Blog: मोरोक्कोचा विश्वचषकात धमाका अन् जुन्या वसाहतींचा वसाहतवादाला धक्का
Blog: मोरोक्को आणि फ्रान्स यांच्यात होणारा दुसरा फिफा उपांत्य सामना संपूर्ण मोरोक्को आणि उर्वरित जग पाहत असेल. ही लढत ऐतिहासिक असेल असंच अनेक समालोचकांनी म्हटलं आहे. ब्राझीलने सलगपणे चॅम्पियनशिप आपल्याकडे राखल्यानंतर तशाच प्रकारची कामगिरी करण्याच्या तयारीत असणारा फ्रान्स हा दुसरा देश असेल. तुलना करायची झाल्यास मोरोक्को फुटबॉलमध्ये एक अपस्टार्ट आहे आणि 1930 मध्ये यूएस आणि 2002 मध्ये दक्षिण कोरिया व्यतिरिक्त, विश्वचषक उपांत्य फेरीत खेळणारा दक्षिण अमेरिका किंवा युरोप बाहेरचा मोरोक्को हा एकमेव देश आहे. या विश्वचषकात मोरोक्कोचे अव्वल स्थान नेत्रदीपक ठरले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये, एक स्व-गोल सोडल्यास, एकही गोल होऊ दिला नाही आणि या संघाने बेल्जियम, स्पेन; आणि पोर्तुगालसारख्या दिग्गज संघाना बाहेरचा रस्ता दाखवला.
फुटबॉल हा जगाला एकत्रित आणणारा खेळ?
पण हे सर्व केवळ मॅच-अपच्या संबंधित असेल तर 'फुटबॉल सामना हा केवळ फुटबॉल सामना कधीच नसतो' या उक्तीमागचा आपल्याला अर्थ कधीच लागणार नाही. फुटबॉलच्या सामन्यामध्ये चाहत्यांमध्ये एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण होतं, उत्साह निर्माण होतो. फुटबॉल हा एकमेव खेळ आहे ज्यात सार्वत्रिक मास अपील होतं. फुटबॉल जगाला एकत्रित आणतो असं म्हटलं जातं, पण हा दावा काहीसा संशयास्पद आहे. कारण हा दावा अल्पकालीन असल्याचं स्पष्ट झालं आहे. कतार या अरब-मुस्लिम देशाला फिफाच्या आयोजनाची संधी दिल्यानंतर या निर्णयावर अनेकांनी टीका केली. हा देश फिफाचे आयोजन करण्यास अपात्र आहे असं अनेकांचं मत होतं. विशेषत: सौदी अरेबिया या निर्णयामुळे नाराज झाल्याचं दिसून आलं.
अरब प्रदेशात वर्चस्वासाठी गेल्या दोन दशकांपासून सौदी अरब आणि कतार या दोन देशांदरम्यान स्पर्धा सुरू आहे. 2017 साली अरब देशांनी कतारची वेगवेगळ्या मार्गाने नाकेबंदी करण्याचा प्रयत्न सुरू केला. सौदी अरब आणि कतार हे दोन्ही देस गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिलचे (Gulf Cooperation Council- GCC) सदस्य आहेत. सौदी अरब हा देश तसा पाहिला तर पुराणमतवादी विचारांचा आहे, त्याने अरब स्प्रिंगला विरोध केला. तर कतारने आधुनिकतेची कास धरल्याचं दिसून येतंय. कतारने अनेक सामाजिक आणि राजकीय सुधारणा केल्या आणि इराणशी जवळीकता साधली. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यामध्ये सौदी अरबने अर्जेंटिनाचा 2-1 असा धक्कादायक पराभव केला. आता सौदीचे नागरिक अजूनही कतारला जात आहेत, संपूर्ण अरब जग यंदाचा विश्वचषक हा अरब जगाचा विजय असल्याचा दावा करत आहे.
आफ्रिका देखील अर्थातच हा विश्वचषक आधीच आफ्रिकनांचा आहे असा दावा करत आहे आणि मोरोक्कोने फ्रान्सविरुद्ध विजय मिळवला तर ही शक्यता सत्यात येईल. पण तीन आठवड्यांपूर्वी अर्जेंटिनाविरुद्धच्या अंतिम सामन्यात सर्वत्र उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि खेळात काहीही होऊ शकतं असा दावाही केला जात होता. दक्षिण अमेरिका आणि विशेषत: युरोपला विश्वचषकात मोठ्या संख्येने प्रतिनिधीत्व मिळालं तर आशियाई, अरब आणि आफ्रिकन देशांच्या प्रतिनिधीत्वाच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी आवाज उठू लागला.
