणाऱ्या नित्य पुजेमुळे उशीर झाल्याचा मुद्दा ताणत दादांनी मुंडेची मस्ती उतरवा अशा भाषेत संताप व्यक्त केला होता. कदम याचे आताचे वर्तन पाहता मस्तवाल कोण होते ? कोणामुळे होते ? हे हळूहळू लोकांच्या लक्षात येत आहे. ढोबळे यांना डावलून कदम यांना विधानसभेसाठी दादांनी उमेदवारी दिली. निवडून येण्यासाठी कदम यांनी ६ कोटी ५६ लाख रुपये वाटल्याचा आरोप नंतर झाला होता. अर्थात, त्याची दखल दादांनी घेतली नाही.
कदम यांनी साठे महामंडाळात घातलेला हैदोस हा अखेरीस लक्ष्मण ढोबळे यांनीच समोर आणला. विविध आरोप सिध्द करणारी ३,७०० कागदपत्रे ढोबळेंनीच पोलिसांना दिली. कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ढोबळे हे साहेब तथा काकांचे कट्टर समर्थक होते. साठे महामंडळात कदम यांनी ३८५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर कदम हे १५ दिवस फरार होते. न्यायालय जामीन देईल या आशेवर ते पुण्यातील बड्या हॉटेलात दडून बसले होते. नंतर कदम यांच्या विरोधात ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने हवाला पैसा व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात न्यायालयाने कदम यांची सुमारे १३५ कोटी रुपयांची संपत्ती जशी मुंबईतील फ्लॅट, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतजमीन व बँकेतील शिल्लक जप्त करण्याचा हंगामी आदेश दिला होता. साठे महामंडाळामार्फत बारामती दूध संघाला ५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. बारामतीत साहेब व दादांच्या मर्जी शिवाय काहीही हलत नाही हे लोकांना माहित आहे.
कदम यांनी आपला तोंडाळपणा व दादागिरी यावर पांघरुण घालण्यासाठी आपल्या जातीचे व ॲट्रॉसिटी कायद्याचाही वापर करायचा प्रयत्न केला. जेव्हा मुंडे यांनी वाळू माफियांना रोखले तेव्हा कदम यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले होते. पण ती दाखल केली नाही. आताही पवार यांना शिवीगाळ केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरुध्द अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे धमकावले आहेच.
कदम यांचे वागणे दानवे यांच्या वक्तव्याच्या तुलनेत १००० पट आक्षेपार्ह आहे. जसे दानवेंना माफ करता येत नाही तसेच कदम सारख्यांसाठी माफी शब्द नाही. साहेब व दादांच्या भरवशावर अनेक बांडगुळे राजकारणात स्थिरावली आणि ती आता इतरांच्या उरावर पोसली जात आहेत, हे मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का?
‘खान्देश खबरबात’मधील याआधीचे ब्लॉग :
खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !
ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप
आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !
खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !
यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !
खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी
खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त
खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर
खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!
खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर
खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन
खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे
खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार
खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार
खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ
खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!
खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे
खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?
खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा
खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…
खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री
खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!
खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…
खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर
खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल
खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!
खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र
खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?
खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट
खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा
खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी
खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement