एक्स्प्लोर

BLOG : जु’लेह’ लडाख : भाग दोन

BLOG : इतिहास विसरलात तर भविष्य अंधारात जातं. एखाद्या किल्ल्याचा ढासळलेला बुरुज, त्यावरच्या आक्रमणाचे व्रण आपल्यासाठी खपलेल्या लोकांची आठवण करून देतात. एखादा डौलदार किल्ला, सुंदर महाल, स्मारकं आपल्याला आपण कोण होतो याची जाणीव करुन देतात. इतिहास हा एका रात्रीतून घडत नाही. शेकडो वर्षे लढल्यानंतर राष्ट्र उभं राहतं आणि सांडलेल्या रक्तातून इतिहास लिहिला जातो. लडाखमधल्या उंच टेकडीवर उभा असलेला शानदार लेह पॅलेस साक्षिदार आहे इथल्या गेल्या 450 वर्षांच्या राजकारणाचा. परकीयांची आक्रमणं आपल्या अंगावर झेलत हिंदुस्तानची ढाल बनलेल्या लडाखची कहाणी सांगतोय लेहच्या मध्यवर्ती पहाडावर उभा असलेला हा लेह पॅलेस. 

लेहच्या रस्त्यांवरून फिरताना शहरातल्याच उंच टेकड्यांवर बौद्ध स्तुपांमधून मंत्रोच्चारांचे आवाज कानावर पडतात. यापैकीच एका पहाडावरचा हा लेह पॅलेस नजरेत भरतो. कर्त्याधर्त्या वयोवृद्ध कुटुंब प्रमुखासारखा हा वास्तूपुरुष आपल्याला खुणावत असतो. कितीही संकटं आली, निसर्गानं कितीही कहर केला तरी आपण असं छातीचा कोट करून कसं उभं राहावं ते लेह पॅलेसकडे बघून कळतं. 

नामग्याल वंशावळीतले राजा सेंगगे नामग्याल यांच्या कारकिर्दीत या पॅलेसचं काम पूर्ण झालं. तिबेटी वास्तुकलेचा असा सुंदर नमुना शोधूनही सापडणार नाही. तिबेटच्या ल्हासामधील पोटाला पॅलेसची लेह पॅलेस प्रतिकृती आहे. लडाखसारख्या प्रदेशात अशा उंच खडकाळ पर्वतावर पॅलेसची निर्मिती करणं किती धाडसी आणि ऐतिहासिक आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. एक दोन नव्हे तर नऊ मजल्यांचा हा महाल आजही आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय आहे. दरवर्षी देश विदेशातले हजारो विद्यार्थी लेह पॅलेसच्या निर्माणकार्याचा अभ्यास करतात. लेह पॅलेसला लाचेन पालकर पॅलेस म्हणूनही ओळखलं जातं. 


BLOG : जु’लेह’ लडाख : भाग दोन

लेह पॅलेसला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. वाहनानं जायचं असेल तर दोन किलोमिटरचा वळसा घालून जावं लागतं. पायी जायचं असेल तर लेहच्या मुख्य बाजारात गाडी पार्क करून चालत जावं लागतं. आम्ही चालत चढाई करण्याचं ठरवलं. खालून बघितल्यावर वाटतं पॅलेस अगदी जवळ आहे, पण जेव्हा तुम्ही पायऱ्या चढायला सुरूवात करता तेव्हा कळतं हे वाटतं तेवढं सोप्पं नाही. त्यात भर दुपारी कडक उन्हात या पायऱ्या चढण्याचा निर्णय साफ चुकला होता. धापा टाकत, मध्ये थांबत आम्ही किल्ल्याच्या गेटपर्यंत पोहोचलो. ज्या पहाडावर हा पॅलेस उभारला गेला तो पहाडही या पॅलेसचा भाग आहे की काय असं खालून बघितल्यावर वाटतं. पहाड चढताना पायऱ्या असूनही साधं चढताना आपल्याला धाप लागते. साडे चारशे वर्षांपूर्वी कुठल्याही सुविधा आणि आधुनिक साधनं नसताना हा पॅलेस कसा बरं बांधला असेल याचा विचार करत होतो. एवढे महत्कष्ट घेऊन बांधकाम करणाऱ्या त्या सर्व कारागिरांनी हात जोडले पाहिजे. 


