एक्स्प्लोर

BLOG : चाळीशीही गाठू न शकलेल्या बॉलिवूडमधील नायिका : ट्रॅजेडी क्विन्स

अभिनेत्री जिया खानने 3 जून 2013 रोजी आत्महत्या केली, जियाची आई राबिया यांना जुहूस्थित घरी जिया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. जियाच्या आत्महत्या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला पोलिसांनी 10 जून 2013 रोजी अटक करण्यात आली होती. परंतु तो जामिनावर बाहेर आला आणि चित्रपटांमध्ये कामही करू लागला आहे. जिया खानच्या आत्महत्येनंतर तिची सुसाइड नोट सापडली होती. त्या सुसाईड नोटवरूनच आदित्य पांचोलीचा मुलगा अभिनेता सुरज पांचोलीवर आरोप ठेवण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयात खटला सुरू झाला होता. त्यानंतर सत्र न्यायालयाने हे प्रकरण सीबीआय न्यायालयात वर्ग केले. त्यामुळेच आता सीबीआयच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी होणार आहे. जियाच्या आत्महत्येच्या आठ वर्षांनी या प्रकरणाची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरू होणार आहे. जियाने आत्महत्या केली तेव्हा ती फक्त 25 वर्षांची होती.

अमिताभ बच्चनसोबत 'निशब्द' चित्रपटातून जिया खानने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही हिट चित्रपटांमध्येही तिने काम केले. तिची कारकीर्द बहरालाही येत होती, अशातच एक दिवस अचानक तिने आत्महत्या केली. सूरजने तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप जियाच्या आईने केला होता.

चाळीशी गाठण्यापूर्वीच हे जग सोडणारी जिया पहिलीच अभिनेत्री नाही. तिच्यापूर्वीही काही नायिकांनी चाळीशी गाठण्यापूर्वी हे जग सोडलेले आहे. खरे तर बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्यांना पैशांची कमतरता नसते. कलाकार कोट्यावधी रुपये कमवत असतात. त्यामुळे एखादा आजार झाला तर अगदी परदेशात राहूनही महिनो न महिने उपचार घेण्याची कलाकारांची ऐपत असते. असे असले तरी बॉलिवूडमध्ये अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी आजारपणामुळे म्हणा वा जीवनात आलेल्या कटु प्रसंगामुळे आत्महत्या केली. जियाच्या निमित्ताने अशाच नायिकांवर एक नजर...

प्रचंड वैभव आणि लोकप्रियता मिळवलेल्या मात्र चाळीशीच्या आतच देवाघरी गेलेल्या नायिकांचा विचार करता सगळ्यात अगोदर जे नाव डोळ्यासमोर येते ते मधुबालाचे. मधुबालाच्या सौंदर्याबाबत काही बोलण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. दैवी सौंदर्य कसे असावे त्याचे उदाहरण म्हणजे मधुबाला. मधुबालाने रुपेरी पडदा गाजवला होता. ती एक आघाडीची नायिकाही होती. पण म्हणतात सौंदर्याला नजर लागते तसेच झाले. मधुबालाच्या हृदयाला लहानपणापासूनच एक छिद्र होते. शेवटच्या दिवसात किशोर कुमारने तिच्याशी लग्न केले होते आणि तिची पूर्ण काळजी घेत असे. आजारपणामुळे मधुबालाच्या सौंदर्यावर परिणाम झाला होता आणि तिचा चेहरा खराब होऊ लागला होता. त्यामुळे ती आरशातही बघत नसे. ती सतत मेकअप करून बसून राहायची. ती निराश होऊ नये म्हणून सगळे तिच्याशी चांगले बोलायचे आणि तिच्या रुपाची प्रशंसाही करायचे. हृदयाला असलेल्या छिद्रामुळे वयाच्या फक्त 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सौंदर्यवती मधुबालाचे निधन झाले.