अरब आणि आफ्रिकन देशांमध्ये सेलिब्रेशनचा मूड
पण जगामध्ये मोरोक्कोचे स्थान नेमके कसे आहे? याचे ऐतिहासिकदृष्ट्या सब-सहारा आफ्रिकेशी काही घनिष्ट संबंध आहेत. म्हणजे माघरेबशी त्याचा संबंध जोडला जातो. गंमत म्हणजे, माघरेबचे (प्राचीनकाळात पश्चिम किंवा आफ्रिका मायनर म्हणून ओळख) अनेक तुकड्यात विभाजन झालं आहे आणि मोरोक्कोचा भू-राजकीय प्रतिस्पर्धी, अल्जेरियाने 2021 मध्ये रबातशी संबंध तोडले आहेत. दोन्ही देशांनी पश्चिम सहारावर दावा केला आहे. या प्रदेशावर मोरोक्कोने 1975 साली आक्रमन केलं आणि हा प्रदेश ताब्यात घेतला. आता अल्जेरिया या ठिकाणच्या सशस्त्र बंडखोरीला पाठिंबा देत आहे. इस्त्रायलसोबतच्या रबातच्या जवळच्या संबंधांमुळे मोरोक्को आणि अल्जेरिया यांच्यातही तणाव निर्माण झाला आहे. विश्वचषकातील मोरोक्कोच्या विजयाची बातमी अल्जेरियाच्या सरकारी टीव्हीवर देखील दिली गेली नाही. त्याचवेळी उर्वरित अरब आणि आफ्रिकन जग सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे.
जेव्हा मोरोक्कन फुटबॉल स्टार सोफेन बौफलने (Sofaine Boufal) स्पेनवर मिळालेला विजय केवळ मोरोक्को आणि अरब जगाला समर्पित केला, तेव्हा आफ्रिकेत चांगला संदेश गेला नाही. सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त झाल्यानंतर त्याने इतरांसारखी माफी मागितली. पण वस्तुस्थिती अशी आहे की अरब जगतातही मोरोक्कोमध्ये विसंगती आहे. उदाहरणार्थ, मोरोक्कोने काही काळापूर्वी इस्रायलशी संबंध सामान्य केले आणि त्या बदल्यात पश्चिम सहारावरील सार्वभौमत्वाच्या दाव्यांसाठी अमेरिकेचं समर्थन प्राप्त केलं. इस्रायलमध्ये मोरोक्कन ज्यूंची लोकसंख्या लक्षणीय आहे, ही संख्या इस्रायलच्या अंदाजे 10 दशलक्ष लोकसंख्येच्या 5 टक्के इतकी आहे. परंतु प्रत्येक प्रसंगी मोरोक्कोच्या खेळाडूंनी पॅलेस्टिनी झेंडे दाखवले आणि त्यासाठी हा विश्वचषक निश्चितच उल्लेखनीय आहे. मोरोक्कोने इस्रायलशी घनिष्ठ संबंध जोपासले असले तरीही ते पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर अरब जगताशी एकता दर्शविण्याचा प्रयत्न करत आहे.
मोरोक्को ही फ्रेंचांची जुनी वसाहत
तथापि मोरोक्कोचे युरोप आणि विशेषतः फ्रान्सशी असलेले संबंध हे मोरोक्को आणि फ्रान्स यांच्यातील आगामी उपांत्य फेरीला समकालीन सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासातील सर्वात मार्मिक आणि तणावपूर्ण बनवतात. मोरोक्कोची ओळख ही बहुतेकांना पूर्वीची फ्रेंच वसाहत अशीच आहे. परंतु इतर युरोपीय शक्तींनी मागील शतकांमध्ये मोरोक्कोमध्ये सातत्याने हस्तक्षेप केला आहे. बेल्जियमला स्पर्धेबाहेर काढण्यासाठी मोरोक्कोने चांगली खेळी खेळली. वसाहत असताना बेल्जियमने काँगोमध्ये अनेक अत्याचार केले होते. नंतर स्पेन (पेनल्टी शूट-आऊटमध्ये) आणि पोर्तुगाल (1-0), दोन इबेरियन शक्ती ज्यांनी डच, फ्रेंच आणि इंग्रजांचा उदय होण्यापूर्वी जगावर वर्चस्व गाजवले, या दोन देशांनाही मोरोक्कोने बाहेर काढले.
पोर्तुगीजांनी इ.स. 1500 च्या सुमारास गादीर, एल जादिदा (पूर्वीचे माझगान) आणि अझेनमोर ही मोरोक्कन किनारी शहरे ताब्यात घेतली होती याची अनेकांना माहिती नाही. स्पेनने त्याचप्रमाणे भूमध्य सागरी किनार्यावर मोरोक्कोच्या काही भागांची वसाहत केली आणि त्यामुळे पश्चिम सहारा हे 1920 च्या दशकात रिफ युद्धाचे ठिकाण ठरलं. दुष्ट आणि शोषणात्मक इतिहास असलेल्या या युरोपीय शक्तींना आता फुटबॉलच्या मैदानावरच एका अरब आणि आफ्रिकन राज्याने नमवलं ही आनंदाची बाब आहे.