BLOG : जु’लेह’ लडाख : भाग दोन

पॅलेस किंवा महाल म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर आलिशान वास्तू, उंची मार्बल, रंगकाम, रेखीव कोरीवकाम, झगमगाट आणि भव्य दिव्य वास्तू डोळ्यासमोर येते. पण लेह पॅलेस या सगळ्याला अपवाद आहे. माती, लाकूड, वाळू आणि दगड यापासून लेह पॅसेल बांधण्यात आलाय. बांधकामातला साधेपणा आणि तरीही डोळे विस्फारतील एवढी भव्यता असलेला लेह पॅलेस म्हणूनच जगातल्या इतर महलांपेक्षा वेगळा ठरतो. लेह पॅलेसला नऊ मजले आहेत, सध्या पर्यटकांसाठी ठरावीक मजल्यांवर प्रवेश मिळतो. नामग्याल साम्राज्यात या नऊ मजल्यांचं महत्व होतं. खालचे मजले वस्तू भांडारासाठी राखीव होते. चौथ्या मजल्यापासून राजेशाही थाट सुरू होतो. राजघराण्यातल्या व्यक्तींसाठी चौथ्या मजल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जायचं. पाचव्या मजल्यावर मंत्री, सेनापतींसोबत अत्यंत महत्वाच्या बैठकांसाठी कौंसिल हॉल होता. सहाव्या मजल्यावर रॉयल फॅमिलीची मंडळी राहत असत. सातव्या मजल्यावर स्वतः राजाचं वास्तव्य होतं. आठव्या मजल्यावर एक एमर्जंसी रुम होती. तर सर्वात वरच्या मजल्यावर राजा नामग्याल यांच्या कुलदेवांचं (ROYAL SHRINE) मंदिर आहे. सध्यस्थितीत गतकालातल्या त्या वैभवाच्या फक्त आठवणी उरलेल्या आहेत. 


BLOG : जु’लेह’ लडाख : भाग दोन

अगदी नाममात्र फी घेऊन लेह पॅलेसमध्ये प्रवेश दिला जातो. पॅलेसची डागडुजी, बांधकाम आणि इतर प्रशासकीय यंत्रणा सध्या भारतीय पुरातत्व विभागानं हाती घेतली आहे. पॅलेसमध्ये भव्य द्वारातून प्रवेश करावा लागतो. असं म्हणतात की चारशे वर्षांपूर्वी या प्रवेशद्वारावर पिंजऱ्यात वाघ ठेवलेले असायचे. कोणीही येत जात असताना वाघ डरकाळ्या फोडायचे. मुख्य द्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरूवातीलाच एका खोलीमध्ये फोटो गॅलरी आहे. लेह पॅलेसच्या निर्मितीपासूनची छायाचित्रे याठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यासोबतच नामग्याल राजघराण्यातील काही राजांचे फोटोही दिसतात. पॅलेसमधून फिरताना भिंतीवर भगवान बुद्धांचा चित्रमय प्रवास बघायला मिळतो. एका खोलीत जुन्या मूर्ती काही पुरातन अवशेषही संग्रहित ठेवण्यात आले आहेत. इथल्या खोल्यांचे छत हे लाकूड आणि मातीची आहेत. आपल्याकडे गावाकडच्या जुन्या मातीच्या घराला जसे धाबे असायचे ना, अगदी तसंच धाब्याचं छत इथल्या प्रत्येक खोल्यांना आहे. पॅलेसमधल्याच नामग्याल तेस्मो मठात भगवान गौतमाची सुंदर मूर्ती आहे जिथे आजही पूजा होते. 

लेह पॅलेसमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. पण या वास्तूचा इतिहास जाणून घेण्याची आणि त्याचं पावित्र्य टीकून राहावं यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची मात्र कमी जाणवते. शिवाय हल्ली तर प्री-वेडिंसाठीही इथे परवानगी मिळते त्यामुळे फोटोग्राफर्स आणि सेल्फीलव्हर्सचा अक्षरशः सुळसुळाट झालाय. राजप्रासादाच्या थाटापेक्षा इथल्या वास्तूमध्ये भकासपणा जाणवत राहतो. पर्यटन म्हणजे स्वतःची मनमानी करणं नाही, हे आपल्या लोकांना समजाऊन सांगवं लागेल. त्यासाठी आपण ज्या वास्तूत उभे आहोत तिचा पूर्वेतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं गरजचं आहे. 