मधुबालाचे जसे आजारपणामुळे निधन झाले अगदी तसेच ट्रॅजेडी क्विन म्हणून ओळख मिळवलेल्या मीना कुमारीचाही आजारपणामुळेच लवकर मृत्यू झाला. मीना कुमारीला लिव्हर सोरायसीसचा आजार झाला होता. काही कारणामुळे मीना कुमारीला दारू पिण्याची सवय लागली होती. ती का लागली याबाबत नंतर कधी तरी बोलू. विदेशी दारू पिऊन ती 24 तास नशेत असायची. तिच्या जवळचे तिला विदेशी दारू म्हणून देशी दारू ग्लासात भरून द्यायचे असे सांगितले जाते. नशेत असल्याने मीना कुमारीला काही कळत नसे आणि ती देशी दारू पीत असे. त्यामुळे तिचे लिव्हर संपूर्णपणे खराब झाले होते. या आजारपणामुळेच वयाच्या 39 व्या वर्षी मीना कुमारीचा मृत्यू झाला.

बॉलिवूडमध्ये स्मिता पाटीलनेही आपल्या अभिनयाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. आर्ट, कमर्शियल अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये स्मिताने आपल्या अभिनयाची कमाल दाखवली होती आणि प्रत्येक भूमिकेत ती सूट व्हायची किंवा ती भूमिका स्मिता जगायची त्यामुळे ती कधीही नाटकीय अभिनय करते असे वाटत नसे.  स्मिता आणि राज बब्बरचे लग्न झाले होते. स्मिताने मुलाला जन्म दिला, प्रतीक बब्बर असं त्याचं नाव ठेवलं गेलं, पण बाळंतपणात तिला काहीतरी त्रास झाला होता. त्यामुळे जवळजवळ महिनाभर स्मिता आजारी होती आणि एक दिवस तिला रक्ताच्या उलट्या झाल्या, तिचे अंग पिवळे पडले. तिला इस्पितळात नेईपर्यंत ती कोमात गेली आणि काही वेळातच तिचे निधन झाले, त्यावेळी स्मिताचे वय फक्त 31 वर्ष होते.

सिल्क स्मिता दक्षिणेतील एक प्रचंड यशस्वी अभिनेत्री. अंग प्रदर्शन करण्याच्या तिच्या धाडसामुळे ती प्रचंड लोकप्रिय होती. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले होते. हिंदीतही सिल्क स्मिताने काही आयटम साँग केले होते. सिल्क स्मिताला सेक्स सायरन म्हणून ओळखले जात होते. तिच्या बिनधास्त अंग प्रदर्शनाच्या कामामुळे तिच्याबाबत काहीही छापून येत असे. रस्त्याने जाताना तिला अश्लील इशारेही केले जायचे. या सगळ्यांचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. तिच्या घरात ती मृतावस्थेत सापडली होती. तिने आत्महत्या केली असे म्हटले जाते. त्यावेळी तिचे वय फक्त ३५ वर्ष होते.

मधुबालाप्रमाणचे दिव्या भारतीही अत्यंत सुंदर होती. अत्यंत कमी वयात तिने चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती. लहान वयातच तिने हिट चित्रपट दिले होते आणि प्रचंड यश मिळवले होते. प्रख्यात निर्माता साजिद नाडियाडवालाशी दिव्या भारतीने लग्न केले होते. परंतु लग्नानंतर काही महिन्यातच दिव्याचा घराच्या गॅलरीतून खाली पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी तिचे वय फक्त १९ होते. तिचा मृत्यू आत्महत्या होती, दुर्घटना होती की हत्या होती याचा शोध अजूनही लागलेला नाही. दुर्घटना असे सांगून तिच्या मृत्यूची चौकशी बंद करण्यात आली.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha Top Headlines 07 March 2025Special Report | Mohammed Shami Roza | देशासाठी खेळणाऱ्या शमीवर आगपाखड कशाला? 'रोजा'वरुन मौलानांची मुक्ताफळंSpecial Report Satish Bhosale Profile : नोटांचे बंडल, दहशत पसरवणारा सतिश भोसले आहे तरी कोण?Vaibhavi Deshmukh : Santosh Deshmukh यांच्या मन हेलावून टाकणाऱ्या फोटोंवर लेकीची पहिली प्रतिक्रिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma : 4 वर्षात 4 आयसीसी फायनल, सूर्यकुमार यादवकडून रोहित शर्माला जाडा म्हणणाऱ्यांची बोलती बंद, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर म्हणाला...
रोहित शर्माच्या फिटनेस विषयी बोलणाऱ्यांची बोलती बंद, सूर्यादादानं ICC स्पर्धांचा इतिहास काढला
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Embed widget