मोरोक्कोला ऐतिहासिक विजयाची संधी
यामुळे अर्थातच मोरोक्कोवर वसाहत करणार्या शेवटच्या युरोपियन शक्ती असलेल्या फ्रान्सकडे, आणि आताच्या या स्पर्धेतल्या शेवटच्या युरोपियन देशाविरोधात मैदानात सामर्थ्य दाखवण्याची आणि विजय मिळवण्याची संधी मिळाली आहे. मोरोक्कोकडे अल्जेरियाप्रमाणे मोरोक्कोकडे अल्बर्ट कामू किंवा फ्रँट्झ फॅनॉन नव्हते, ज्यांनी फ्रेंचांच्या या वसाहतीकडे जगाचं लक्ष वेधलं आणि वसाहतवाद जगाच्या लक्षात आणून दिला. फ्रेंचांचा मोरोक्कोवर ताबा 1907 साली सुरू झाला. मोरोक्को 1912 साली फ्रेंच संरक्षित राज्य बनले. आफ्रो-कॅरेबियन स्कॉलर वॉल्टर रॉडनी यांनी ध्यानात आणून दिल्याप्रमाणे फ्रान्सने मोरोक्कोमध्ये अल्जेरियाप्रमाणे जरी क्रूरकरणाची पातळी गाठली नसली तरी त्या देशाचं शोषण मात्र केलं, मोरोक्कोच्या आजच्या परिस्थितीला फ्रान्सचे ते शोषणच कारणीभूत ठरलं. 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला मोरोक्कोमध्ये वसाहतविरोधी संघर्ष तीव्र झाला आणि मोरोक्को 1956 पर्यंत फ्रेंच संरक्षित राज्य राहिले.
तेव्हापासून फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील संबंध नेहमीच मधूर असे राहिले नाहीत आणि काहीवेळा त्यामध्ये संघर्षाचं चित्रही निर्माण झालं. मोरोक्कन वंशाचे 1.5 पेक्षा जास्त लोक आता फ्रान्समध्ये राहतात असं मानलं जातं. त्यापैकी अर्ध्यां लोकांकडे दुहेरी नागरिकत्व आहे आणि 2022 मध्ये सुमारे 35,000 मोरोक्कन लोकांना, इतर कोणत्याही वांशिक किंवा वांशिक गटांच्या तुलनेत, फ्रान्समध्ये राहण्याचे परवाने मिळाले. परंतु फ्रान्सने वेळोवेळी, अगदी अलिकडे जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये, मोरोक्कन लोकांना व्हिसा देण्यावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सने जाहीर केले आहे की प्रजासत्ताक मूल्ये स्वीकारणारा कोणीही फ्रेंच बनतो हे संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असलं तरीही फ्रान्समध्ये वंशवादाची समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे. बॅनलियू किंवा उपनगरात जातीय अशांतता नियमित होत असल्याचा प्रकार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रान्समधील उत्तर आफ्रिकन लोकांना बेरोजगारी, गरिबी, भेदभाव, पोलिस हिंसा आणि ज्याचे वर्णन सामाजिक बहिष्कार म्हणून केले जाऊ शकते अशा विषमतेचा सामना करावा लागतो.