BLOG : जु’लेह’ लडाख : भाग दोन

मारिओल राज्यकर्त्यांचा पाडाव केल्यानंतर नामग्याल साम्राज्याचा उदय झाला. नववे शासक सेंगगे नामग्याल यांच्या कालखंडात म्हणजे 17 व्या शतकात लडाख भरभराटीच्या शिखरावर होतं. लडाखच्या सीमा उत्तरेत बाल्टिस्तानपर्यंत पोहोचली. त्यांच्याच काळात बौद्ध धर्माचा लडाखमध्ये प्रचार आणि प्रसार झाला. बौद्ध भिक्खुंना राजाश्रय देण्याचं काम सेंगगे नामग्याल यांनी केलं. अनेक स्तूप आणि बौद्ध मठ स्थापित केले गेले. हेमिस आणि वांग्लाच्या बौद्ध मठांवर त्याचा स्पष्टपणे प्रभाव दिसून येतो. लेह पॅलेसची निर्मिती करून नामग्याल साम्राज्याच्या शाही निवासाचं हे केंद्र सत्ताकेंद्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

इ.स. 1600 म्हणजे निर्मितीपासून लेह पॅलेसनं 19 व्या शतकापर्यंत अनेक आक्रमणं पाहिली. इथल्या खोऱ्यांमधल्या लढाया, रक्तपात पाहिला. 1670 च्या दशकात तत्कालिन राजा डेल्डेन नामग्याल यांनी काही राजकीय कारणास्तव भुतानला साहाय्य करत तिबेटचं शत्रूत्व पत्करलं. तिबेटींनी लडाखविरोधात युद्धात बिगुल वाजवलं. डेल्डेन नामग्याल यांना साम्राज्य आबाधित राखण्यासाठी मुघलांकडे मदत मागावी लागली. मुघल त्यावेळी काश्मीरच्या खोऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. मुघलांनी तिबेटींचा पराभव केला. पण पुन्हा काही वर्षांतच तिबेटींनी पुन्हा लडाखवर हल्ला चढवून नामग्याल शासकांचा पराभव केला. नामग्याल शासक आणि तिबेटी यांच्यात त्यावेळी करार झाला आणि नामग्याल साम्राज्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आल्या. दुसरीकडे इंग्रजांचं साम्राज्य वाढलं होतं. व्यापाराच्या निमित्तानं अनेक विदेशी लडाखमध्ये येत. त्यांनी लिहून ठेवलेल्या वृत्तांतांमध्ये लेह पॅलेसचा प्रामुख्यानं उल्लेख आढळतो. 

1830च्या दशकात काश्मीरचे डोगरा राजे गुलाबसिंग यांचे सरसेनापती जोरावर सिंह यांनी लढाईचं मैदान गाजवत अनेक प्रदेश डोगरा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणले. जोरावर सिंग यांनी लडाखपासून तिबेटचा पश्चिमी भाग आणि उत्तरेत बाल्टिस्तानपर्यंतचा भाग जिंकून घेतला. तहांतर्गत वर्षाकाठी लडाखी हे डोगरा राजा गुलाबसिंग यांना 20 हजार रुपये देतील असं ठरलं. त्यानंतर नामग्याल शाही परिवारानं लेह पॅलेस सोडला आणि ते जवळच असलेल्या स्टोक पॅलेसमध्ये राहायला गेले. डोगरांनाही नंतर बाल्टी आणि तिबेटी सैन्यानं हल्ले करून लेह पॅलेसमधून पळवून लावलं. त्यामुळे लेह पॅलेसमध्ये नवीन राज्यकर्ते फार काळ नांदू शकले नाही. 
भौगोलिकदृष्ट्या अत्य़ंत कठीण आणि भूकंपप्रवण प्रदेशात सत्तातर, स्थलांतर, पलायन अशा अनेक घटना आपल्या डोळ्यांनी बघितलेला लेह पॅलेस आजही कणखरपणे उभा आहे. 

पॅलेसच्या सर्वात वरच्या मजल्यावरून अख्खं लेह शहर एका नजरेत सामावतं. किल्ल्याचा मेन्टेनन्स राखणं अवघड आणि खर्चिक असलं तरी अशा ऐतिहासिक वास्तूंमध्ये प्री-वेडिंग/ पोस्ट वेडिंग फोटोशूट वगैरे प्रकार अस्वस्थ करतात. या वास्तूचं पावित्र्य राखणं, ते सांभाळणं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत देणं हे आपलं कर्तव्य आहे. पॅलेसमधून बाहेर पडताना अस्वस्थता जरा जास्तच जाणवली. भल्या बुऱ्या आठवणी आपल्यात उदरात सामावलेल्या लेह पॅलेसच्या वेदना इथे येणाऱ्या पर्यटकांना समजून घ्यायला हव्या. एकेकाळी लडाखच्या हिमालयी साम्राज्याचं केंद्र असलेला हा बुरूज ढासळू न देणं ही आपलीही जबाबदारी आहे. लडाखच्या मोहून टाकणाऱ्या सौंदर्यात हरखून जाण्याआधी लेह पॅलेस समजून घेणं जास्त गरजेचं आहे. त्याशिवाय लडाखचा पहाडी प्रवास अपूर्ण आहे.

(क्रमश:)

(या ब्लॉगचा पहिला भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा).

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget