एक्स्प्लोर

BLOG : शिवसेना राष्ट्रीय पक्ष होऊ शकेल?

Shiv Sena Party : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी विविद विषयांवर मते मांडली. पण यात सगळ्यात महत्वाचं वक्तव्य होतं देशाच्या इतर राज्यातही शिवसेना वाढवण्याबाबतचं. बाबरी मशीद पडली तेव्हा देशभरात शिवसेनेच्या हिंदुत्वाची लाट होती. त्याचवेळी देशभरात पक्ष वाढवला असता तर शिवसेनेचा पंतप्रधान असता असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

काही महिन्यांपूर्वी दादरा-नगरहवेलीमध्ये डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या कलाबाई डेलकर निवडून आल्य़ा. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा हा पहिलाच खासदार. खरे तर शिवसेनेची स्थापना होऊन आज ५५ वर्षे झाली. पण या ५५ वर्षात शिवसेनेचे सुरुवातीला मुंबई महापालिका, मुंबईत आमदार निवडून आले आणि नंतर शिवसेनेने महाराष्ट्रभर पाय पसरले. शिवसेना राज्यभरात पोहोचवण्याच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्माचा फार मोठा वाटा आहे. पण राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला भाजपची मदत घ्यावी लागली होती. शिवसेना अगोदर १९९५ आणि नंतर २०१४ मध्ये राज्यात सत्तेवर आली तेव्हा सोबत भाजपच होता. मात्र २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सत्ता हस्तगत केली. एवढंच नव्हे तर ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती म्हणजेच उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसले. आता शिवसेनेला वेध लागलेत शिवसेनेचा पंतप्रधान बनवण्याचे.

खरे तर असे स्वप्न बघण्यात काहीही हरकत नाही. पण देशातील प्रादेशिक पक्षांची वाटचाल पाहता शिवसेना यात कितपत यशस्वी होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि काही प्रमाणात तो खराही आहे असे वाटते.

१९९३ च्या दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे रक्षणकर्ते म्हणून देशभरात ओळखले जाऊ लागले. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बाळासाहेबांच्या नावाचा  डंका वाजत होता. पण तेव्हा शिवसेना वाढवावी असे बाळासाहेबांना वाटले नव्हते. याचे कारण त्यांनाच ठाऊक असेल. त्यामुळे बाळासाहेबांचा करिश्मा असताना शिवसेना अन्य राज्यात वाढू शकली नाही ती आता वाढू शकेल का? याचा अर्थ असा नाही की शिवसेनेने दुसऱ्या राज्यांमध्ये निवडणुका लढवल्या नाहीत. बाबरी प्रकरणानंतर शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवली. पवन पांडे हा महाराष्ट्राबाहेरील शिवसेनेचा पहिला आमदार. अकबरपूर मतदारसंघातून पवन पांडे निवडून आले होते. पण शिवसेनेला याचा फायदा घेता आला नाही आणि त्यानंतर कधीही उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला यश मिळाले नाही. शिवसेनेने गोवा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, गुजरात, दिल्ली आणि प. बंगामध्ये निवडणुका लढवल्या आहेत. पण त्यांना यश मिळालेले नाही. याचे कारण शिवसेनेची इमेज. शिवसेना प्रांतीयवादी असून अन्य राज्यातील नागरिकांना विरोध करते असा प्रचार अन्य राज्यांमध्ये झाल्याने आणि भाजपने हिंदुत्वाचा स्वीकार केल्याने शिवसेनेला मतदारांनी साथ दिली नाही.

खरे तर आता शिवसेना पक्षप्रमुख दिल्लीचं तख्त काबिज करून शिवसेनेचा पंतप्रधान बसवण्याचा संकल्प सोडतायत. यापूर्वीही अगदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते तेलुगु देसमचे चंद्राबाबू नायडू, सपाचे मुलायम सिंह, बसपाच्या मायावती, जयललिता. एन. टी. रामाराव, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, ओरिसाचे बीजू पटनायक अशा अनेकांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून किंवा विविध पक्षांची आघाडी करून पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहिलं आहे. पण एका राज्याची सत्ता प्राप्त करणे आणि संपूर्ण देशभरात विस्तार करून पंतप्रधानपद मिळवणे सोपे नाही. शिरोमणी अकाली दल हा देशातील पहिला प्रादेशिक पक्ष म्हणता येईल. १९२० मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने पंजाबमध्ये अनेक वेळा सत्ता हस्तगत केली पण आता त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. तर काही प्रादेशिक पक्ष हे फक्त परिवारापुरतेच उरल्याने ते राज्याबाहेर जाऊच शकत नाहीत.

देशात काश्मीर ते कन्याकुमारी असे पसरलेले आणि कार्यकर्त्यांचे जाळे असलेले दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत आणि ते म्हणजे काँग्रेस आणि भाजप. पण गेल्य आठ-दहा वर्षांपासून मतदार आणि नेते काँग्रेसपासून दूर जाताना दिसत आहेत. ज्या काँग्रेसचे संसदेत ४०० च्या आसपास खासदार असत त्यांचे आज ४० च्या आसपासच खासदार आहेत. तर भाजपच्या खासदारांच्या संख्या ३०० च्या आसपास जाऊन पोहोचली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतभर पसरलेले जाळे आणि त्यातून उभी राहिलेली कार्यकर्त्यांची फळी ही भाजपची जमेची बाजू आहे. अशी कामगिरी कुठल्य़ाही प्रादेशिक पक्षाची नाही.

शिवसेनेला आता या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन फक्त महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करण्याकडे लक्ष देण्यापेक्षा संपूर्ण देशात शिवसैनिकांचे जाळे तयार करण्याची गरज आहे. पण शिवसेनेची इमेज पाहाता आणि प्रखर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मतदार भाजपकडे पाहात असताना हे यश मिळवणे सोपे नाही. तसेच अनेक प्रादेशिक पक्षांची आघाडी करून सत्ता मिळवून ती टिकवणेही अवघड आहे. कारण प्रत्येक प्रादेशिक पक्षाच्या नेत्याच्या महत्वाकांक्षा फार मोठ्या असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना याचा चांगला अनुभव आहे. आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा विचार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी योजना आखली आणि पक्षवाढीसाठी देशभर दौरे करून अन्य पक्षांच्या नेत्यांना भेटले, शिवसैनिकांचे जाळे निर्माण केले तर शिवसेना हा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष होऊ शकेल असे वाटते.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
Embed widget