फ्रान्सच्या अतिउजव्या लोकांची मोरोक्कोन वंशाच्या लोकांवर टीका
अतिउजव्या फ्रेंच राष्ट्रवाद्यांनी त्या देशाची वसाहतवादाला पोसणारी वृत्ती ही भूतकाळातील नाही हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आहे. युरोपियन देशांवर मोरोक्कोने मिळवलेल्या विजयानंतर त्या देशाने केलेल्या सेलिब्रेशनचाही या लोकांनी निषेध व्यक्त केला आहे. फ्रान्समधील अतिउजव्या विचारसरणीचा नेता अशी ओळख असलेला आणि त्या देशाचा खासदार गिल्बर्ट कोलार्टने यावर एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, एमियन्सच्या अॅनेक्स टाऊन हॉलवर मोरोक्कन ध्वज फडकवला गेला. आपला देश ताब्यात घेण्याचे हे प्रतीक असह्य आहे. या देशाने ज्यांना खायला दिलं, आश्रय दिला आणि पालनपोषण केलं त्या देशाचा तिरस्कार केला जात असल्याचा आरोप फ्रान्समधील अति उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्या देशातील मोरोक्कन वंशाच्या लोकांवर केला आहे. ते देशविरोधी आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. हा विचार बहुवांशिक, बहुसांस्कृतिक समाजासाठी धोकादायक आहे.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल जो राष्ट्रवादावर फोफावतोय, त्याने एकाच वेळी हे दाखवून दिले आहे की राष्ट्रवादाची जोपासना करणे ही काही सोपी गोष्ट नाही आणि फुटबॉल हाच राष्ट्रवादाचा विरोधी ठरु शकतो. राष्ट्रवाद स्वस्त, पोकळ आहे, आणि जे लोक विचार करण्यास असमर्थ आहेत, ज्यांचा नैतिक मुल्यांशी काही संबंध नसतो त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद सहज उफाळून येतो. आजचा राष्ट्रवाद हा या दोन गोष्टींमुळेच असल्याचं दिसून येतंय. फ्रेंच संघातील जवळपास अर्धे खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. आफ्रिकेतील बरेच लोक त्यांच्याकडे केवळ फ्रेंच आफ्रिकन म्हणून पाहत नाहीत, तर पॅन-आफ्रिकन आयडेंटिटी असलेले नागरिक असेच पाहतात. फ्रेंच संघातील कायलिन एम्बाप्पे हा खेळाडू आफ्रिकन वंशाचा आहे तो मोरोक्कन स्टार खेळाडू आचरफ हकिमी याच्या जवळचा मित्र आणि सहकारी मानला जातोय.
हे देखील एक सत्य आहे की मोरोक्कोचा स्वतःचा संघही एकजिनसीपणापेक्षा बरंच काही सांगून जातो. त्या देशाचे तीन खेळाडू खरे तर फ्रान्समध्ये जन्मले होते. प्रशिक्षक वालिद रेग्रागुईही त्यापैकीच एक. मोरोक्कोने आपला संघ तयार करण्यासाठी सर्व स्तरातून चाचपणी केली. गोलकीपर युनेस बौनो हा कॅनडामध्ये जन्मला आणि हकिमीचा जन्म माद्रिदमध्ये झाला. संघातील सव्वीस खेळाडूंपैकी चौदा खेळाडूंचा जन्म देशाबाहेर झाला आहे आणि जगभरातील फुटबॉल संघांमध्ये, विशेषत: युरोपमधील संघांमध्ये हेच प्रमाण वाढत आहे.
त्यामुळे काही लोकांसाठी हा विश्वचषक त्यांच्या निष्ठेसंदर्भात समस्या उभी करतोय. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी आणि भारतीयांना या देशांचे राष्ट्रीय क्रिकेट संघ जेव्हा ब्रिटनशी खेळतात तेव्हा अशा भावनांचा अनुभव येतो. साम्राज्यवाद आणि वसाहतवाद, राष्ट्रवाद आणि कॉस्मोपॉलिटॅनिझमचा एकमेकांशी जोडलेला इतिहास हा फुटबॉल विश्वचषकाला इतर खेळांपासून वेगळं करतोय ही वस्तुस्थिती आहे.
महान युरोपियन फुटबॉल देश असलेले बेल्जियम, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड्स यांच्यासमोर जुन्या राष्ट्रवादाच्या अडचणी उभ्या राहतात. या युरोपियन शक्ती त्यांच्या पूर्वीच्या वसाहतीतील प्रजेसाठी अनेकदा आदरातिथ्य दाखवण्यापेक्षा कमी आणि कधीकधी उघडपणे शत्रुत्व दाखवत असल्या तरीही त्यांना पूर्वीच्या वसाहतींमधील लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अधिक संधी मिळू शकेल. प्रमुख युरोपीय शहरांचा कायापालट स्थलांतरितांनी केला आहे आणि अर्ध्या शतकापूर्वीच्या महान युरोपियन लेखकांना ते मान्य होणार नाही.
दरम्यान, पूर्वी अनेक वसाहती राष्ट्रे, ज्यांनी प्रचंड वांशिक, धार्मिक आणि भाषिक विविधतेतून आपले स्वातंत्र्य मिळवले होते, त्यांनी आता त्यांची जुनी ओळख विसरून स्वतःचा एक धर्म, एक वंश, एक भाषा याकडे प्रवास सुरू ठेवला आहे. सहिष्णुतेप्रति असहिष्णुता वाढत चालली आहे हे भारताच्या उदाहरणावरुन चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे. जुन्या म्हणीकडे परत जाताना, 'फुटबॉल सामना हा फक्त फुटबॉल सामनाच नसतो', त्याप्रमाणे आता विश्वचषक हा एक थ्रिलर नॉनपॅरेल असण्याचं सुंदर चित्रण करतो आणि राष्ट्रवादाची ज्वाला तेवत ठेवण्यासाठी कदाचित त्याच्या असंख्य चाहत्यांमध्ये अडचणी, कोडं आणि विचित्रपणा कायम ठेवतो.